नेटफ्लिक्सवरचा थ्रॅश चित्रपट

 


नेटफ्लिक्स वर Thrash (थ्रॅश) नावाचा थ्रिलर चित्रपट पाहिला. खूप चांगला आहे. फक्त दीड तासाचा चित्रपट असून शेवटपर्यंत तुम्हाला गुंतवून ठेवतो. हिंदी डब उपलब्ध आहे. पूर्वी म्हणजे नव्वदच्या दशकात जसे disaster movies (नैसर्गिक आपत्तीवर आधारित) बनायचे तसाच हा आहे. फक्त यातील कथेची व्याप्ती ही संपूर्ण जग, संपूर्ण अमेरिका असे नसून एका गावातील घटनांवर आधारित आहे. एका किनाऱ्यावरील अमेरिकन गावात भयानक वादळ येते आणि संपूर्ण गावात पाणी शिरते. 

एक घटना अशी घडते की, त्यामुळे मानव खाणारे शार्क त्या गावाकडे आकर्षित होतात. यातील मोजके पात्र आणि त्यांच्या आसपास घडणाऱ्या घटना आणि त्यांची या सर्व महापुरातून वाचण्याची धडपड, त्यासाठी त्यांनी केलेल्या विविध युक्त्या प्रयुक्त्या बघतांना आपल्याला थरार आणि उत्सुकता जाणवते आणि हे प्रसंग थोडे का होईना आपल्या ज्ञानात भर घालतात. 

ऑफिसमधून घरी परतणारी आणि वादळी पावसात अचानक सापडलेली प्रेग्नंट स्त्री, आई वडील काही वर्षांच्या अंतराने वारलेली आणि म्हणून घरात एकटी राहणारी एक मुलगी, किनाऱ्यावर असलेले तिचे समुद्री संशोधक काका, मांस पोचवणारा ट्रक चालक, तीन मुलांचा छळ करून त्यांना सांभाळणारे आई वडील असे काही पात्र यात आहेत. 

विशेष म्हणजे जसं टायटॅनिक चित्रपटातील पाण्याचे सर्व प्रसंग आपल्याला अगदी खरे खरे वाटले, तसेच या चित्रपटाबद्दलही आहे. स्पेशल इफेक्ट नक्की यात असतीलच, पण ते आहेत असे कुठेच म्हणजे कुठेच जाणवत नाहीत. सगळे अगदी खरे खरे वाटते. नक्की हा चित्रपट बघण्यासारखा आहे. 

चित्रपटाची लिंक: https://l1nq.com/veibrno

Comments