केपॉप डिमन हंटर्स: अनिमेशन मुव्ही

 






मुलीच्या आग्रहास्तव केपॉप डिमन हंटर्स हा अनिमेशन मुव्ही मी नेटफ्लिक्सवर मूळ इंग्रजीतून पाहिला. आम्हाला आवडला. हिंदीतसुद्धा डबिकरण उपलब्ध आहे. 

जसा आपल्याकडे म्युझिकल प्रेमकथा वगैरे चित्रपटाचे प्रकार असतात तसा हा म्युझिकल ऍनिमेशन फॅन्टसी चित्रपट आहे. या चित्रपटात K-pop ग्लॅमर आणि अ‍ॅक्शन यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. हा चित्रपट एक वेगळा कन्सेप्ट आहे. चित्रपटातील संगीतही कथा पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या चित्रपटाचा साउंडट्रॅकही अत्यंत यशस्वी ठरला. अनेक गाण्यांना Billboard Hot 100 मध्ये टॉप-10 मध्ये स्थान मिळाले. 

K-Pop Demon Hunters हा Netflix च्या इतिहासातील सर्वात जास्त बघितला गेलेला अ‍ॅनिमेटेड मूव्ही आहे. एनिमेशन शैली, संगीत, कथा व पात्र सादरीकरण चांगले आहे. 

यातील गुबगुबीत मांजर “डेमन हंटर कॅट” मला भलतंच आवडलं. त्याचे नाव डरपी टायगर आहे. तो एक मोठा, अलौकिक वाघ आहे जो मांजरासारखा दिसतो आणि K-pop ग्रुपचा साथीदार आहे. 

चित्रपटाची कथा HUNTR/X नावाच्या तीन सदस्यांच्या K-pop गर्ल ग्रुपभोवती फिरते: रुमी, मीरा आणि झोयी. हे तीनही दिवसा जगभरात प्रसिद्ध K-pop स्टार्स असतात, पण रात्री ते गुप्तपणे डेमन हंटर्स म्हणून जगाची रक्षण करणारे योद्धे बनतात. त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे “Honmoon” नावाचे एक अलौकिक संरक्षण कवच राखणे, जे मानव जगाला दुष्ट आत्म्यांपासून सुरक्षित ठेवते. HUNTR/X ला त्यांच्या संगीताद्वारे मानवांना प्रेरणा देणे आणि दुष्ट शक्तींचा मुकाबला करणे आवश्यक असते. 

शत्रूच्या Saja Boys नावाच्या प्रतिद्वंदी बॉय बँडमागे मूळतः दुष्ट शक्तीचा Gwi-Ma असतो. Saja Boys आपल्या चाहत्यांची ऊर्जा चोरण्यासाठी त्यांचा गुप्त शक्ती वापरतात. कथानक गंभीर वळण घेते जेव्हा रुमी आणि Jinu (Saja Boysचा मुख्य सदस्य) यांच्यात प्रेम निर्माण होते. आणि हो, या दोघांच्याही बॅक स्टोरी (उपकथानक - फ्लॅशबॅक) आहेत. पुढे काय होते, ते नेटफ्लिक्सच्या पडद्यावर बघा. 

आपल्या मुलांसोबत दोन घटका करमणूक करायला चांगला पिक्चर आहे.



Comments

Popular posts from this blog

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली

आरोग्यदायी सांबार