फक्त तीन दिवस
मोनॅको हा युरोपमधील दोन नंबरचा लहान देश आहे, जो भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. त्यापेक्षा लहान देश आहे व्हॅटिकन सिटी.
मोनॅको हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक मानला जातो. या देशाची ओळख आलिशान जीवनशैली, कॅसिनो आणि फॉर्म्युला वन रेसिंग ही आहे. भूमध्य समुद्राचा निळसर रंग, अलिशान नौका आणि कॅसिनोचा झगमगाट एका वेगळ्याच दुनियेची अनुभूती देतो.
सकाळची 11 वाजेची वेळ होती. मोंन्टे कार्लो शहरातील "ला कोस्टा कॅफे" मध्ये भिंतींना आकर्षक पेस्टल रंग दिलेला होता. खिडकीतून समुद्राच्या लाटांचा लयबद्ध आवाज आणि कॉफीचा मादक सुगंध दरवळत होता. उच्च दर्जाचा सूट आणि नेव्ही ब्लू स्लिव्हलेस ब्लेझर घातलेला एक पर्यटक लुई, शांतपणे एका कोपऱ्यात बसून कॉफीचा आस्वाद घेत होता. आरोग्य आणि स्टाईल यांचा संगम असलेली त्याची शरीरयष्टी टोन केलेली होती. त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानी हास्य होते, पण त्याला थोडीशी उदासिनतेची झालर होती. त्याच्याजवळच्या बॅग्सवरून लक्षात येत होते की तो नुकताच देशांतर करून आलेला आहे.
तेवढ्यात त्या कॅफेमध्ये ती शिरली. स्टेला. स्लिम फिगर असलेली. फ्रिल्स असलेल्या ग्रे कलरच्या खोल गळ्याच्या ब्लाउजमधून जाणवणारे तिच्या छातीवरील पूर्ण विकसित झालेले दोन्ही आकर्षक गोलाकार तिथे उपस्थित पुरुषांच्या नजरा खेचत होते. तिचे मोकळे केस वाऱ्यात नाचत होते. आखूड नेव्ही ब्लू जीन्स स्कर्टने तिचे लांब, पुष्ट पाय उघडे पडले होते. तिच्यात युरोपीय सौंदर्य ठासून भरले होते.
तिच्या हातात मोठा नकाशा होता आणि नजरेत गोंधळ! दुसऱ्या हातामध्ये चाकाची मोठी बॅग. ती सुद्धा कुठून तरी देशांतर करून आलेली होती.
ती त्याच्या जवळच्या रिकाम्या टेबल जवळच्या खुर्चीवर बसली आणि नकाशात डोकं खुपसून 'हा रस्ता नेमका कुठे जातोय' या विचारात स्वतःशीच हसली. तिचं गोंधळणं आणि हसणं इतकं नैसर्गिक होतं की लुईला हसू आवरलं नाही.
"गोंधळायला मोनॅकोपेक्षा चांगलं ठिकाण नाही. तुम्ही इथे हरवण्यासाठीच आलात, की आणखी काही शोधताय?" तो तिच्याकडे वळून हसत म्हणाला.
तिने त्याच्या सेन्स ऑफ ह्यूमरला दाद देण्यासाठी हसून नकाशा खाली ठेवला. तिच्या डोळ्यांत एक चमक दिसली.
ती मार्दव नजरेने, गोड हसून म्हणाली, "कदाचित दोन्ही. पण मला वाटतं, इथे हरवणं हेच मजेदार आहे. काहीवेळा आपल्याला आयुष्यात नेमकी हीच गरज असते. हरवून जाणं! सगळे रस्ते विसरणं. थोडीशी विश्रांती घेणं. मौज करणं!"
त्याला तिच्या या तत्त्वज्ञानात आपले स्वतःचे विचार प्रतिबिंबित झालेले दिसले.
"मग मला तुमच्यासोबत असं हरवून जायला मिळालं तर?" त्याच्या आवाजात एक हलकासा उत्साह होता.
तो कोणतीही गोष्ट व्यक्त करायला जास्त वेळ घ्यायचा नाही. त्याने पुढे आपले विचार स्पष्ट करून सांगितले, "अगदी माझ्या मनातलं बोललीस. नावं, पत्ते, देश, भूतकाळ, सगळं आपण बाजूला ठेवू. फक्त मोनॅको देश आणि, आपण दोघे, आणि तीन दिवस. पुढे जे काही आपल्यात होईल ते. आधीच आयुष्यात इतके नियम, इतकी बंधने आहेत की, ते काही काळ विसरून, झुगारून काही क्षण फक्त मनापासून जगले पाहिजेत."
तिने क्षणभर विचार केला. तिच्या मनात अनेक प्रश्न होते. हा पर्यटक कोण आहे? कुणी गुन्हेगार तर नसेल ना? पण हे त्याला न विचारण्याचे तिने ठरवले. पण व्यक्तिमत्वावरून आणि बोलण्यावरून तो गुन्हेगार वाटत नव्हता. पण मग तिला त्याच्या विचारांतील स्वातंत्र्य आवडले कारण, अगदी हेच विचार तिचेही होते.
"ठीक आहे, माझ्याकडेही तीनच दिवस आहेत", ती हसून म्हणाली, "पण एक अट. हे तिन्ही दिवस आपण या जगापासून दूर राहू. कुणाशी संपर्क करायचा नाही. फक्त तू आणि मी. त्यानंतर, आपण पुन्हा अनोळखी."
त्याने आनंदाने हात पुढे केला. तिने त्याच्या हातात आपला कोमल हात दिला. त्याचे अंग शहारले.
"ठरलं तीन दिवस, मोंन्टे कार्लो मध्ये फक्त आपण दोघे. तुला कुणी इथे ओळखते?"
"नाही!"
"मलाही नाही!"
त्या क्षणापासून, त्यांचे "अनोळखी आपलेपण" सुरू झाले. ती त्याच्या टेबलावर जाऊन बसली. तिलाही कुणीतरी सोबत हवी होते त्यालाही. तिनेही कॉफी मागवली. त्याने तिला नकाशातील नेमके ठिकाण सांगितले, जे ती शोधत होती.
दोघांनी एकमेकांना विनोद सांगून हसवले. त्याच्या विनोदावर ती इतकी खळाळून हसली की, तिचा नाजूक चेहरा लाल झाला. त्या चेहऱ्याकडे तो बघतच राहिला.
नंतर दोघांना नेमके एकमेकांकडून काय हवे आहे, हे नजरेने आपोआप एकमेकांना कळले. एकमेकांना शब्दात सांगण्याची त्यांना गरज भासली नाही. कारण, दोघेही प्रेमाचे भुकेले होते. स्पर्शाचे भुकेले होते. भावनेचे भुकेले होते. सहवासाचे भुकेले होते. हे नजरेतूनच दोघांनी एकमेकांना सांगितले.
दोघांनी कॉफी संपवली आणि हॉटेल डी कोस्टल मध्ये रूम बुक केली. समान ठेवला. फक्त पर्यटक म्हणून फिरताना आवश्यक असलेल्या वस्तू बॅगेत सोबत घेतल्या आणि शहरातील रस्त्यांवर हातात हात घालून त्यांनी फिरायला सुरुवात केली.
एकमेकांबद्दल काहीही न विचारता, त्यांनी समुद्राच्या वाऱ्याचा आणि इमारतींच्या रंगांचा आनंद घेतला. दोघांनी बिनधास्त समुद्रकिनाऱ्यावर लाटांमध्ये भिजण्याचा आनंद घेतला. एकमेकांना स्पर्श करायची एकही संधी ते सोडत नव्हते.
त्यांच्याकडे फक्त तीन दिवस होते. फक्त तीन दिवस.
