दुसरे (महा?) युद्ध 🧐

वॉर 2: नेटफ्लिक्सवर बघता बघता उत्स्फूर्तपणे लिहिलेले हे परीक्षण. ज्यांनी आधीच पहिला आहे त्यांना पिक्चर आवडला असेल नसेल तरीही हे वाचायला वेगळीच मजा येईल. 


सुरुवातीला जपानी लोकांसोबत हृतिक रोशनची दे दम, पाणी कम हाणामारी. क्रिश 1 सिनेमातील जंगलातील मारामारी सारखी. हू हू, हा हा, सु सा, कुंग फू! अश्शी भारी फायटिंग की त्यातला आत्माच हरवून जातो! त्यापेक्षा पठाण मधली सुरुवातीची फायटींग अनेक पटींनी बरी वाटते... 😜


मग हेलिकॉप्टर आल्यावर तो धूम 2 मधला हृतिक बनतो आणि मग लगेच रानकोल्हा आणि हृतिक यांची एकत्रित कोल्हेकुई होते. जंगल बुक स्टाइल. काय समजलात? 🧐


मग तो (हृतिक म्हणजे कबीर) नाचगण्याच्या क्लबमध्ये तिच्या मालकीणकडे (फिगर मेन्टेन केलेली म्हातारी बाई!) जातो, जिने त्याला त्या सगळ्या जपानी लोकांना मारायचे काम दिले होते. 🧑🏽‍⚖️


बरं, नंतर एन्ट्री होते पूर्ण कपडे घातलेल्या कियारा अडवाणीची!!तिचा ट्रेलरमधला अवतार लक्षात असल्याने इथे काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटलं. तिचे नाव काव्या लुथरा💃🏽


त्यानंतर कबीर कर्नल लुथरा याला रेल्वे रुळांवर गोळी मारतो. ती गोळी मारण्याची व्हिडिओ शूटिंग लुथराची मुलगी काव्या बघते. लुथरा आणि कबीर यांचा रुळांवरचा संवाद एक सस्पेन्स आहे, तो सांगत नाही. मग पुढे सिनेमात कली आणि कल्की यांचे संदर्भ येतात. 🕺🏽


आणि बापरे, हे काय? चक्क अनिल कपूरची एन्ट्री होते. ए जी, ओ जी, अनिल कपूर जी, रॉच्या नवीन हेडचे वेलकम करो जी! लुथरा को मारणे वालों को हम नहीं, छोडेंगे जी...!!🧟


मग बापरे! ज्युनियर NTR अचाट कपडे फाडून, डरकाळ्या फोडत सोमालियाच्या जहाजावर चाच्यांना, जवानच्या म्हाताऱ्या शाहरुखच्या आणि वाँटेड आणि दबंगच्या सलमान स्टाईलने फोडतो. नंतर जहाज बॉम्बने फोडतो. 🛳️


मग त्याला कबीरच्या मागे पाठवतात. 🏃🏽


चला, आता आपण स्पेन मध्ये जाऊ. तिथे दोन वेण्या घातलेली रूही नावाची मुलगी आहे, आणि कबीर पण आहे. इथे हृतिक कतरिनाच्या बँग बँग चे तिथे व्हाईब येतात. 🏄🏽


आणि हो! एवढा मोठ्ठा चर्च. त्याची मोठ्ठी घंटा. त्याच्या खाली हृतिक कियाराची फाईट. व्वा व्वा. 🤝


आणि मग हृतिक दादा आणि NTR बाबा यांच्या गाड्यांची स्पेनच्या रस्त्यांवर उलट सुलट टक्कर, चक्कर, अक्कड बक्कड बांबे बो. 🚗🚙🚐


आणि स्पेनच्या पुलावर पुन्हा घडते, धूम धूम... 


आणि मग पठाणच्या दुबईतल्या हाणामारीच्या व्हाइब्ज येतात.


आणि मग एक थरारक ट्रेनचा सीन ज्यात स्पायडर मॅन 2 ऑक्टोपस वाली फाईट सारखा सीन, रजनीकांत रोबोट सारखा ट्रेनच्या छतावर पळत जाणारा NTR बाबा, व्वा, व्वा! 🚝🚈🚗


आणि मग नंतर थेट येमेन मध्ये, इसीस कॅम्प. तिथे कबीरला एक काम मिळतं. 


आणि आता चला ओल्ड दिल्ली मध्ये. गच्चीवर व्यायाम करणाऱ्या NTR ला बघा. 


आणि मग चला पुन्हा स्पेनमध्ये.


विमानाने जाणाऱ्या सारंग फॅमिलीला मारायचा प्लॅन...✈️


आणि आता हृतिक बनला विमानाचा पायलट... यो!!🛩️


आणि एका विमानातून दुसऱ्या विमानावर थरारक मानवी दरोडा आणि मग तिथे असतो सफरचंद खाणारा NTR ज्युनियर!!🛬


अधून मधून दोघे एकमेकांना अडचणीत टाकून एकमेकांना वाचवत राहतात. आणि लगेच RRR च्या व्हाइब येतात...👬


आणि मग मोठ्ठा ट्विस्ट...💃🏽


NTR अचानक उडत्या विमानात हिरोचा व्हिलन बनतो आणि दोघांची जुनी ओळख आहे असे कळते आणि हृतिकला तो विमानातून पृथ्वीवर फेकून देतो....🛩️🗿


1999 ची मुंबई. दोघांचे जय विरु छाप बचपन आणि पाकेटमार पार्टनरशिप! आणि मग आशुतोष राणा अमिताभ बच्चन बनून झुंडची वाईब देतो.🌐


मग चला अरेबियन गल्फ मध्ये. 🛥️🚢


तिथे कबीर भाऊला मिळते एक अजून नवीन मिशन.... 


मग समुद्रात जहाजांचा पाठलाग. हवेत उडून उडून पाण्यात पडणारे जहाज... एका जहाजातून दुसऱ्या जहाजात उड्या. पाण्यातून जहाजावर, जहाजावरुन पाण्यात उड्या...


🏊🏽🚣🏽🏄🏽🏂🏽


तर मग असे सगळे आहे हे एकंदरीत!!


एवढे वाचूनही शेवटपर्यंत बघायची इच्छा झाली तर जरूर बघा... 


पुढे काय घडते ?... हुश्श!


आरे, अयान मुखर्जी दादा, तू ब्रह्मास्त्र सोडून कशाला आला इकडे वॉर वॉर खेळायला??


नुसते विशिष्ट बॅकग्राऊंड म्युझिक वाजवून वॉर 2 चा RRR होत नाही. नुसते विमानाचे इमोशनलेस फा

ईट सीन टाकून मिशन इम्पॉसिबल होत नसते...


चला बाय बाय सिने रसिकांनो!!

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली