दोन माठ
नवीन माठाला याचा अभिमान होता. तो दुसऱ्या माठाची नेहमी चेष्टा करत असे,
"काय उपयोग तुझा? अर्धं पाणी सांडतोस. शेतकऱ्याचं काम वाया घालवतोस."
जुन्या माठाला वाईट वाटत असे, पण तो शांत राहायचा.
एक दिवस शेतकऱ्याने जुन्या माठाला विचारले, "तुला माहितीय का, मी तुलाच नेहमी उजव्या बाजूला घेतो?"
माठ उत्तरला, "नाही, पण मी उपयोगी नाही, एवढे मला माहित आहे."
शेतकरी हसून म्हणाला, "तुझ्या बाजूने मी रस्त्याच्या कडेला फुलांची बी पेरली आहेत. तुझ्यातून सांडणारं पाणी त्यांना पोसतं, म्हणून त्या फुलांनी माझा रस्ता सुंदर केला आहे!"
तात्पर्य: प्रत्येकाच्या अस्तित्वाचं काहीतरी कारण असतं.

Comments
Post a Comment