त्यांच्यात बोलणं कमी, पण नजरेची भाषा खूप काही सांगणारी होती. सुरुवातीला ते विजिटेशन चॅपेलमध्ये गेले. नंतर, कॅसिनो बाग, ग्रीमाल्डी फोरम, कॅसिनो चौक, ऑपेरा भवन ही ठिकाणे त्यांनी पहिली. दोघेही खूप श्रीमंत. दोघांकडे भरपूर पैसे होते. भरपूर प्रेमही होते. फक्त ते देण्यासाठी दोघानाही जे कुणीतरी कधीपासून हवं होतं, ते आज मिळालेलं होतं.
दुपारी हलके जेवण करून संध्याकाळी ते प्रिन्सेस ग्रेस जपानी बागेत गेले. शांतपणे तिथल्या हिरवळीवर पहुडले. त्या हिरवळीवर दोघांचे रेखीव ओठ एकमेकांना आवेगाने भिडले. तीन मिनिटे प्रदीर्घ चुंबन घेतल्यावर त्यांना नाईलाजाने थांबावे लागले. म्हणून लगबगीने ते हॉटेल रूममध्ये गेले, आणि त्यांनी एकमेकांच्या संपूर्ण शारीरिक जवळीकीचा अनुभव घेतला.
तिने वस्त्रांचे बंधन झुगारून दिले आणि स्वतःचा संपूर्ण अनावृत्त देह त्याच्या स्वाधीन केला. तिचा संगमरवरी गोरापान पुष्ट देह तो बघतच राहिला. तोही स्वतःच्या नकळत अनावृत्त झाला.
तिच्या सौंदर्यामुळे पुलकित झालेले आणि मिलनाला अतिशय आतुर झालेले त्याचे ते "पौरूष" बघून तिला खूप नवल वाटले आणि तिने त्याचे खूप कौतुक केले. आता प्रेमाचा खेळ हळूहळू सुरू होऊन नंतर वेग पकडून एका अत्युच्च आनंदाच्या आणि समाधानाच्या बिंदूवर येऊन थांबला. दोघांनी समाधानाचा सुस्कारा टाकला. सकाळपर्यंत ते न झोपता एकमेकांत गुरफटून राहिले.
तो स्पर्श, तो सहवास, एकमेकांसाठी पूर्णपणे नवीन असूनही, हजारो वर्षांच्या ओळखीसारखा वाटत होता. पण तरीही, त्यांनी शब्दांच्या भिंती कायम ठेवल्या. वैयक्तिक माहिती टाळत, त्यांनी फक्त 'त्या' क्षणांचा आणि एकमेकांच्या अस्तित्वाचा अनुभव घेतला. ती रात्र जणू एका अनोख्या स्वातंत्र्याचं प्रतीक होती.
दुसरा दिवस त्यांच्या नात्यातील भावनिक जवळीक अधिक गहिरी करणारा ठरला. प्रिन्स पॅलेसच्या बागेत, सूर्यास्त पाहताना ते दोघेही झाडाखाली शांत पहुडले होते. सूर्याची नारंगी-सोनेरी किरणं त्यांच्या चेहऱ्यावर पडत होती. दोघेही एकमेकांना कुरवाळत होते.
"तुला कधी असं वाटतं का," स्टेला शांतपणे म्हणाली, "की काही क्षण इतके परिपूर्ण असतात, की त्यांना कायम जपून ठेवावंसं वाटतं? जसा हा सूर्यास्त, तू आणि मी... या क्षणाला इथेच बंदिस्त करावं असं वाटतं."
लुई हसला. म्हणाला, "हो, पण मग मला वाटतं, कदाचित त्यांचं सौंदर्यच त्यांच्या क्षणिकपणात आहे. जर ते कायम राहिले, तर त्याची किंमत राहणार नाही. आपण हे तीन दिवस, ही अशी 'क्षणभंगुर' भेट स्वीकारली आहे, म्हणूनच ती इतकी सुंदर वाटतेय. या खेळांना पण कधीही कॅमेरात बंद करायचे नाही. मनामध्ये कायमचे साठवायचे."
तिच्या मनात काल रात्रीच्या क्षणांचा विचार आला. ते क्षण हे क्षणभंगुर होते, पण त्याने तिच्या आत्म्याला स्पर्श केला होता.
"काल रात्री..." ती थोडी थांबली, "त्या क्षणांनी मला तुझ्याशी एक वेगळेच कनेक्शन जाणवले. तुझ्यात मी पूर्णपणे एकरूप झाले होते. पण त्या क्षणांमुळे तुला माझ्याबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल काही जाणून घ्यायची इच्छा झाली नाही? तुला कधी असे वाटले नाही का, की मी एका अनोळखी पुरुषाशी लगेच एकाच भेटीत शारीरिक संबंध कसे काय ठेवते आहे?"
त्याने खांदे उडवले. त्याच्या डोळ्यांत एक वेगळंच तेज होतं.
"झाली, अर्थातच झाली. पण तशीच इच्छा तुलाही झाली असायला हवी होती नाही का? पण तूही ते विचारले नाहीस. मग मी तरी का विचारावे? हे बघ! हा आपला खेळ 'न जाणण्याचा' आहे. जर मी तुझं नाव किंवा तुझा देश विचारला, तर तू ती अनोळखी मुलगी राहणार नाहीस, जी मला या सुंदर देशात भेटली. नाव जाणून घेण्यापेक्षा, तुझ्यासोबत आणखी उरलेली आणखी एक सुंदर रात्र घालवणं जास्त महत्त्वाचं आहे. आलेले हे सुंदर तीन दिवस भरभरून जगायचे. या क्षणाला, या नात्याला, कोणतंही नाव न देता. आपल्या दोघांना जोडीदार असतील किंवा नसतील त्याचा विचार आपण दोघांनीही केलेला नाही. "
त्याचं हे तत्त्वज्ञान तिला खूप भावलं.
तिच्या मनातल्या विचारांना त्याने शब्द दिले होते.
'आपण कोण आहोत' यापेक्षा 'आपण सध्या काय करत आहोत' हे त्यांना जास्त महत्त्वाचं होतं. हे त्या दोघांचं तत्त्वज्ञान होतं. सगळ्यांनाच ते मान्य होईल असे नाही.
रात्री ते मॉन्टे कार्लो कॅसिनोच्या झगमगाटात रमले. कॅसिनोचा उत्साह आणि नशीबाचा खेळ! जसा त्यांचा दोघांचा अल्पायुषी संबंध होता. हसत-खेळत, क्षणांचा आनंद लुटत त्यांनी ती रात्र व्यतीत केली. पुन्हा, हॉटेल रूममध्ये, त्यांच्यातील शारीरिक जवळीक घडली. ती कालपेक्षाही जास्त आवेगपूर्ण होती.
तिसरा दिवस निरोपाचा होता. पोर्ट हरक्युलस बंदर, रात्रीची वेळ.
जहाजांचे मंद दिवे समुद्राच्या पाण्यावर चमकत होते. हवेत एक विचित्र तणाव होता. येणारा निरोप आणि गेलेले दिवस.
"तीन दिवस..." ती थांबून समुद्राकडे पाहत म्हणाली, "इतके कमी का वाटतात?"
तो हलकेच हसला आणि म्हणाला, "कारण, आपण फक्त मोनॅको देशच नाही, तर एकमेकांनाही पूर्णपणे अनुभवलं. हा देश माझा कायमचा लक्षात राहील तो फक्त तुझ्यासाठी. तुझं सौंदर्य, तुझा स्पर्श, तुझं हसणं, तुझं शांत असणं, तुझा सुखदायी सहवास हे सगळं माझ्यासोबत कायम राहील. हृदयाच्या एका कप्प्यात. जीवनात काही गोष्टी 'गोड आठवण' म्हणूनच चांगल्या राहतात."
"तुला कधी माझं नाव तरी विचारायची इच्छा झाली होती का?" तिच्या डोळ्यांत निरोपाचं पाणी होतं, पण चेहऱ्यावर हसण्याचा प्रयत्न होता.
तो थोडा थांबला.
दीर्घ श्वास घेऊन त्याने उत्तर दिलं, "हो. पण मग नंतर मला वाटलं, कदाचित अशा 'न माहित करून घेतलेल्या' गोष्टीतच खरी जादू आहे. तू माझ्यासाठी ती अनोळखी मुलगी राहशील, जी मला मोनॅकोच्या रस्त्यांवर भेटली, माझ्या हृदयाला आणि शरीराला स्पर्शून गेली, आणि मला 'वर्तमानात' जगायला शिकवलं. नाव, देश, हे सगळे नुसते टॅग्स आहेत. आपण त्या टॅग्सच्या पलीकडे जाऊन जगलो."
तिने हसून डोळे पुसले आणि म्हणाली, "आणि तू आहेस तो अनोळखी माणूस, जो मला कायम आठवेल. तू मला शिकवलं की, आयुष्य एक प्रवास आहे, आणि काही सहप्रवासी फक्त एका स्टेशनपर्यंतच सोबत असतात, पण तेवढ्या वेळेत ते आपल्यावर एक अमिट छाप सोडून जातात."
शब्द संपले होते. वेळ संपली होती. दोघांनी एकमेकांकडे आसुसलेल्या नजरेने पाहिले. जणू हा शेवटचा क्षण त्यांच्या भेटीचा सारांश होता. मग, काही न बोलता, त्यांनी एकमेकांना मिठी मारली. ती मिठी दीर्घ होती, खूप भावनिक होती, त्यांच्या तीन दिवसांच्या शारीरिक आणि आत्मिक बंधाचा निरोप देणारी होती. नंतर दोघांनी ओठांवर एक प्रदीर्घ चुंबन घेतले. मग ती मिठी तुटली आणि तो क्षणही थांबला.
ती हळूच मागे वळली आणि त्या आलिशान जहाजाच्या मंद प्रकाशाकडे चालू लागली. त्याने तिच्याकडे पाहिलं. तो थांबला, तिच्या चालण्याला डोळ्यांत साठवून घेतलं, आणि मग उलट दिशेने चालायला लागला.
दोघेही आपापल्या आयुष्यात परत गेले, जणू काही झालंच नाही. त्यांनी एकमेकांची कोणतीही वस्तू सोबत घेतली नाही की, एकमेकांचा कोणताही फोटो काढला नाही. त्यांनी एकमेकांचे कोणते सोशल मीडिया अकाउंट सुद्धा विचारले नाही.
पण मोनॅकोच्या मोंन्टे कार्लो शहरातील त्या तीन दिवसांचा ठसा त्यांच्या मनावर आणि शरीरावर कायम होता. त्यांचं नाव, देश किंवा भूतकाळ काहीही माहिती नव्हतं, पण त्या अनोळखी क्षणांनी त्यांना 'जीवनातील क्षणभंगुर आनंद' आणि 'आलेल्या दिवसांचे महत्त्व' याचं तत्त्वज्ञान दिलं होतं.
लुई आजही प्रत्येक सुंदर स्त्रीच्या ठिकाणी तिला शोधतो आणि स्टेला आजही प्रत्येक नवीन भेटलेल्या अनोळखी व्यक्तीत त्या तीन दिवसांची जादू शोधते.
ती एक अनोळखी भेट होती, पण अविस्मरणीय बंध होता. तो होता पुरावा एका सुंदर तत्त्वज्ञानाचा! आलेले दिवस भरभरून जगण्याचा.
दोघेही आपापल्या देशात, आपापल्या जगात परतले. त्यांना एकमेकांचा भूतकाळ, नाव, किंवा देश काहीही माहिती नव्हता. पण मोनॅकोच्या त्या तीन दिवसांचा, त्या रोमँटिक ठिकाणांचा आणि त्या शारीरिक-भावनिक जवळीकेचा अनुभव त्यांच्या आत्म्याचा अविभाज्य भाग बनला होता. त्यांना आयुष्यभर पुरेल इतका आनंद मिळाला होता.

Comments
Post a Comment