व्यवसायातील तोटा हाताळण्याचे उपाय
1. सध्याच्या परिस्थितीचे सर्व दिशांनी मूल्यांकन करा:
व्यवसायात तोटा होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की बाजारातील बदल, उत्पादनाच्या गुणवत्तेत घट, वाढती स्पर्धा, किंवा खराब आर्थिक व्यवस्थापन. त्यासाठी बाह्य परिस्थितीवर लक्ष ठेवा, जसे की महामारी, सरकारी धोरणे, नवीन तंत्रज्ञानाचा परिणाम वगैरे. सर्वात आधी हे समजून घेणे गरजेचे आहे की, तोटा नेमका का होत आहे? त्यासाठी डेटा विश्लेषण करा. मागील 3 ते 5 वर्षांचा आर्थिक डेटा तपासा. यात विक्री, खर्च आणि नफ्याचे विश्लेषण करा. कधी कधी व्यवसाय मॉडेल पूर्णपणे बदलणे आवश्यक असते. नवीन क्षेत्रात विस्तार, इतर कंपन्यांशी भागीदारी आणि ब्रँड इमेज सुधारण्यावर भर द्या. स्पर्धकांचा व्यवसाय मॉडेल आणि रणनीती समजून घ्या. प्रायसिंग (Pricing) स्ट्रॅटेजीमध्ये सुधार करा. तुमचा USP ठरवा. बाजारात तुमचा वेगळेपणा तयार करा. तोटा नियंत्रित करण्यासाठी उत्पन्न वाढवणेही आवश्यक आहे. नवीन मार्केटमध्ये प्रवेश करा. प्रोडक्ट लाईन वाढवा. प्रीमियम सर्व्हिस ऑफर करा. टेक्नोलॉजी वापरा. ती व्यवसाय अधिक उत्पादक आणि कार्यक्षम बनवते. ऑटोमेशन सुरू करा. बिलिंग आणि इन्व्हेंटरी हे ऑटोमेट करा. व्यवसाय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणा. ग्राहक वर्तन आणि मार्केट ट्रेंड्स समजून घ्या.
2. आपल्या ग्राहकांकडून प्रामाणिक फीडबॅक घ्या:
ग्राहक हा कोणत्याही व्यवसायाचा केंद्रबिंदू असतो. कस्टमर सर्व्हिस सुधारा. लॉयल्टी प्रोग्राम सुरू करा. मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करा (डिजिटल, सोशल मीडिया, ईमेल). ऑनलाइन सर्वे करा. लहान आणि नेमके प्रश्न विचारा, जसे की, प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये सुधारणा कुठे आवश्यक आहे? तुमची सर्वात मोठी समस्या कोणती आहे ज्याचे समाधान आम्ही केले नाही? महत्त्वाच्या ग्राहकांना प्रत्यक्ष भेटा. त्यांचे मत ऐका आणि त्यांच्या गरजा समजून घ्या. त्यांचे आभार मानायला विसरू नका. सोशल मीडियावर प्रतिक्रिया मागवा. आपल्या व्यवसायाचे ऑनलाइन रेटिंग आणि रिव्ह्यूवर लक्ष ठेवा. नकारात्मक फीडबॅकला त्वरित उत्तर द्या. जुने आणि विश्वासू ग्राहक विशेषतः उपयुक्त सूचना देतात. त्यांच्या अनुभवावर आधारित सेवा/उत्पादन सुधारता येते. फीडबॅक देणाऱ्यांना सूट, कूपन किंवा ऑफर द्या. यामुळे ग्राहक प्रोत्साहित होतात.
3. आपल्या कर्मचाऱ्यांकडून प्रामाणिक फीडबॅक घ्या:
ओपन डोअर पॉलिसी ठेवा, म्हणजे कर्मचाऱ्यांना वाटले पाहिजे की ते कधीही आपले मत मोकळेपणाने सांगू शकतात. त्यांच्यात विश्वासाचे वातावरण तयार करा. बहुदा गोपनीय फीडबॅक सिस्टिम वापरा. यामुळे कर्मचारी कोणताही दबाव न घेता खरी मते देतात. नियमित टीम मीटिंग घ्या. तुम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये सुधारणा आवश्यक वाटते?, काम सोपे होण्यासाठी कोणती प्रक्रिया बदलायला हवी? असे विचारा. परफॉर्मन्स रिव्ह्यू दरम्यान फीडबॅक घ्या. त्यांच्या कामाचे कौतुक करा आणि सुधारणा सुचवायला सांगा. फीडबॅक देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मान्यता/पुरस्कार द्या, त्यामुळे ते अधिक प्रामाणिकपणे मत देतील. ग्राहक किंवा कर्मचाऱ्यांची गोष्ट मध्येच तोडू नका. त्यांच्या मताचा आदर करा. नकारात्मक फीडबॅक वैयक्तिकरित्या घेऊ नका. त्याला कंपनीला सुधारण्याची संधी समजा. फीडबॅकवर आधारित बदल करा आणि कर्मचाऱ्यांना कळवा की, त्यांच्या मताचा उपयोग झाला. फीडबॅक नंतर संबंधित लोकांशी पुन्हा संपर्क साधा आणि सुधारणा काय चालू आहे ते सांगा. कर्मचाऱ्यांकडून प्रामाणिक फीडबॅक घेऊन त्यांच्या मतावर कृती करून आपण व्यवसायाला तोट्यातून बाहेर काढू शकता आणि अधिक मजबूत बनवू शकता.
4. आर्थिक व्यवस्थापन आणि कॉस्ट कटिंग:
तोटा कमी करण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे अनावश्यक खर्च कमी करणे. उत्पादनक्षमतेवर थेट परिणाम न करणारे खर्च ओळखा. अकाउंटिंग, कस्टमर सपोर्ट सारखी कामे आउटसोर्स करा. स्टाफचे पुनरावलोकन करा. गरजेपेक्षा जास्त कर्मचारी असतील तर संख्या कमी करा; पण कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ देऊ नका. चांगले आर्थिक व्यवस्थापन तोटा कमी करण्यात मोठी मदत करू शकते. कॅश फ्लो पॉझिटिव्ह राहील याची खात्री करा. लोन रीस्ट्रक्चर करा. बँक/संस्थेशी अटी पुन्हा ठरवा. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करा. अनावश्यक स्टॉक कमी करा. “Just in Time” ही रणनीती वापरा.

Comments
Post a Comment