माणूस विरुद्ध बाळ: क्रिसमसच्या थंडीतली हास्ययात्रा!
11 डिसेंबर पासून नेटफ्लिक्स वर एक छान वेब सिरीज आली आहे. Man Vs Baby. एकूण चार भागांची ही सिरीज आहे. प्रत्येक भाग साधारण 30 मिनिटांचा आहे.
मिस्टर बीन ऍक्टर रोवन एटकिन्सन (पात्राचे नाव ट्रेवर बिंगले) याने यात एक्टिंग केलेली असून प्रोडूसर रायटर तोच आहे. सोबत विल्यम डेव्हिसने पण लेखन केले आहे.
ही एक सिच्युएशनल कॉमेडी (विशिष्ट प्रसंगी योगायोग घडल्याने निर्माण होणारे विनोद) आहे. यात मिस्टर बीन सिरीजच्या आणि बेबीज डे आऊट या चित्रपटाच्या थोड्या व्हाइब येतात. पण रोवनने नियंत्रित अभिनय केला आहे. त्याचे वय वाढलेले जाणवते, पण त्याच्या एक्टिंग स्किलमुळे फारसा फरक पडत नाही. मिस्टर बीन सारखे खूप जास्त वेडे वाकडे हावभाव केलेले नाहीत. पण तरीही स्लॅपस्टिक कॉमेडीही आहेच. बॅकग्राऊंडला हास्याचे आवाज नाहीत.
या वेब सिरीजची प्रिक्वेल माणूस विरुद्ध मधमाशी (Man vs. Bee) अशी होती असे मी ऐकले, पण ती मी बघितलेली नाही, आणि त्यामुळे ही सिरीज बघताना काही अडत नाही. एक घर सांभाळताना मधमाशीसोबत चढाओढ करत ट्रेवर आधी एका धक्कादायक आणि विनोदी अनुभवात अडकलेला होता. आता तो शांत आयुष्याची अपेक्षा करत शाळेचा केअरटेकर म्हणून काम करतो. पण शाळेच्या ख्रिसमस गॅदरिंगच्या वेळेस “बेबी जीझस” (Baby Jesus) म्हणून वापरला जाणारा बाळ गॅदरिंग संपल्यानंतर कोणीही परत घ्यायला येत नाही आणि बाकी सर्वजण ख्रिसमस सुट्टीच्या गडबडीमध्ये असतात. ते बाळ ट्रेवरकडे राहून जाते.
पुढे ट्रेवरला लंडनमधील एका भव्य पेंटहाउसमध्ये हाऊस-सिटिंग करण्याची संधी मिळते. पोलीस आणि समाजसेवी संस्था यांना तो बाळ परत करण्यासाठी कॉन्टॅक्ट करतो, पण असे काही घडते की ते बाळ चुकून त्याच्याजवळ राहते.
शेवटी त्या बाळाला पाठीवर सॅकमध्ये लपवून तो लंडनला हाऊस-सिटिंग कामाचा इंटरव्यू द्यायला जातो. पुढे काय गमती जमती घडतात यावर आधारित ही सिरीज आहे.
घरातील आबालवृद्धांनी थंडीत मस्त शाल पांघरून टीव्हीसमोर बसा आणि या वेब सीरिजचे एपिसोड हसत हसत एन्जॉय करा.

Comments
Post a Comment