जुरासिक वर्ल्ड रिबर्थ 2025

 

जुरासिक सिरीजचा लेटेस्ट चित्रपट आहे. तो जियो हॉटस्टार वर फ्री आणि इतर OTT प्लॅटफॉर्म वर paid आहे. या आधी अनेकदा स्कार्लेट जॉन्सन आणि डायनासोर या दोघांना अनेकदा आपण अनेक चित्रपटात पाहून चुकलो (थकलो) आहोत. 

पण Jurrasic franchise मध्ये स्कार्लेट यावेळेस पहिल्यांदा आहे. पण तिचे खूप वय झालेले जाणवते. कदाचित ती जुरासिक पार्क या पहिल्या चित्रपटात असती तर? तरुण आणि सुंदर. विशेषत: तिच्या प्रसिद्ध लाल कलरच्या टॉप मध्ये! असो.

या आधीच्या सर्व डायनासोर चित्रपटांचा बरा वाईट पूर्वग्रह बाजूला ठेऊन फ्रेश मनाने हा चित्रपट बघा. तुम्हाला आवडेल. 

कथा अशी आहे की, सध्या मानव आणि डायनासोर एकत्र रहात आहेत. त्याला या आधीच्या चित्रपटात घडलेली कथा कारणीभूत आहे. तसेच काही प्रयोग चुकलेले mutant डायनासोर एका बेटावर सोडून दिलेत. आता तीन प्रकारचे डायनासोर आहेत. पाण्यातले, जमिनीवरचे आणि उडणारे. 

भविष्यात मानवासाठी खूप फायदेशीर ठरू शकणाऱ्या एका मेडिकल एक्सपेरिमेंटसाठी या डायनासोरचे ब्लड सँपल कलेक्ट करण्यासाठी एक टीम बेटाकडे निघते. त्यांना वाटेत डायनासोरच्या हल्ल्यामुळे नाव उलटून बुडणार असलेलं कुटुंब भेटते. समुद्रात कसेबसे ते एका डायनासोरकडून ब्लड सँपल घेण्यात यशस्वी होतात. ते सँपल कसे घेतात हे पडद्यावरच बघण्याजोगे आहे. इथे सांगून त्याची मजा मी घालवू इच्छित नाही. नंतर ते सर्व बेटावर पोहोचतात. पुढची कथा तिथली आहे.

तेच तेच डायनासोर बघून बघून आपण कंटाळले असल्याने, यात त्यांनी आणखी मनोरंजन करण्यासाठी इतर सर्व काही टाकले आहे. समुद्र, जहाज, नाव, बेट, जंगल, पाणी, समुद्र, कडे कपारी, दऱ्या, खोरे, धबधबे, गुफा, रॅपलिंग, साहस, थरार, डायनोसोरचे हल्ले, पावलोपावली विविध प्रकारचे छोटुकले आणि मोठुकले (प्रचंड) डायनासोर, एकमकांवर कुरघोड्या, डायनासोर आणि मानव यांची लपाछपी, वाचवा वाचवी, पळा पळी वगैरे वगैरे. त्यामुळे बघतांना कंटाळा येत नाही. 

एकदा तर एक डायनासोर हेलिकॉप्टरला तोंडात धरून फेकून देतो. ते पाहून रोबोट पिक्चर मधले सर्व वाईट रजनीकांत एकत्र चिकटून साप बनून हेलिकॉप्टरला तोंडात धरून फेकतात त्याचीच आठवण झाली. काही काही डायनासोर हे अगदी टकलू अक्षय खन्नासारखे दिसतात. दिसू देत. काय करणार?

पण एकदा हा चित्रपट नक्की बघण्यासारखा आहे. कथा फारशी काही नाही, पण साहस दृश्यांसाठी बघण्यासारखा आहे.


Comments

Popular posts from this blog

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली

आरोग्यदायी सांबार