जीवन म्हणजे एक कविता
जीवनाची वाट चालताना
थांबलो क्षणभर,
पावलांमध्ये गुंतले
काही विचार.
वाऱ्याने सांगितलं
हा क्षण हेच जीवन.
बाकी भूत भविष्य
या तर सावल्या
मग वळणावर भेटले
काही जुने स्वप्न,
काही हरवलेले,
काही नव्याने उमललेले
ते मला म्हणाले
केवळ स्वप्नपूर्ती म्हणजे
नव्हे जीवन
खरे जीवन म्हणजे
स्वप्नांकडे जाणारा प्रवास
आणि प्रवासात जगलेला
प्रत्येक क्षण
क्षणाक्षणात मग
मी बदलत गेलो,
आणि हरवून स्वतःला,
पुन्हा सापडलो.
सूर्यास्तातही सापडली
नवी आशा
चंद्रप्रकाशातही होती,
नवी दिशा.
जीवन ही कथा नव्हे,
तर असते कविता.
जिच्या प्रत्येक ओळीत
असते एक भावना.
Comments
Post a Comment