कर्माधिकारी शनिदेव मालिकेतील निवडक प्रसंग: भाग 1 (मूषक वाहन)




कर्माधिकारी शनिदेव या शेमारू टीव्हीवर सुरू असलेल्या अतिशय उत्तम मालिकेत देवर्षी नारद हे काही कारणास्तव शनि देवाबद्दल मनातून प्रचंड आकस आणि द्वेष बाळगून असतात. अशा या देवर्षी नारद यांना शनि देवाची कथा पवनपुत्र हनुमान सांगत असतो. 

शनिदेव आणि यम या दोन्ही भावांना त्यांचे पिता सूर्यदेव जेव्हा स्वतःचे वाहन मिळवायला सांगतात त्यावेळीची गोष्ट सांगताना नारदाला देवांच्या वाहनांचा प्रतीकात्मक अर्थ सांगताना हनुमान गणेशाचे वाहन मूषक यांचे उदाहरण देतो. 

हनुमान म्हणतो, "मूषक हा प्राणी समोर आलेली चांगली वस्तू असो अथवा वाईट वस्तू असो, तो ती कुरतडणारच.

नारद म्हणतात,"हा तर त्याचा मूळ स्वभावच आहे तर त्याचे काय, हनुमानजी?"

हनुमान म्हणतो, "पुढे ऐका नारद मुनी. काही लोक असे असतात त्यांना प्रत्येक बऱ्या वाईट घटनेत आणि व्यक्तीत दोषच काढायची सवय असते. त्यांना सगळे जग आणि प्रत्येक व्यक्ती वाईटच दिसतात. अशा लोकांचे प्रतीक म्हणजे मूषक. आणि अशा मुषकाला गणेश नियंत्रित करून त्यांच्यावर बसतो. याचा अर्थ असा गणेशाची उपासना केल्याने बुद्धी स्थिर होते, सद्सदविवेक बुद्धीने मनुष्य विचार करतो आणि मूषकाप्रमाणे दोष काढत बसण्याची वृत्ती कमी होते!"


Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली