गावठी पुरी भाजी
साहित्य भाजी साठी: 5 मोठे उकडलेले बटाटे, अर्धी वाटी भिजवलेले वाटाणे, तीन मध्यम कांदे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, आलं एक इंच, कोथिंबीर मूठभर, एक छोटासा टोमॅटो, तेल, 1 चमचा भरून धना पावडर, 1 चमचा भरून कांदा लसूण मसाला, मीठ चवीप्रमाणे, लाला तिखट आवडीप्रमाणे, हळद जेमतेम पाव चमचा
साहित्य पुरी साठी: कणिक तीन वाट्या, 3 टेबल स्पून मैदा, 3 टेबल स्पून बारीक रवा, 2 टेबल स्पून मोहन (तेल), मीठ चवीप्रमाणे, साखर चिमूटभर.
कृती: कणिक रवा मैदा मोहन हे साखर मीठ घालून घट्ट पीठ भिजवून घेणे, झाकून ठेवणे. तोपर्यंत भाजीची तयारी आणि भाजी करूनही होते. तर मग आता भाजीसाठी कांदा, टोमॅटो, आलं, कोथिंबीर, मिक्सरमध्ये वाटून घेणे. 5 पैकी 1 बटाटा कुस्करून घेणे बाकीचे चिरून घेणे वाटाणा शिजवून घेणे. आता एक कढई घेऊन त्यात, तेल घेणे (किमान दोन डाव). तेल गरम झाले की लगेच जिरे घालून वाटण घालावे, ते परतून शिजले आणि आलं लसणीच्या वास गेला की त्यात हळद, लाल तिखट, धना पावडर, मीठ घालून घ्यावे व परतून घ्यावे. 1 मिनिटाने त्यात बटाट्याच्या फोडी, वाटाणे घालून दोन तीन वाट्या गरम पाणी घालावे आणि कुस्करलेला बटाटा घालून उकळी काढणे, कोथिंबीर घालून सर्व्ह करणे. आता भिजवलेल्या कणकेच्या लाट्या करून पुऱ्या करून तळून घेणे (ह्या पुऱ्या गार झाल्या तरी मऊ पडत नाहीत आणि चिवट होत नाहीत)

Comments
Post a Comment