मुंबईचा प्रवास
लोकलच्या गर्दीत हरवलेले चेहरे,
स्वप्नांच्या ओझ्यांनी वाकलेली शहरे।
सकाळी उठून जीवघेणी धावपळ सुरू,
पोटासाठी सगळी ही मरमर करू।
घामाने ओले, पण न थकता चालणारे
कुटुंबासाठी झगडणारे हे न झुकणारे मनोरे।
स्त्री असो वा पुरुष, समान चाल आहे,
संध्याकाळी पुन्हा तीच लोकलची वाट आहे।
थांबवता येत नाही ही वेळेची शर्यत,
हातात टिफीन, आणि कामाचा पर्वत।
मुंबईची ही धडपड, रोजची कहाणी,
कष्ट आणि आशेची ही जुनीच गाणी।
पुरुषांच्या खांद्यावर संपूर्ण घराचा भार
स्त्रियांच्या पदरात घर-ऑफिस दुधारी तलवार
मुंबई विचारत नाही— काय रे थकलास का तू,
ती रोज सकाळी म्हणते — पुन्हा उठलास का तू।
Comments
Post a Comment