पॉलिसी दरबार
आजकाल टीव्ही लावला की हमखास खलील वाक्य ऐकू येतं: "अगर आप नही रहें तो आपके बच्चो की फिस कौन भरेगा? अरे अब तो करवा लो टर्म इन्शुरन्स, पॉलिसी दरबार डॉट कॉम से!" 😁
आधीच सध्याच्या वातावरणामुळे घाबरलेल्या जनतेला आणखी घाबरवण्याचे काम तो रोज सोफ्यावर बसून रोज न चुकता करत होता. एकदा त्या पॉलिसीवाल्या अतरंगी हेयरस्टाईल असलेल्या माणसाचा, त्या तिन्ही मित्रांना खूप राग आला, ते चिडले. 🙄
मागच्या खिडकीतून चढून ते तिघे पॉलिसीवाल्याच्या घरात चुपचाप शिरले आणि त्याच्या सोफ्यामागे गेले, त्याच्या अंगावर चुपचाप चादर टाकली आणि त्याला उचलून घरी आणलं. मग त्याच्या अंगावरची चादर काढली आणि त्याला तिघांनी खुर्चीवर दोरीने बांधून ठेवलं. 😂
मकरंद अनासपुरे: "कशाला रोज टिव्हीवर येऊन रोज आमचं डोकं खातोस रे? कशाला घाबरवतोस आम्हाला? वाजवू का? कानाखाली?" 😎
पॉलिसी दरबार: "तुम्हाला घाबरवायचे मला पैसे मिळतात! सोडा मला. पॉलिसी दरबार मध्ये हजेरी लावायला जायचंय मला! सोडा मला!" 🤗
अशोक सराफ: "किती वेळा सोडा मागतो रे हा? सोडा तर बिलकुल देऊ नका याला! मला एक सांग पॉलिसीवाल्या, तू स्वतः किती पॉलिसी घेतल्या रे पॉलिसी दरबार मधून? आलाय मोठा लोकांना शहाणपणा शिकवायला? व्याख्या विखी वाख्खा!" 🤣
पॉलिसी दरबार: "मी एकही पॉलिसी नाय घेतली. कोल्ड्रिंकचे जाहिरात करणारे हिरो हिरोईन स्वतः कधी कोल्ड्रिंक पितांना पाहिले का? मग मला कशाला पॉलिसी घ्यायला सांगता? मला तर बाल बच्चे पण नाही. माझं लग्न पण नाही झालं!" 😞
भारत गणेशपुरे: "मग आम्हांले शहाणपणा काहून शिकवतो रे?" 🤓
पॉलिसी दरबार: "अरे, सोडा मला, मी राजपाल यादव आहे. मी पॉलिसी दरबारचा वेश घालून सोफ्यावर बसतो!" 🤑
मकरंद अनासपुरे: " च्यायला, आसं हाय व्हय? तू रस्ता चुकला का काय? तुझी प्रियदर्शन वाट पाहतोय, चल व्हय तिकडं! तरीच म्हणतो मी, त्याचा फोन येऊन गेला तीन चार येळा! राजपाल यादव शूटिंग मधून फरार झालाय!"
🤔🤔😀😀
(मी पॉलिसीच्या विरोधात नाही, लोकांना एकसारखे पॉलिसीच्या नावाखाली मृत्यूचे भय दाखवून घाबरवून सोडण्याची जाहिरात वाल्यांची जी पॉलिसी आहे त्याच्या विरोधात आहे!)
#वाट_चुकलेला_दरबारी
#nimishtics
#निमिश्कील

Comments
Post a Comment