आशा
काटेरी पायवाट आणि,
काळरात्र उगवली.
सावल्या संकटांच्या,
पावलोपावली.
आशेच्या दिव्याची,
ज्योत विझली.
मनातील धैर्याची वीण,
उसवू लागली
तेवढ्यात जिद्द जागी होऊन,
हट्टाला पेटली.
तिने विझलेल्या मनावर,
आशेची फुंकर घातली.
इच्छाशक्तीच्या निखाऱ्यांना,
हवा मिळाली.
निर्धाराने पावले,
ठामपणे पुढे चालू लागली.
Comments
Post a Comment