Posts

चविष्ट आणि पौष्टिक मेतकूट भात

Image
  जगातल्या कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन कितीही महागडे पदार्थ खाल्ले, तरी मनाला आणि पोटाला जी खरी तृप्ती मिळते, ती आपल्या घरच्या साध्या जेवणातच असते. अशाच साध्या, पण थेट हृदयाचा ठाव घेणाऱ्या पदार्थांच्या यादीत सर्वात वरचे नाव म्हणजे - मेतकूट भात आणि त्यावर साजूक तुपाची धार! हे केवळ एक जेवण नाही, तर तो एक सोहळा आहे. जेव्हा भूक लागलेली असते, किंवा बाहेर मुसळधार पाऊस पडत असतो, तेव्हा ताटात वाढलेला गरमागरम मेतकूट भात म्हणजे अमृतच वाटतो. या पदार्थाची खासियत म्हणजे यात वापरला जाणारा भात. हा काही सणासुदीचा किंवा पुलाव-बिर्याणीसारखा दाणा-दाणा मोकळा झालेला भात नसतो. मेतकूटासोबत खायचा भात म्हणजे 'आसट भात'! तांदळात पाण्याचे प्रमाण थोडे जास्त ठेवून शिजवलेला, अत्यंत मऊ, गच्च आणि वाफाळता भात. जेव्हा हा मऊसर आसट भात ताटात वाढला जातो आणि त्यातून गरम वाफा निघत असतात, तेव्हा त्यावर एक मोठा चमचा मेतकूट भुरभुरले जाते. भाताच्या उष्णतेने मेतकूटाचा तो खमंग सुगंध हवेत दरवळू लागतो. मग त्यावर घरच्या साजूक तुपाची एक सढळ हाताने धार सोडली जाते. तूप मेतकूटात मिसळून भातात मुरते आणि त्याचा जो सुवास ये...

नेटफ्लिक्सवरचा थ्रॅश चित्रपट

Image
  नेटफ्लिक्स वर Thrash (थ्रॅश) नावाचा थ्रिलर चित्रपट पाहिला. खूप चांगला आहे. फक्त दीड तासाचा चित्रपट असून शेवटपर्यंत तुम्हाला गुंतवून ठेवतो. हिंदी डब उपलब्ध आहे. पूर्वी म्हणजे नव्वदच्या दशकात जसे disaster movies (नैसर्गिक आपत्तीवर आधारित) बनायचे तसाच हा आहे. फक्त यातील कथेची व्याप्ती ही संपूर्ण जग, संपूर्ण अमेरिका असे नसून एका गावातील घटनांवर आधारित आहे. एका किनाऱ्यावरील अमेरिकन गावात भयानक वादळ येते आणि संपूर्ण गावात पाणी शिरते.  एक घटना अशी घडते की, त्यामुळे मानव खाणारे शार्क त्या गावाकडे आकर्षित होतात. यातील मोजके पात्र आणि त्यांच्या आसपास घडणाऱ्या घटना आणि त्यांची या सर्व महापुरातून वाचण्याची धडपड, त्यासाठी त्यांनी केलेल्या विविध युक्त्या प्रयुक्त्या बघतांना आपल्याला थरार आणि उत्सुकता जाणवते आणि हे प्रसंग थोडे का होईना आपल्या ज्ञानात भर घालतात.  ऑफिसमधून घरी परतणारी आणि वादळी पावसात अचानक सापडलेली प्रेग्नंट स्त्री, आई वडील काही वर्षांच्या अंतराने वारलेली आणि म्हणून घरात एकटी राहणारी एक मुलगी, किनाऱ्यावर असलेले तिचे समुद्री संशोधक काका, मांस पोचवणारा ट्रक चालक, तीन मुल...

कॅपचा कशाला?

Image
बरेचदा वेबसाइटवर लॉगिन करतांना CAPTCHA दिसतो, ज्यात आपल्याला अतिशय साधे प्रश्न विचारतात जसे की 3+7 किती हे सांगा, किंवा बाजूला चित्रात दिलेली अक्षरे टाईप करा, म्हणजे तुम्ही मानव आहात हे सिद्ध होईल. म्हणजे मानवाव्यतिरीक्त इतर कुणाला म्हणजे कॉम्प्युटर किंवा एआयला 3+7 हे गणित येत नाही किंवा अक्षरे ओळखता येत नाहीत, असा याचा अर्थ घ्यायचा का? त्याचे उत्तर 'नाही'असे आहे. मग वेबसाइटवर कॅप्चा का विचारला जातो? त्याचे खरे कारण खालीलप्रमाणे आहे. 1. गणिताची परीक्षा नाही: कॅप्चा विचारताना वेबसाइट तुमचा गणिताचा पेपर घेत नसते. 2. मानवी वर्तनाची ओळख: मुख्य हेतू हा आहे की तुम्ही मानव आहात की एखादा रोबोट (बॉट). तुम्ही जेव्हा '3+7' चे उत्तर टाईप करता किंवा 'मी मानव आहे' यावर क्लिक करता, तेव्हा कॉम्प्युटर तुमची ती क्रिया आणि तुमचे वर्तन तपासतो. 3. बॉटस आणि मानवातील फरक: मानवी कृती नेहमीच अगदी अचूक आणि ठराविक नसते. माऊस फिरवणे, क्लिक करणे यात एक नैसर्गिक अनियंत्रितपणा असतो. याउलट, बॉटस (Automated Scripts) अगदी ठराविक आणि वेगवान कृती करतात. एआय हे ओळखते की तुम्ही नैसर्गिकरित्या माऊस फ...

लकी पेन

Image
  मुंबईतील दादर स्टेशनजवळील छोटीशी कॅफे. संध्याकाळचे सात वाजले होते. बाहेर पावसाची हलकी सर सुरू होती. आत खिडकीजवळ प्रिया बसली होती. समोर नोट्सचा ढीग आणि एक पेन. प्रिया UPSC ची तयारी करत होती. दोन वर्षे मेहनत केली होती, पण मुख्य परीक्षा जवळ येताच तिच्या मनात भीतीचा भयंकर डोंगर उभा राहिला होता. प्रिया हुशार होती, उत्तर लेखनाची स्टाइल अप्रतिम होती.   पण प्रत्येक मॉक टेस्टनंतर ती स्वतःला म्हणायची, “मी पुरेशी हुशार नाही, जर मी फेल झाले तर?”   हात थरथरायचे, रात्रभर झोप यायची नाही.   त्या दिवशी तिने ठरवलं, “आता UPSC सोडायचं.” निर्णय घेऊन ती कॅफेतून बाहेर पडली. पावसात भिजत चालत होती. डोळ्यात अश्रू होते. स्टेशनच्या बाहेर एक वृद्ध आजी छोट्या स्टूलवर बसल्या होत्या. समोर टेबलावर जुना काळा पेन आणि काही कागद होते.  आजीने हलक्या आवाजात विचारलं, “मुली, पेन घ्यायचं का? फक्त २० रुपये.” प्रिया रडत रडत म्हणाली, “आजी, माझं परीक्षेचं स्वप्नच संपलंय. आता पेन कशाला?” आजी शांत हसल्या, “अगं, हे ‘लकी पेन’ आहे. याने लिहिलेली प्रत्येक परीक्षा तू पास होशील. चांगले मार्क मिळवश...

सुहास शिरवळकर, स्टार हंटर्स आणि अमर विश्वास

Image
“अमर विश्वास” ही वेब सिरीज Amazon MX Player वर 11 फेब्रुवारी 2026 ला रिलीज झाली. ही एक कोर्ट ड्रामा आणि क्राइम-थ्रिलर हिंदी वेब सिरीज आहे. एकूण 10 एपिसोड आहेत. माझ्यासाठी तरी ही एका बैठकीत बघून संपण्यासारखी नव्हती. मी अंदाजे चार दिवसात ही बघून पूर्ण केली.  ही सिरीज सुप्रसिद्ध मराठी लेखक सुहास शिरवळकर यांच्या स्टार हंटर्स या कादंबरीवर आधारित आहे. कादंबरी जुनी असली तरी वेब सिरीज रूपांतर करताना सोशल मीडिया, सीसीटीव्ही, मोबाईल फोन, हॅश टॅग मिटू, निर्भया केस असे सगळे संदर्भ आहेत. त्यांनी आजच्या काळाला अनुसरून बदल केले असतील. मी मूळ कादंबरी वाचली नाही. अमर विश्वास एक बुद्धिमान वकील आहे. तो मुंबईत राहतो आणि समाजात दुर्बल लोकांसाठी लढतो. एक प्रसिद्ध फिल्म प्रोड्यूसर जेसु मोमिन ची रात्री एका हॉटेलमध्ये हत्या होते. या हत्या प्रकरणात वीस वर्षीय बहर चक्रवर्तीला मुख्य संशयित म्हणून अटक होते कारण ती सकाळी हॉटेलमध्ये त्या खुनीच्या रूममध्ये खुनीजवळ झोपलेली सापडते. पण त्या सकाळी घडलेल्या एका योगायोगामुळे अमर विश्वास तिची केस स्वीकारतो आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो, ज्यात अनेक गुपितं, कारस्थाने, म...

