योग्य शरणागती कोणती?


भीतीसमोर शरणागती पत्करणे सोपे आहे, जेव्हा भविष्यात कोणकोणत्या गोष्टी चुकीच्या मार्गाने घडू शकतात यावर तुम्ही अति विचार (ओव्हर थिंकिंग) करता आणि सतत नकारात्मक बोलत राहता. तेव्हा तुम्हाला लवकरच तुमची भीती मोठी आणि अधिक वास्तववादी होताना दिसेल. मग, तुमची कृती आणि तुमची पावलेसुद्धा तुमच्याही नकळत तुमची भीती खरी करण्याच्या दिशेने वळू लागतात आणि तुमच्या भविष्याला अधिक प्रतिकूल बनवतात.

पण या उलटसुद्धा घडते!

आशा, उमेद आणि धैर्यासमोर शरणागती पत्करणे देखील सोपे आहे. भीतीसमोर शरणागती पत्करताना तुम्ही ज्या प्रकारे विचार करत होता, त्याच्या अगदी उलट पद्धतीने अति विचार (ओव्हर थिंकिंग) करा आणि सतत सकारात्मक बोला. भविष्यात गोष्टी किती आणि कशा चांगल्या प्रकारे घडू शकतात, तसेच कोणकोणत्या मार्गाने गेल्यास तुमच्या आशेनुसार गोष्टी घडतील याची सतत कल्पना करून आणि त्यानुसार कृती करून तुम्ही तुमच्या आशेसमोर आणि धैर्यासमोर सपशेल शरणागती पत्करू शकता. मग, सकारात्मक विचारसरणी ही भविष्याच्या प्रवासासाठी तुमचा पाया बनते आणि तुमच्या भविष्याला तुमच्यासाठी अनुकूल बनवते.

भितीचे बोट सोडा आणि आशेचे बोट पकडून चला. ती तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाईल.

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली