कणाकणाने घास घेणारं ग्रहण



झी मराठी वर काही वर्षांपूर्वी आलेल्या ग्रहण मालिकेचे शेवट शेवटचे एपिसोड जेव्हा मी पहात होतो, तेव्हा मला एकच गाणे परत परत आठवायला लागले."रौंदे हैं मुझको तेरा प्यार, चुभता है तेरा इंतजार". उर्मिला आठवली, सोनाली कुलकर्णी सिनियर, फरदीन खान, नंतर कंगना राणावत आणि हो, काजोल पण आठवली. ते का बुवा? अ हं! मी नाहीं सांगणार! उत्तर तुम्हाला शोधायचे आहे आणि कमेंट मध्ये सांगायचे आहे. मी आता मालिकेविषयी सविस्तर सांगतो.


झी मराठी यू ट्यूब चॅनेल वर ऑफिशियली संपूर्ण 103 एपिसोड्स उपलब्ध आहेत. झी फाइव वर नाहीत. सर्व एपिसोड्स मी बघितले. कथानक भरकटत नाही. सर्वच एपिसोड चांगले आहेत. कोणताच एपिसोड कंटाळवाणा होत नाही. पुढे काय होईल याची उत्सुकता नेहमी लागूनच राहते. या सिरीयलचे IMBD रेटिंग चांगले आहे. सिरीयल पण खरंच चांगली आहे. मला तर आवडली. त्यातील काही निगेटिव्ह पॉइंट्स पण शेवटी सांगेनच.


नारायण धारप यांच्या याच नावाच्या कादंबरीवर जरी ही सिरीयल आधारित असली तरी नारायण धारपांनी त्या कथेत पॅरॅलल युनिव्हर्सचा (समांतर जग) कन्सेप्ट मांडला होता, पण सिरीयलच्या निर्मात्यांनी आपल्या पृथ्वीवरच्या जगातच या सिरीयल मधील रहस्याचा भेद करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही जरी नारायण धारपांची कादंबरी वाचली असली तरी ही सिरीयल स्वतंत्रपणे पाहू शकता. कारण ही सिरीयल कादंबरीपेक्षा वेगळ्याच ट्रॅकने जाते. हिला जरी हॉरर सिरीयल असे म्हटले जात असले तरीही तो प्रेक्षकांच्या बुद्धीशी निर्मात्यांनी केलेला खेळ आहे आणि तो खेळ यशस्वी सुद्धा होतो. ही एक उत्तम सायकॉलॉजिकल हॉरर, थ्रिलर आणि रहस्यमय मालिका आहे. 


यातील सर्वच कलाकारांचा अभिनय अतिशय उत्तम झाला आहे. अगदी शेवटच्या एपिसोड पर्यंत सर्वांनीच मन लावून काम केलेले आहे आणि पेस टिकून राहतो. पल्लवी जोशीने साकारलेल्या रमा नावाच्या स्त्रीपासून ही कथा सुरू होते. तिच्या वाढदिवशी आपल्या कुटुंबासाठी (पती, मुलगा, मुलगी) आईस्क्रीम आणायला बाहेर जाऊन परत येताना रस्ता क्रॉस करताना तिचा एक्सीडेंट होता होता वाचतो. त्यानंतर ती जेव्हा घरी जाते तेव्हा तिचे घरच जागेवर नसते. वेगळाच कोणाचा तरी बंगला असतो. ती कोणत्या वेगळ्याच काळात जाते का? टाईम ट्रॅव्हल? 


तिथे निरंजन आपल्या आईसहित राहत असतो. स्वभावाने चांगला असल्यामुळे निरंजन तिच्या सो कॉल्ड घरचा पत्ता सापडेपर्यंत तिला आपल्या घरी ठेवून घेतो. 


निरंजनची प्रेग्नंट पत्नी मंगल तीन वर्षांपूर्वी निरंजनच्या आईसोबत झालेल्या भांडणातून रागाने घर सोडून निघून गेलेली असते आणि तिचा एक्सीडेंट झालेला असतो. त्यानंतर ती एका हॉस्पिटलमध्ये दाखल होते परंतु तिथे तिचा नंतर मृत्यू होतो. त्या हॉस्पिटल मध्ये निरंजनचा मावस भाऊ शेखर डॉक्टर असतो. निरंजनची आई रमाला मंगल किंवा मंगलची सावली परत आणणारी स्त्री समजू लागतात, जी बदला घ्यायला आली आहे.  


शेखरची होणारी पत्नी प्रियांका आणि तिची मैत्रीण हेसुद्धा यात महत्त्वाचे कॅरेक्टर आहे. तसेच शेजारी राहणारे ज्योतिष काका, गोखले काकू, जिचा पती दुबईत राहतो अशी एक महिला उषा आणि तिचा मुलगा, कचरा वेचणारा माणूस आणि त्याची मुलगी, हॉस्पिटल मधली नर्स, वॉर्ड बॉय, पोलिस इन्स्पेक्टर, आणि या सर्व प्रकरणात अनेक पात्रांवर लपून छपून पाळत ठेवणारा एक रहस्यमय दाढीवाला माणूस ज्याचे डोक्यावरचे केस भरकटलेले आहेत, अशी अनेक पात्रे यात महत्त्वाची भूमिका बजावतात. 


सूर्याला ग्रहण लागले की तो त्याचे कार्य (प्रकाश देण्याचे) नीट करू शकत नाही. तसेच मनाला एखाद्या गृहितकावर आधारित संशय घेण्याचे ग्रहण लागले की, मन आणि बुद्धी नीट काम करेनासे होतात आणि मनाला ते संशय कणाकणाने कमजोर बनवतो. मन खंगावते आणि ग्रहण मनाला पूर्ण गिळते. जसे खग्रास ग्रहण सूर्याला ग्रासते. 


या सिरीयल मध्ये अशी मनाला ग्रहण लागलेली अनेक पात्रे अंदाजे 80 ते 85 एपिसोड पर्यंत ग्रहणाच्या फेऱ्यातच जगत असतात आणि एक मानसतज्ञ अमेरिकेतून उगवतो आणि त्यांना या मानसिक ग्रहणाच्या भ्रमातून अगदी विश्वास वाटणार नाही इतक्या सहज पद्धतीने दूर करतो आणि त्यानंतर मग मुख्य रहस्य उलगडते. पण तोपर्यंत पात्रांचे जे नुकसान व्हायचे ते झालेले असते. खरे तर ते नुकसान होणे का आवश्यक असते हे तुम्हाला सिरीयल बघतांना कळेलच! सासू सून अँगल विथ ए वेरी डीफरंट टच!


आणि शेवटी जो मुख्य रहस्याचा भेद केला आहे (म्हणजे रमा नेमकी असते तरी कोण आणि कुठून आलेली असते?) तो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पटतो, पण मग प्रश्न उभा राहतो की शेवटी शेवटी रमाचा शोध घेण्यासाठी करण्यात येणारे उपाय अगदी सुरुवातीला सुद्धा करता आले असते की! 


तसेच आधी सिरियलचा हॉरर फेज सुरू असताना दाखवलेले अनेक प्रसंग (कचरा वेचणाऱ्याच्या घरच्या पत्र्याच्या छतावर बाहुली सरकणे, एका भिकाऱ्याचा मृत्यू, रमा चिखलातून येणे, निरंजनची आई CD तोडून स्वतःला जखम करून घेते, रमा काही वेळेस एखाद्या ठिकाणी आली की तिथले लाईट उघड झाप होणे, रमा कुणाशीतरी बोलणे, महापालिकेचा जंतुनाशक फवारायला आलेला माणूस आणि रमाने त्याला घरात फवारण्यास सांगितले होते की नव्हते, रमा आणि मंगल यांचे कनेक्शन होते की नव्हते याचा नीट न झालेला उलगडा, काही बाबतीत काही गोष्टींना काहीच कारण नसतांना रमाचा होणारा विरोध) आहेत ज्यांचे शेवटी स्पष्टीकरण बिलकुल मिळत नाही. 


पण, काहीही असले तरी ही सिरीयल तुम्हाला दमदार अभिनयामुळे, चांगल्या बॅकराऊंड म्युझिक मुळे, चांगल्या कॅमेरवर्क मुळे, आणि खरोखर जमून आलेल्या अनेक हॉरर प्रसंगांमुळे अगदी शेवटल्या एपिसोड पर्यंत बघावीशी वाटते, सस्पेन्स टिकवून ठेवते. मालिका चांगली आहे. ती तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात नेते. तुम्ही त्यातील वातावरणात गुरफटले जाता. अशक्य आणि अविश्वसनीय भासणारी ही कथा दमदार अभिनयाच्या जोरावर सत्य वाटते. म्हणून ही मा

लिका बघायला हरकत नाही.

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली