वागणुकीत बदल करून ग्रहांना अनुकूल कसे करावे?
तुमच्या जन्मकुंडलीत प्रतिकूल असणाऱ्या ग्रहांना खालील प्रमाणे वागून अनुकूल करा.
शुक्र: चांगले कपडे घाला, वैयक्तिक स्वच्छता ठेवा.
गुरू: प्रत्येकाला फुकटात ज्ञान वाटू नका तसेच आपल्याला सर्वकाही कळते असे समजून सर्वांना सल्ले देऊ नका.
बुध: लोकांमध्ये असताना उगाच जास्त बोलू नका, फक्त नेमके तेवढेच बोला. विचारल्यावरच बोला. अतिविचार करू नका.
मंगळ: शरीर तंदुरुस्त आणि स्वस्थ ठेवा. व्यायाम करा. प्रत्येकाशी अरे ला कारे, लढण्याची वृत्ती ठेऊ नका.
सूर्य: प्रत्येक वेळेस प्रत्येकासाठी उपलब्ध राहू नका. स्वतःवर विश्वास ठेवा.
चंद्र: प्रत्येकच व्यक्तीमध्ये भावनिकरित्या गुंतू नका. सकारात्मक विचार करा.
शनि: प्रामाणिकपणाने वागा, शिस्त बाळगा आणि मेहनत करा. कर्म टाळू नका.

Comments
Post a Comment