नवे अँथ्रोपिक टूल्स: एआय मधली क्रांती

Image
  अँथ्रोपिक (Anthropic) ही अमेरिकेतील एक AI (Artificial Intelligence) कंपनी आहे. जशी OpenAI कंपनी ChatGPT चॅटबॉट बनवते, तशीच Anthropic ही कंपनी Claude (क्लॉड) नावाचा AI चॅटबॉट बनवते. (उदा. Claude 1, Claude 2, Claude 3 इ.). अँथ्रोपिक ही कंपनी जास्त सुरक्षित, जास्त विश्वासार्ह, आणि मानवाला उपयोगी असे AI बनवते. तसेच मोठ्या कंपन्या आणि डेव्हलपर्सना AI वापरायला API सुद्धा पुरवते.  Claude हा अँथ्रोपिकचा AI असिस्टंट आहे: ChatGPT सारखाच.  तो प्रश्नांची उत्तरे देतो, लेखन/अनुवाद करतो, कोडिंगमध्ये मदत करतो, सारांश काढतो, डॉक्युमेंट समजावतो.  पण, अँथ्रोपिकचे ‘क्लॉड कोडेक्स’ हे साधन केवळ चॅटबॉट नसून ते संगणकावरील फाईल्स वाचणे, दस्तऐवज संपादित करणे आणि फाईल्सची मांडणी करणे अशी महत्त्वाची कामे करू शकते. हे टूल स्क्रीनशॉट्सवरून स्प्रेडशीट तयार करणे किंवा कच्च्या नोट्सवरून पूर्ण अहवाल बनवण्याचे काम अत्यंत वेगाने करते. क्लॉड कोडेक्स सारखे तंत्रज्ञान थेट संगणकाचा ताबा घेऊन मानवाप्रमाणे प्रक्रिया पार पाडत असल्याने, कंपन्यांना त्यांच्या पारंपरिक सेवांमध्ये मोठे बदल करणे अनिवार्य झाले आहे...

कोणती भक्ती श्रेष्ठ? सगुण की निर्गुण? भगवदप्राप्तीची कोणती पद्धत श्रेष्ठ?

भगवदगीतेतील अध्याय 12 मध्ये, श्लोक 1 ते 12 हे याच विषयाला वाहिलेले आहेत. अर्जुन विचारतो की, सगुण परमेश्वराची भक्ती करणारे श्रेष्ठ आहेत, की निराकार (निर्गुण) ब्रह्माचे ध्यान करणारे? श्रीकृष्ण उत्तर देतात की, सगुण भक्त सर्वात श्रेष्ठ. जे मन पूर्णपणे माझ्यात लावून, श्रद्धेने माझी भक्ती करतात ते मला सर्वांत श्रेष्ठ वाटतात. कारण निर्गुण उपासना ही तुलनेने कठीण असते. निर्गुण (निराकार) ब्रह्माचे ध्यान करणारेही शेवटी मलाच येऊन मिळतात. पण, ही निराकाराची साधना कठीण असते. देहधारी माणसांना ती फार अवघड जाते. म्हणून सगुण भक्ती अधिक सोपी आणि प्रभावी आहे.  त्यानंतर भगवंत क्रमाक्रमाने भक्तीचे (परमात्मा प्राप्तीसाठी) वेगवेगळे मार्ग सुचवत जातात. 1. ज्ञानयोग: अज्ञानात कर्म करणापेक्षा ज्ञानात कर्म करणे केव्हाही चांगले. ज्ञान म्हणजे काय? भगवंत सांगतात की, आपल्या शरीरात असलेले इंद्रिय मन बुद्धी आत्मा आणि परमात्मा यांचे आपल्याला ज्ञान होणे. मी म्हणजे शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी नसून केवळ आत्मा (जीवात्मा) आहे अशी सतत जाणीव ठेवणे. म्हणजे कर्तेपणाचा त्याग. जे कर्म घडत आहेत, ते शरीर करीत आहे, मी नाही. मी फक्त...