अशा लोकांपासून सावध रहा!



खाली दिलेल्या काही विशिष्ट प्रकारच्या लोकांपासून नेहेमी सावध रहावे, कारण आपल्याला त्यांच्याशी वागण्याचे धोरण ठरवणे कठीण जाते. अशा लोकांना शक्यतो प्रत्युत्तर देऊ नये. 

• समोरच्या व्यक्तीनुसार आपली विचारसरणी आणि तत्वज्ञान बदलणारे

• काहीही घडले तरी स्वतःकडे जबाबदारी न घेता दुतोंडी भूमिका घेणारे

• आपल्यालाच सर्व काही कळते असे समजून इतरांच्या मतांना तुच्छ लेखणारे 

• स्वतःला सर्वज्ञानी आणि सर्वश्रेष्ठ समजणारे 

• समोरच्या व्यक्तीला कशाचा त्रास होतो हे माहीत असूनही ती गोष्ट मुद्दाम घडवून आणणारे  

• समोरच्या व्यक्तीला त्रास देऊन दुखावून त्याला होणारी पीडा आनंदाने बघणारे 

• कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता बदला घेण्याची भावना ठेवणारे  

• समोरच्याचे ऐकून न घेता गैरसमज करणारे 

• आपलेच म्हणणे खरे करणारे

• उठता बसता गैरसमजातून इतरांना शिव्या शाप देणारे

आणखी एका सुभाषितात सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीने योग्य कारणासाठी जरी शाप दिला असेल, तरी व्यक्तीने कमावलेले अनेक  पुण्य आणि दैवी उपासना त्या शापाद्वारे खर्ची पडून नष्ट होतात. म्हणून, कुणी कसेही वागले तरी आपण त्याचे चांगलेच चिंतावे आणि कर्मसिद्धांताला आपले काम करू द्यावे. ज्याला त्याला आपल्या कर्माचे फळ बरोबर मिळते. ते आपण देण्याचा प्रयत्न करून आपले  चांगले कर्म वाया घालवू नयेत.


Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली