हनुमान- एक् महानायक



भारतीय परंपरेत असाधारण महत्त्व असलेला चितरुण महानायक आहे हनुमान. मला एरवी हे पुस्तक माहिती नव्हते पण मराठीतून सोप्या भाषेत हनुमानाच्या सर्व कथा एकत्रित कोणत्या पुस्तकात आहेत याच्या मी शोधार्थ होतो, तेव्हा मला ॲमेझॉनवर हे पुस्तक सापडले.

हनुमाना विषयी परिचित आणि अपरिचित गोष्टी सांगणारे हे पुस्तक शुभ विलास यांनी लिहिले असून मराठी अनुवाद वैशाली जुंदरे यांनी केला आहे. यात 27 वैदिक कथा, 27 लोककथा असून भारतातील हनुमानाची 14 मंदिरे याबदल माहिती आहे.

यात हनुमानाच्या गोष्टींची आधुनिक शैलीमध्ये मांडणी लेखकाने केली आहे. लहान मुलांना सांगण्यासाठी सुद्धा हे पुस्तक उपयुक्त आहे. प्रत्येक कथेच्या शेवटी लेखकाच्या दृष्टिकोनातून कथेचा बोध दिलेला आहे. त्यामुळे हनुमानाविषयी सर्व काही जाणून घ्यायचे असल्यास या पुस्तकाला पर्याय नाही.

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली