मैत्री
मैत्रीला नसते गणित वयाचे,
तिथे विचारांचे जुळतात स्पंदन,मैत्रीत नसतो कोणता अडथळा,
तिथे नसते कसले बंधन,
लिंग, रूप, वय न पाहता,
मैत्री विणते रेशमी बंध,
नसते तिथे संशयाचे ओझे,
मैत्री म्हणजे मुक्त पंख,
कधी अश्रूंचा सागर,
कधी आठवणींचा बहर
मित्र जमल्यावर होतो
हास्य विनोदाचा कहर
मैत्री म्हणजे मनातलं गुपित
सुरक्षित ठेवायची जागा,
मैत्री म्हणजे न तुटणारा
दोन जीवांचा धागा,
मैत्री म्हणजे अंधारात
दिवा होऊन उजळणं,
मैत्री म्हणजे आयुष्यभर
हातात हात धरून चालणं.
मैत्रीत नसते कोणी मोठं लहान,
सर्वांना मिळतो सारखा मान.
एकमेकांच्या सुखदुःखात उभं राहणं,
हीच खरी मैत्रीची खरी शान.

Comments
Post a Comment