Skip to main content

Popular posts from this blog

कॅपचा कशाला?

बरेचदा वेबसाइटवर लॉगिन करतांना CAPTCHA दिसतो, ज्यात आपल्याला अतिशय साधे प्रश्न विचारतात जसे की 3+7 किती हे सांगा, किंवा बाजूला चित्रात दिलेली अक्षरे टाईप करा, म्हणजे तुम्ही मानव आहात हे सिद्ध होईल. म्हणजे मानवाव्यतिरीक्त इतर कुणाला म्हणजे कॉम्प्युटर किंवा एआयला 3+7 हे गणित येत नाही किंवा अक्षरे ओळखता येत नाहीत, असा याचा अर्थ घ्यायचा का? त्याचे उत्तर 'नाही'असे आहे. मग वेबसाइटवर कॅप्चा का विचारला जातो? त्याचे खरे कारण खालीलप्रमाणे आहे. 1. गणिताची परीक्षा नाही: कॅप्चा विचारताना वेबसाइट तुमचा गणिताचा पेपर घेत नसते. 2. मानवी वर्तनाची ओळख: मुख्य हेतू हा आहे की तुम्ही मानव आहात की एखादा रोबोट (बॉट). तुम्ही जेव्हा '3+7' चे उत्तर टाईप करता किंवा 'मी मानव आहे' यावर क्लिक करता, तेव्हा कॉम्प्युटर तुमची ती क्रिया आणि तुमचे वर्तन तपासतो. 3. बॉटस आणि मानवातील फरक: मानवी कृती नेहमीच अगदी अचूक आणि ठराविक नसते. माऊस फिरवणे, क्लिक करणे यात एक नैसर्गिक अनियंत्रितपणा असतो. याउलट, बॉटस (Automated Scripts) अगदी ठराविक आणि वेगवान कृती करतात. एआय हे ओळखते की तुम्ही नैसर्गिकरित्या माऊस फ...

नवे अँथ्रोपिक टूल्स: एआय मधली क्रांती

  अँथ्रोपिक (Anthropic) ही अमेरिकेतील एक AI (Artificial Intelligence) कंपनी आहे. जशी OpenAI कंपनी ChatGPT चॅटबॉट बनवते, तशीच Anthropic ही कंपनी Claude (क्लॉड) नावाचा AI चॅटबॉट बनवते. (उदा. Claude 1, Claude 2, Claude 3 इ.). अँथ्रोपिक ही कंपनी जास्त सुरक्षित, जास्त विश्वासार्ह, आणि मानवाला उपयोगी असे AI बनवते. तसेच मोठ्या कंपन्या आणि डेव्हलपर्सना AI वापरायला API सुद्धा पुरवते.  Claude हा अँथ्रोपिकचा AI असिस्टंट आहे: ChatGPT सारखाच.  तो प्रश्नांची उत्तरे देतो, लेखन/अनुवाद करतो, कोडिंगमध्ये मदत करतो, सारांश काढतो, डॉक्युमेंट समजावतो.  पण, अँथ्रोपिकचे ‘क्लॉड कोडेक्स’ हे साधन केवळ चॅटबॉट नसून ते संगणकावरील फाईल्स वाचणे, दस्तऐवज संपादित करणे आणि फाईल्सची मांडणी करणे अशी महत्त्वाची कामे करू शकते. हे टूल स्क्रीनशॉट्सवरून स्प्रेडशीट तयार करणे किंवा कच्च्या नोट्सवरून पूर्ण अहवाल बनवण्याचे काम अत्यंत वेगाने करते. क्लॉड कोडेक्स सारखे तंत्रज्ञान थेट संगणकाचा ताबा घेऊन मानवाप्रमाणे प्रक्रिया पार पाडत असल्याने, कंपन्यांना त्यांच्या पारंपरिक सेवांमध्ये मोठे बदल करणे अनिवार्य झाले आहे...

टेलिमार्केटिंगची फिरकी

अनेकांना टेलिमार्केटिंगचे किंवा फ्रॉड कॉल्सचे सतत त्रासदायक फोन येतात. अशा वेळी त्यांना मजेशीर, चटकदार उत्तरे देऊन स्वतःचा मूडही हलकाफुलका ठेवता येतो आणि समोरच्यालाही गोंधळात टाकता येते. खाली काही मजेशीर उत्तरांची उदाहरणे दिली आहेत: 🧠 कॉलर: "सर, आम्ही एक खास लोन ऑफर घेऊन आलो आहोत…" तुमचं उत्तर: "मस्तच! पण मी आता साधू झालोय, पैशांचा त्याग केलाय… थेट हिमालयात बसलोय!" (बॅकग्राउंडमध्ये भजन लावून ठेवा!) 🤖 कॉलर: "सर, तुमचं केवायसी अपडेट नाही झालं…" तुमचं उत्तर: "आहो, माझं नाव बदललंय आता – 'गोपीनाथ बाबा'. कृपया अशा सांसारिक गोष्टींनी मला त्रास देऊ नका." 🕵️ कॉलर: "सर, तुमचं क्रेडिट कार्ड बंद होणार आहे…" तुमचं उत्तर: "वा! एकदाचं सुटलो या कर्जाच्या फेऱ्यातून. धन्यवाद रे बाबा!" 👻 कॉलर: सर, तुम्हाला नवीन कारसाठी फाइनान्स हवाय का? आम्ही खास ऑफर देतो!  तुमचं उत्तर: मी फक्त झपाटलेल्या कार विकत घेतो, कारण मी भूत आहे! अशा कारसाठी लोन आहे का? 🧛‍♂️ कॉलर: "सर, आमच्या नवीन स्कीममध्ये तुम्ही करोडपती होऊ शकता!" तुमचं उत्त...