कुंडलीवरून इष्ट दैवत कसे ओळखावे?



भक्तांच्या मनात नेहमी हा प्रश्न नेहमी पडतो की, माझे इष्ट दैवत कोणते आहे आणि मी कोणत्या देवतेची पूजा करावी? काही भक्तांचा आवडता देव शिव, तर कुणाचा विष्णू, कुणी राम, कृष्ण, हनुमानजी अशी उपासना करतात. काहींना तर एकामागून एक सर्व देवता आठवतात आणि ते सर्वांचीच पूजा, आराधना किंवा उपासना करतात. पण एक म्हण आहे ती इथे तंतोतंत लागू पडते: "एक ना धड भराभर चिंध्या" किंवा "एक साधै सब सधै, सब साधै सब जाय!" म्हणजे,"एक साधला तर सगळे साधले जातात, पण सगळेच साधायला गेलात, तर सगळेच निसटतात (म्हणजे एकही हाती येत नाही)"

आपणास माहित आहे की केवळ आपल्या इच्छित देवतेची पूजा-अर्चा केल्यानेच आपल्याला इच्छित फळ लवकर प्राप्त होते. ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून तुमच्या मागील जन्मातील दैवी शक्ती किंवा अधिष्ठाता देवता जाणून घेऊन आणि मंत्रजप केल्याने आपल्याला अपेक्षित परिणाम मिळतो. सर्व प्रथम श्री गणेश, मग आपले कुलदैवत आणि मग आपले आराध्य दैवत अशी पूजा करणे फलदायी असते.

कुंडलीद्वारे आपले इष्ट दैवत कोणते आहे ते ठरवण्यासाठी आपणांस पूर्ण ज्योतिषशास्त्र समजून घेण्याची आवश्यकता नाही. फक्त सोबत दिलेले चित्र बघा आणि तुमची जन्म कुंडली समोर धरा आणि मग लेख वाचायला सुरुवात करा. प्रत्येकाच्या कुंडलीत प्रथम ते द्वादश स्थान (घर) ठरलेले असते. पण त्या स्थानांत असणाऱ्या राशी आणि ग्रह वेगवेगळे असू शकतात. चित्रात दिलेल्या उदाहरणार्थ कुंडलीत प्रथम स्थानी 7 आकडा आहे, म्हणजे तूळ रास. मग पुढे क्रमाने 8 ते 12 आकडे लिहिले आहेत.तुमच्या कुंडलीत प्रथम स्थानी 1 ते 12 पैकी कोणताही आकडा असू शकतो. ते असतात राशीचे आकडे!

खाली दिलेल्या पाच पैकी कोणत्याही एका पद्धतीने आपण आपले इष्ट दैवत निवडावे. किंवा या पाचही पद्धतीमधून जास्तीत जास्त वेळा ज्या देवाचे नाव समोर येते त्यांची उपासना करा किंवा फक्त पाचव्या घराचा आधार घ्या कारण सर्वात योग्य परिणाम पाचव्या घरातून मिळतात.

(पद्धत1) कुंडलीतील पाचवे स्थान (सर्वात प्रभावी पद्धत):  

ज्योतिषशास्त्रात, जन्मपत्रिकेचे पाचवे घर मागील जन्मातील संचित धर्म, कर्म, ज्ञान, बुद्धिमत्ता, शिक्षण, भक्ती आणि उपास्य दैवत याबद्दल माहिती देते. यामुळेच बहुतेक विद्वान या घराच्या आधारे इष्ट दैवत ठरवतात. यात जो ग्रह असेल त्यानुसार देवता निवडा किंवा ग्रह नसेल तर राशीचा आकडा बघा आणि त्याचा मालक ग्रह कोणता आहे त्यानुसार देवता निवडा. खाली चार्ट दिलेला आहे.

(पद्धत2) कुंडलीतील नववे स्थान: 

काही लोक नववे घर आणि त्या घराशी संबंधित चिन्ह आणि चिन्हाचा मालक यांच्या आधारे इष्ट दैवत ठरवतात. नवव्या घरातून उपासनेची पातळी कळते. यात जो ग्रह असेल त्यानुसार देवता निवडा किंवा ग्रह नसेल तर राशीचा आकडा बघा आणि त्याचा मालक ग्रह कोणता आहे त्यानुसार देवता निवडा. खाली चार्ट दिलेला आहे.

(पद्धत3) कुंडलीतील प्रथम स्थान: 

हे व्यक्तिमत्व दर्शवते. यात जो ग्रह असेल त्यानुसार देवता निवडा किंवा ग्रह नसेल तर राशीचा आकडा बघा आणि त्याचा मालक ग्रह कोणता आहे त्यानुसार देवता निवडा . खाली चार्ट दिलेला आहे.

(पद्धत4) त्रिकोण भाव: 

त्रिकोण भाव म्हणजे प्रथम, पाचवा आणि नववा भाव, त्यांच्यामध्ये स्थित असलेल्या ग्रहांच्या आधारावर, जो ग्रह सर्वाधिक अंशांवर आहे त्यानुसार किंवा ग्रह नसेल तर या तीन घरांमध्ये स्थित राशीच्या स्वामी किंवा मालक ग्रहानुसार.खाली चार्ट दिलेला आहे.

(पद्धत5) आत्माकारक ग्रह: 

जन्मकुंडलीतील आत्माकारक ग्रहाच्या आधारेसुद्धा देवता ठरवावी. जन्मकुंडलीत स्थित नऊ ग्रहांपैकी, जो ग्रह सर्वोच्च अंशावर असतो तो आत्म्याची काळजी घेणारा ग्रह आहे. त्यानुसार देवता निवडा. खाली चार्ट दिलेला आहे.

देवतेची निवड खाली दिलेल्या चार्टनुसार करणे (कंसात राशीचा मालक ग्रह दिला आहे)

1- मेष (मंगळ) - हनुमान किंवा श्री गणपती

2- वृषभ (शुक्र) - भगवान शिव किंवा रुद्र देव / माता लक्ष्मी

3- मिथुन (बुध) - श्री गणपती किंवा दुर्गा माता

4- कर्क (चंद्र) - भगवान शिव किंवा रुद्र देव

5- सिंह (सूर्य)- गायत्री देवी किंवा भगवान विष्णू

6- कन्या (बुध) - श्री गणपती किंवा दुर्गा माता

7- तूळ (शुक्र) - भगवान शिव किंवा रुद्र देव आणि माता लक्ष्मी

8- वृश्चिक (मंगळ) - हनुमान किंवा श्री गणपती

9- धनू (गुरु) - भगवान विष्णू, ब्रम्हा किंवा श्री गुरुदेव दत्त

10- मकर (शनि) - भगवान शिव किंवा काळभैरव

11- कुंभ (शनि) - भगवान शिव किंवा काळभैरव

12- मीन (गुरु) - भगवान विष्णू, ब्रम्हा किंवा श्री गुरुदेव दत्त

राहू / केतू - दुर्गा देवी किंवा काळभैरव

तथापि, जर तुम्ही तुमची प्रमुख देवता काही कारणास्तव ठरवू शकत नसाल, तर कोणत्याही कारणाशिवाय ज्या देवतेकडे तुम्ही आपोआप सर्वात जास्त आकर्षित होत आहात, तीच तुमची प्रमुख देवता आहे असे मानून त्याची पूजा केली पाहिजे.




Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली