मिटिंगचा रंगमंच

नवा दिवस घेऊन सकाळ उगवली.

कॅलेंडरवर लाल ठिपका घेऊन

मिटिंगची परिचीत घंटा वाजली.

चला चला मीटिंग सुरू झाली.


एकजण तावातावाने बोलतो, 

दुसरा MOM लिहितो,  

तिसरा विचारात हरवतो, 

चौथा पहिल्याला थांबवतो.


पाचवा म्हणतो "Sorry, I was on mute" 

सहावा म्हणतो "Can we take this offline?"

आकड्यांच्या सप्तरंगी स्लाइड्स पटापट फिरतात, 

KPI च्या एक्सेल शीट भराभर झळकतात.


बॉस म्हणतो, "Let’s align on goals"  

पण स्लाइड्समध्ये फिरतात endless scrolls,

एकजण mute होतो, आणि दुसरा होतो offline,  

तिसरा विचारतो, "Can I share my screen?"


जिकडे तिकडे पडद्यावर दिसत राहतात 

Action items, follow-ups आणि notes,  

कधी वाटतं या शब्दांच्या जंजाळात अडकून, 

आपणच बनत आहोत scapegoats.   


कधी मन हसतं, कधी sigh करतं,  

कधी mute वर ठेवून, स्मितहास्य करतं.  

पण या मिटिंगमध्येही एक गोडी आहे,  

टीमची साथ, आणि कामाची चाहूल आहे.


कधी बॉसचे टोमणे, कधी टीमचा गोंधळ,

मनात मात्र घोंगावते, विचारांचे वादळ

या अवघड रंगमंचावर मिटिंगच्या,

प्रत्येकजण निभावतो आपापली भूमिका.  


Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली