अस्वस्थ वर्तमान
सकाळच्या चहाला जोडून,
वर्तमानपत्र उघडले.
आशेच्या किरणांची वाट बघत,
नकारात्मकतेचे शिडकावे सापडले.
पानापानावर रक्ताचे डाग,
असत्याच्या फासात अडकलेले.
हिंसा, कट, चिखलफेक,
दिवसाच्या प्रारंभी बघितलेले.
कोण देईल आशेचा किरण?
चांगुलपणाची नवी पहाट?
कधी हे शब्द बदलतील आणि
होईल सकारात्मकतेचा साक्षात्कार?
© निमिष सोनार, पुणे
Comments
Post a Comment