दी लिजेंड ऑफ हनुमान (सिझन 5)
अहिरावण वध, मकरध्वज आणि हनुमानाच्या पंचमुखी अवताराची कथा ("लिजेंड ऑफ हनुमान" सीझन फाइव्ह)
डिजनी प्लस हॉटस्टार वर 25 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज झालेल्या "लिजेंड ऑफ हनुमान" या सुंदररित्या बनवलेल्या पौराणिक वेब सिरीजच्या पाचव्या सिझनमध्ये रावणाचा मुलगा अहिरावणच्या वधाची कथा आहे. ही सिरिज मूळ हिंदीतून असून मराठी, बंगाली, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि तेलुगू या भाषेतही उपलब्ध आहे. राम आणि लक्ष्मण यांना अहिरावणने पाताळ लोकात पळवून नेलेले असते आणि त्यांना सोडवून आणण्यासाठी हनुमान जातो त्याची संपूर्ण कथा पाचव्या सीझनमध्ये आहे. ग्राफिक इंडियाने नेहमीप्रमाणे दर्जेदार ऍनिमेशन आपल्या समोर पेश केले आहे.

नेहमीप्रमाणेच घरातील सर्वांनी एकत्र बसून बघावा असा हा पाचवा सिझन आहे. विशेष करून सध्या बाल आणि कुमारवयीन असलेल्या पिढीला आपल्या पुराणांची माहिती व्हावी यासाठी त्यांना ही सिरिज पहिल्या सीझन पासून जरूर दाखवा. हनुमानाने पंचमुखी अवतार का व कसा धारण केला, तसेच हनुमानाचा मुलगा मकरध्वज त्याच्याशी का लढतो, तसेच मकरध्वज आणि पाताळलोकचा स्वामी अहिरावण यांचा काय संबंध असतो? अहिरावणला रावणाने लंकेतून पाताळ लोकात का हाकलून दिले असते? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला यात मिळतील.
राम आणि लक्ष्मण यांना अहिरावणच्या तावडीतून सोडवून आणण्याच्या प्रवासात हनुमानाला हर्षशृंग नावाचा एक योद्धा भेटतो, त्याची एक उपकथा यात आहे. तो हनुमनाला मदत करतो की फक्त तसे नाटक करतो? इंद्रजीतच्या मृत्यूनंतर त्याने रावणासाठी बनवलेले चिलखत कसे असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवता मिळवता थरारक एक्शन सीन्स बघण्यासाठी हा सिझन चुकवू नका. जय हनुमान!

Comments
Post a Comment