ध्यानधारणा म्हणजे नेमके काय?
ध्यानधारणा म्हणजे आपल्या मनाचे एकाग्रपणाने एखाद्या ठराविक गोष्टीवर, विचारावर, श्वासावर किंवा मंत्रावर लक्ष केंद्रित करणे. 'ध्यान' म्हणजे मनोवृत्तीचे एकाग्र होणे, तर 'धारणा' म्हणजे मनात एखाद्या गोष्टीची पकड ठेवणे. दोघांचा मिलाफ म्हणजे ध्यानधारणाz म्हणजेच मनाची चंचलता कमी करून आतल्या शांततेकडे वळणे.
ध्यान कसे करावे?
- शांत जागा निवडा म्हणजे कुठलाही व्यत्यय येणार नाही अशी जागा निवडा.
- सुटसुटीत कपडे परिधान करा जे शरीराला आरामदायक असावेत.
- योग्य आसन निवडा जसे पद्मासन, सुखासन किंवा कोणतेही स्थिर आसन घ्या.
- डोळे मिटा आणि श्वासावर लक्ष द्या. श्वास घेताना आणि सोडताना त्यावर लक्ष केंद्रित करा.
- मन भरकटल्यास, विविध विचार आले तरी घाबरू नका, पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करा.
- दररोज ठराविक वेळेस ध्यान करा. सुरुवातीला ५-१० मिनिटे, नंतर हळूहळू वेळ वाढवा.
ध्यानधारणेचे फायदे:
- मानसिक शांतता आणि स्थिरता मिळते. मन शांत होते, तणाव कमी होतो.
- मनाची एकाग्रता वाढते. अभ्यास, काम यामध्ये लक्ष लागते.
- चांगली झोप लागते आणि अनिद्रेची समस्या कमी होते.
- भावनिक संतुलन मिळते. राग, भीती, चिंता यावर नियंत्रण मिळते.
- स्वत:ची जाणीव होते आणि आत्मचिंतनास मदत होते.
- आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. रक्तदाब, हृदयगती यावर नियंत्रण राहते.
.png)
Comments
Post a Comment