उन्हाळ्यात काय काळजी घ्याल?
उन्हाळ्यात तापमान खूप वाढते, त्यामुळे शरीरात उष्णतेचा परिणाम होतो आणि पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे आरोग्य चांगले राखण्यासाठी खाली दिलेले काही उपाय उपयोगी ठरू शकतात:
- दररोज किमान ८-१० ग्लास पाणी तसेच लिंबूपाणी, नारळपाणी, ताक, सरबत प्या.
- ताजी फळे आणि भाज्या खा. तेलकट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाऊ नका.
- दुपारी १२ ते ३ या वेळात शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.
- गरज असल्यास टोपी, गॉगल्स, स्कार्फ वापरा.
- दररोज एकदा किंवा दोनदा आंघोळ करा.
- घामामुळे त्वचेला त्रास होतो त्यामुळे त्वचेची स्वच्छता राखा.
- शरीराला हवा खेळू देणारे कपडे निवडा, जसे की सूती आणि सैलसर कपडे.
- डार्क किंवा काळया रंगाचे कपडे वापरू नका.
- शक्यतो पांढरे कपडे घाला.
- गरम हवामानात व्यायाम टाळा, त्याऐवजी थंड हवेत (सकाळी लवकर किंवा संध्याकाळी) व्यायाम करा.
- लहान मुलं आणि वृद्ध यांची अधिक काळजी घ्या. त्यांना डिहायड्रेशन होण्याची शक्यता अधिक असते, म्हणून त्यांचे पाणी व आहार याकडे विशेष लक्ष द्या.
- एकदम कुलर किंवा एसी मधून बाहेर उन्हात आणि उन्हातून एकदम एसी किंवा कुलर मध्ये येऊ नका.
- बाहेरून उन्हातून आल्यावर लगेच थंडगार पाणी पिऊ नका. दहा मिनिटे थांबा. मग गुळाचा खडा खा आणि त्यानंतर पाणी प्या.

Comments
Post a Comment