चल उठ, घाबरू नकोस!
जरी आभाळ कोसळले,
तरी मी ठाम उभा राहीन
वादळांच्या धुळीमध्ये सुद्धा,
मी पुढे चालत राहीन
धुळीत मिसळलेले स्वप्न,
मी पुन्हा शोधून काढीन
भंगलेल्या काचांसारख्या वेदना,
हसत हसत झेलीन..
हा माझा जिद्दी जीव,
राखेतून पुन्हा उठेल
स्वतःचा तेजोदीप मी,
अंधारातही शोधेन
शत्रूच्या सावलीतही,
लढण्याची हिम्मत ठेवेन
कितीही कोसळला तरी,
स्वप्नांचा किल्ला पुन्हा बांधेन...
प्रत्येक फसवणुकीमागचं,
सत्य मी शोधीन
प्रत्येक घावात दडलेली,
संधी मी शोधीन
माझी खरी ओळख मला,
काळोखातच सापडेल
माझ्या विजयाच्या प्रकाशातून,
एक नवा सूर्य उगवेल...
(जेम्स बाँड च्या Skyfall चित्रपटातील Let the Skyfall या Adele या गायिकेने गायलेल्या गाण्यातून प्रेरणा घेऊन हे गाणे लिहिले आहे, पण ते गाण्याचे शब्दशः भाषांतर नाही)
मूळ गाण्याची लिंक: https://music.youtube.com/watch?v=LJzp_mDxaT0&si=yxaLkz5xLSeLrfuD

Comments
Post a Comment