बेकायदेशीर स्थलांतरितांचा धोकेदायक मार्ग




डंकी नावाचा एक शाहरुखचा चित्रपट नुकताच येऊन गेला जो युकेमध्ये बेकायदेशीर मार्गाने प्रवेश करून स्थलांतरित झालेल्या पंजाबी व्यक्तींवर आधारित आहे. आणि तो सत्य घटनांवर आधारित आहे. राजकुमार हिरानी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यांनी आधी मिशन काश्मीर, थ्री इडियट्स, पिके आणि मुन्नाभाई एमबीबीएस असे काही चित्रपट दिग्दर्शित केलेत. यापैकी काही चित्रपटातील अनेक प्रसंगांची थोडी थोडी झलक वेगळ्या पद्धतीने डंकी चित्रपटातही दिसून येते. शाहरुख च्या सुद्धा एक-दोन चित्रपटाची झलक इथे जाणवते. परंतु हा चित्रपट सर्वस्वी वेगळ्या विषयावर आधारित आहे. 


अर्थात अशा विषयावर पूर्वी चित्रपट आले नव्हते असं नाही. अर्जुन कपूरचा एक "नमस्ते लंडन" म्हणून चित्रपट आला होता. त्यातही थोडेफार फरकाने हाच विषय हाताळला गेला होता. पण डंकी या चित्रपटात हा विषय आणखी सविस्तर रीतीने हाताळला आहे. त्याला थोडी विनोदाची किनार दिल्यामुळे चित्रपट बघणे सुसह्य होते. चित्रपटात थरारक आणि ऍक्शन प्रसंग दोन-तीनच आहेत, परंतु ते चांगले जमून आलेत. पंजाब मधील अनेक जण इंग्लंडमध्ये जाण्यास जास्त का उत्सुक असतात याचे कारण चित्रपटाच्या सुरुवातीला दिले आहे. 


लालटू नावाच्या पंजाबच्या गावात मनू (तापसी पन्नू), बुग्गू, बल्ली हे मित्र इंग्लंडमध्ये जायची स्वप्न पाहतात, पण फसवणूक आणि इतर काही कारणांनी व्हिसा मिळवू शकत नाही. 


इंग्लंडमध्ये जाण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे आणि अपरिहार्य कारण असते. स्टुडन्ट विजा मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न फेल होतो. कारण इंग्लिश भाषेच्या टेस्टमध्ये ते फेल होतात. विजा साठी इंग्लिश भाषा शिकवणारा बोमन इराणी हा शिक्षक सुद्धा यात आहे.


या इंग्रजी टेस्टमध्ये फक्त बल्ली पास होतो. बल्ली इंग्लंडमध्ये जाऊन या तिघांना त्याच्या श्रीमंतीचे फोटो पाठवतो. 


या चित्रपटात विकी कौशलने "सुक्खी" हे पात्र साकारले आहे. तो हार्डी (शाहरुख खान) आणि त्याला त्याच्या जीवनातल्या एका इमोशनल घटनेसाठी या सर्वांसोबत फक्त एका दिवसासाठी अर्जंट इंग्लंडमध्ये जायचे असते. पण, त्याच्या आयुष्याला दुर्दैवी वळण लागते. 


दरम्यान हार्डी (ह्रदयालसिंग धिल्लन) हा एक सैनिक (म्हणजे शाहरुख) त्या गावात तापसी पन्नू म्हणजे मनू हिच्या भावाचा टेप रेकॉर्डर परत करण्यासाठी येतो, आणि काही योगायोग घडतात ज्यामुळे तो या तिघांना सपोर्ट करून, त्यांना युकेमध्ये अवैध मार्गाने घेऊन जाण्याचा विडा उचलतो आणि मार्गदर्शन करतो, आणि त्यांच्या सोबत सुद्धा जातो.


आणखी काही मित्रांसोबत ते “डंकी मार्ग” (अवैध आणि धोकादायक मार्ग) वापरून इंग्लंडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. प्रवासात अनेक अडथळे येतात. सीमेवरील संघर्ष, ट्राफिक, इतर अडथळे इत्यादी. 


इंग्लंडमध्ये पोचल्यावर, त्यांना वास्तव आणि स्वप्नातील अंतर दिसते. बल्ली तिकडे गरिबीमध्ये राहत असलेला त्यांना दिसतो.


पुढे तिथला एक पटेल नावाचा वकील त्यांना बेकायदेशीर स्थलांतरितांना शोधून पकडणाऱ्या पोलिसांपासून वाचवण्यासाठी तीन पर्याय सुचवतो. लंडनमध्ये वैधपणे स्थायिक होण्यासाठी!


पहिला शक्य नसतो कारण त्यासाठी त्यांना करोडो रुपये लागणार असतात. तिसरा ते प्रयत्न करतात परंतु यशस्वी होत नाही. मग दुसऱ्या पर्यायाचा ते निवड करतात. तो पर्याय हार्डी याला मान्य नसतो म्हणून कोर्ट त्याला भारतात परत पाठवते. 


परंतु जवळपास 25 वर्षानंतर काही कारणास्तव तिघांना पुन्हा भारतात परतायचे असते. पण काही नियमानुसार त्यांना भारताचा विजा मिळत नाही. मग पुन्हा ते हार्डीला दुबईला बोलवून तिथून एका युक्तिद्वारे भारतात परततात. तो मार्ग वैध असतो की अवैध, हे चित्रपटात बघणे योग्य होईल. 


कलाकारांचा अभिनय चांगला झाला आहे. काही विनोदी प्रसंग चांगले जमून आलेत. ज्यांचे इंग्लिश पक्के आहे त्यांनाच या चित्रपटातील काही जोक समजतील. काही विनोदी प्रसंग ब्लॅक कॉमेडी या प्रकारात मोडतात. थोडा इमोशनल अँगल टाकण्यासाठी त्यांनी एका पात्राला एक आजार सुद्धा दाखवला आहे. पण त्यावर जास्त फोकस नाही त्यामुळे त्याबाबतीत प्रेक्षक फारसा त्या पात्राशी इमोशनली कनेक्ट होत नाही. तसेच, चित्रपटातील एकच गाणे लक्षात राहते ते म्हणजे "ओ माही ओ माही!" 


थ्री इडियट्स आणि मुन्नाभाई इतका हा चित्रपट दर्जेदार नाही. पण तरीही अगदी वेगळा विषय हाताळल्याबद्दल हा चित्रपट एकदा तरी बघावा असाच आहे. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींची माहिती मिळते. नेटफ्लिक्स

 वर हा चित्रपट उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली