दैवी कृपेचा संबंध पंचम आणि नवम् स्थानांशी



लग्न कुंडलीतील पंचम स्थानावरून देवाविषयीचे प्रेम, श्रद्धा याचा विचार केला जातो आणि नवम् स्थान धर्मस्थान आहे पंचम व नवम दोन्ही मिळून दैवी शक्ती आणि ईश्वरी कृपेचा विचार होत असतो. पाहूया याबाबतचे विचार.

1. लग्नेश उच्चीचा असेल व त्यावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर.

2. दुसऱ्या स्थानाचा स्वामी उच्चीचा असेल आणि उच्चीचा गुरु असेल व त्याची दृष्टी द्वितीयेशावर पडत असेल तर.

3. द्वितीयेश उच्च असून पंचम, नवम किंवा एकादश स्थानात असेल आणि लग्नेश बलवान असून त्याच्या सोबत असेल तसेच द्वितीयेश ज्या स्थानात बसला असेल, त्याचा स्वामी केंद्रात असेल तर.

4. पंचम स्थानात जर रवी, मंगळ किंवा गुरु असतील किंवा या स्थानावर या ग्रहांची दृष्टी असेल तर.

5. दशमेश जर बुध असेल व त्यावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर.

6. नवमेश उच्चीचा असेल आणि त्यावर गुरु शुक्र चंद्र किंवा बुधाची दृष्टी असेल तर.

7. लग्नस्थानावर व लग्नेशावर नवमेशाची दृष्टी असल्यावर.

8. नवमेश चतुर्थ भावात असल्यास.

9. लग्नेश दशम स्थानात व दशमेश नवंस्थानात आणि त्यावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर.

10. कुंडलीत शनि व मंडळाच्या मध्ये सर्व ग्रह असल्यास.

11. कुंडलीत चंद्र आणि गुरूच्या मध्ये सर्व ग्रह असल्यास.

Comments

  1. जर कर्म सिद्धांत पूर्णपणे मान्य केला की, कर्तुत्व/कर्म आणि प्रारब्ध यानुसार जे होत आहे, झाले आहे आणि होणार आहे जे की टाळलेच जाऊ शकत नाही अशा वेळी ज्योतिषाचे स्थान काय?

    ReplyDelete
  2. भगवदगीता ही कर्म सिद्धांताची जनक आहे. कर्म सिद्धांत आपल्याला मागच्या जन्माच्या कर्माबद्दल असे सांगतो की त्याचे फळ पुढील जन्मात सुद्धा भोगावे लागते. मानव जन्मातील केलेल्या सर्वच कर्मांची फळे त्याच जन्मात भोगावे लागतात असे नाही. मानव जन्म मिळाल्यावर आपली जी कुंडली तयार होते ती मागील जन्माच्या कर्मानुसार या जन्मात मिळणाऱ्या फळांचा आरसा असते, मात्र ते भोगतांना या जन्मात नवीन कर्म करण्याची आपल्याला पूर्ण मोकळीक असते. ज्योतिषी आपल्याला त्या कुंडलीतील अर्थ उलगडून सांगतो. आता गीतेत कर्म बंधनातून मुक्त होण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. एक म्हणजे या जन्मात संसार कुटुंब न सोडता आणि या करत असलेल्या कर्माच्या फळाची अपेक्षा न करता चांगले कर्म करा आणि त्याचे फळ मिळाले तरी न घेता भागवंतांना अर्पण करा म्हणजे तुमचा सध्याचा मानव जन्म तुमचा शेवटचा जन्म ठरेल, आणि मागील जन्माच्या कर्माची फळे एकत्रित याच जन्मात भोगणे सुरु होईल आणि या जन्मातील कर्मांच्या फळासाठी पुढचा जन्म कोणत्याच प्राण्याच्या (आणि मानवाच्या) रूपात घ्यावा लागणार नाही म्हणजे आत्म्याला कोणतेही नवे शरीर धारण करावे लागणार नाही आणि त्या आत्म्याला कायमची मुक्ती मिळेल. पण भगवंत म्हणतात की लाखात फक्त एकच जण मुक्ती मिळवतो. दूसरा मार्ग आहे भक्तियोग. भक्ति करून मागील जन्माच्या कर्माचे फळ भोगण्याची तीव्रता कमी करता येते. तिसरा मार्ग म्हणजे कायमची मुक्ती नको असली तरीही या जन्मात ठराविक कर्म करून मागील जन्माचे वाईट कर्माचे फळ भोगणे रद्द किंवा कमी करू शकतो. हे करतांना जन्मकुंडलीनुसार मागील जन्मामुळे आलेल्या ग्रहस्थिती नुसार ज्योतिषी जे उपाय सुचवतात (उदा: गायीला खाऊ घालणे, पक्ष्यांना खाऊ घालणे, विशिष्ट देवाची भक्ति करणे वगैरे) त्यामुळे या जन्मात ठरलेल्या फळाच्या भोगपासून काही प्रमाणात तीव्रता कमी होते. आणि या जन्मातील केलेले सर्व चांगले कर्म पुढील जन्म प्राण्याचा न मिळता एखाद्या सिद्ध योगी पुरुषाचा मानवी जन्म मिळतो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली

आरोग्यदायी सांबार