सर्व ईमोजीचा अर्थ जाणून घ्या
17 July जागतिक ईमोजी दिवस असतो. खाली काही लोकप्रिय इमोजी त्यांच्या अर्थासह दाखवले आहेत. आपणास एखाद्या ईमोजीचा अर्थ माहिती नसेल तर तो न वापरलेला बरा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे सर्व ईमोजीचा नेमका अर्थ काय ते जाणून घ्या!
♥️ समोरच्या व्यक्तीवर प्रेम आहे हे सांगण्यासाठी
😍 प्रेमाची अभिव्यक्ती करायची असल्यास तेव्हा तुम्ही हे इमोजी वापरू शकता! जेव्हा कोणी तुमच्याशी गोड बोलत असेल आणि त्या व्यक्तीबद्दल आकर्षण आणि प्रेम वाटत असेल तर याचा वापर करतात.
😘 ही प्रेम दर्शवणारी भावना आहे. बहुतेक वेळा "गुड बाय किस" दर्शवण्यासाठी याचा वापर करतात.
🥰 जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात बेधुंद असते तेव्हा, तसेच एखाद्या व्यक्तीला चेहऱ्यावर खूप किस मिळाले आहेत किंवा हवे आहेत हेसुद्धा हा चेहरा दर्शवतो.
😚 😙 डोळे बंद करून किस करणे.
🤗 हा एक सौहार्दपूर्ण हावभाव आहे जो प्रेम आणि मैत्रीच्या दृष्टीकोनातून आलिंगन (hug) साठी आमंत्रण दर्शवतो. जर तुम्हाला एखाद्याला आनंदाने मिठी मारायची असेल तर त्या वेळी हा इमोजी वापरला जातो. विरुद्धलिंगी व्यक्तीला हा इमोजी पाठवताना हजार वेळा विचार करा.
🥳 पार्टी दर्शवणारा ईमोजी. पार्टी साठी तुम्हाला खूप आनंद झाला आहे असे यातून दिसते.
🥺 कशाची तरी विनंती करून किंवा चूक झाल्यास रडवेला झालेला चेहरा.
😋 🤤 भूक लागल्यावर आणि तोंडाला पाणी सुटल्यावर याचा वापर करतात.
🤧 सर्दी आणि शिंका येत असल्यास
✌🏻 विजय मिळाल्यावर दर्शवायचे चिन्ह
😮 😲 आश्चर्य (positive किंवा negative ऐकल्यावर)
😞 😓 निराशा, दुःख आणि अपेक्षाभंग
🤟 याचा अर्थ "आय लव्ह यू" असा होतो
🤘 "तू खरंच खूप भव्य काम केले", you really rock असा अर्थ होतो.
😵 प्रचंड अविश्वास किंवा मृत्यू संदर्भात हा ईमोजी वापरतात.
🤌 जेव्हा मतभेद होतात तेव्हा "थोडे थांब जरा", "तुला म्हणायचे तरी काय आहे?" किंवा "तुला पाहिजे तरी काय नेमके?" हे दर्शविणारे चिन्ह
😫 दिवसभर खूप काम करून थकलेला
🤙🏼 "मला कॉल कर!" असे सांगणारे चिन्ह
🤬 एखाद्याचा खूप संताप आल्यावर त्याला शिव्या देणारा चेहरा
😏 मागे वळणारा इमोजी, तिरस्कार किंवा आक्षेपार्ह किंवा नाराजी म्हणून व्यक्त केलेला देखावा म्हणून वापरला जातो.
🤞 खोटं बोलल्यावर सॉरी म्हणायला लहान मुले हे वापरतात. तसेच भाग्याची साथ किंवा अपेक्षित सकारात्मक निकाल लागेल असे दर्शविणारे चिन्ह
🤩 एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला किंवा भव्य दिव्य ठिकाण, प्रसंग बघितल्यानंतर येणारी प्रतिक्रिया दर्शवणारा चेहरा
😶 "बोलायला शब्दच नाहीत!" असे दर्शवणारा चेहेरा.
👍 समर्थन / आवडले
👎 समर्थन नाही / आवडले नाही
🫣 "आता पुढे काय होईल ते मी बघू शकत नाही" असे सांगणारा चेहरा
👌 खूपच छान
😡 व्यक्ती किंवा परिस्थितीबद्दल नाराजी आणि राग व्यक्त करणारा चेहरा
😇 जेव्हा एखादी व्यक्ती चांगले कृत्य करते, तेव्हा त्याचा निर्दोषपणा व्यक्त करण्यासाठी वापरला जातो.
😂 जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल बोलता ज्यामुळे तुमचे डोळे पाणावतील तेव्हा तुम्ही ते या इमोजीद्वारे व्यक्त करू शकता. याला आनंदाचे अश्रू असेही म्हणतात.
🤫 चूप
👏🏻 टाळ्या
☝️ 🤚🏼✋ मला शंका आहे, प्रश्न विचारायचा आहे.
🙌 फोटो काढण्यालायक व्यक्ती किंवा प्रसंग, तसेच एखादी गोष्ट साजरे करणे असाही अर्थ होतो.
💥 दोन गोष्टींची टक्कर
💢 संताप
🙇 आदराने झुकलेला माणूस
🤣 जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीतून खूप हसायला मिळते तेव्हा तुम्ही ते या इमोजीद्वारे व्यक्त करू शकता. म्हणजे हसून गडाबडा लोळणे.
😭 जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी खूप रडावे लागते, तेव्हा तुम्ही ते या इमोजीद्वारे व्यक्त करू शकता.
😊 सर्वाधिक वापरलेले इमोजी! हा आनंदी हसरा चेहरा दर्शवितो!
😴 "झोप येत आहे!" असे दाखवणारा चेहरा
😃 हे इमोजी उघडे तोंड आणि गोल आकाराचे डोळे असलेले आहे. हा इमोजी सकारात्मक मूड तयार करतो!
😄 हा इमोजी सूचित करतो की हा खूप आनंदाचा प्रसंग आहे! आनंदाने इमोजीचे डोळे मिटले आहेत आणि खूप हसत आहेत!
😁 दात दाखवणारा हसरा चेहरा – हा इमोजी prank हसत आहे! म्हणजे एखाद्याशी आपण खोडकरपणा केल्यावर आपण त्याला हसतो तेव्हा.
😆 उघडे तोंड आणि डोळे मिटून हसणारा चेहरा – तेव्हा तुम्ही हे इमोजी वापरू शकता! जेव्हा काही विनोद चालू असतो आणि तुम्ही हसत असता.
😅 शांत स्मित आणि थोडा घाम गाळलेला हसरा चेहरा – जेव्हा कोणी तुम्हाला काही मजेदार गोष्टी सांगत असेल! आणि तुम्ही त्याच्या बोलण्यावर हसता.
😂 आनंदाच्या अश्रूंनी हसणे – जेव्हा कोणी तुम्हाला विनोद सांगते, तेव्हा तुम्ही तुमचे हसू थांबवू शकत नाही, तेव्हा तुम्ही या इमोजीचा वापर करू शकता.
🙄 वरती बघताना – जेव्हा तुम्हाला विनोद आवडत नाही! किंवा तुमची कोणतीही reaction नसते, किंवा कुणी एखाद्या चर्चेत वेगळाच असंबंध मुद्दा आणला म्हणून तुम्ही ही इमोजी वापरू शकता.
🙏 भारतात अर्थ नमस्कार. इतर देशांत दे टाळी.
😉 डोळे मिचकावलेला चेहरा – जर तुम्ही काही prank (खट्याळ, माकडचेष्टा) करत असाल आणि तुम्हाला काहीतरी मजेदार बोलायचे असेल तर तुम्ही हे इमोजी वापरू शकता.
🤨 उंचावलेला डोळा असलेला चेहरा – जेव्हा तुम्हाला काही योग्य वाटत नाही किंवा काही शंका असते! त्यानंतर तुम्ही हे इमोजी वापरू शकता.
🤪 वेडावलेला जीभ बाहेर काढलेल्या चेहरा – जेव्हा कोणी तुमच्या आजूबाजूला खूप अश्लील विनोद करत असेल किंवा तुम्ही स्वतः तसा विनोद केला त्यानंतर या ईमोजीचा वापर होऊ शकतो.
😏 विचित्र चेहरा – जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही, तेव्हा तुम्ही हे इमोजी वापरू शकता. किंवा जेव्हा कोणी तुमच्याशी फ्लर्ट करत असेल तेव्हा तुम्ही हे इमोजी वापरू शकता.
🤑 एखाद्या माणसाला खूप पैसे मिळाल्यावर तू खुश होऊन असा चेहरा पाठवतो
😈 मी एक दुष्ट व्यक्ती आहे आणि हसतो आहे असे सांगण्यासाठी हा इमोजी वापरतात
🤥 चॅटींग करताना एखादा खोटं बोलतो आहे असे लक्षात आल्यावर हा ईमोजी टाकतात
😔 निराश चेहरा – जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप दुःखी असाल आणि तुम्हाला ती गोष्ट आवडत नसेल तेव्हा तुम्ही हे इमोजी वापरू शकता.
😟 चिंताग्रस्त चेहरा – जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल तर तुम्ही हे इमोजी वापरू शकता.
😕 गोंधळलेला चेहरा – तुम्ही या इमोजीचा वापर करू शकता जेव्हा तुम्ही काय करावे या संभ्रमात असाल किंवा तुम्हाला काही समजत नसेल.
😭 रडणारा चेहरा – जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल आणि तुम्ही त्यामुळे रडत असाल तेव्हा हा इमोजी वापरा.
🥸 गुपचूप एखाद्या गोष्टीचा छडा लावत आलेला माणूस किंवा एखादी समस्या सोडवत असलेला माणूस
💀 अति नैराश्य आलेला माणूस
🤐 तोंडाला झीप/चेन लावलेला चेहरा. म्हणजे ग्रुप मधली चर्चा गुप्त ठेवा, कुणाला सांगू नका असा अर्थ होतो.
😠 रागावलेला चेहरा – जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल खूप राग येतो आणि तुम्हाला ते व्यक्त करायचे असते, तेव्हा तुम्ही या इमोजीचा वापर करू शकता.
😱 भीतीने घाबरलेला चेहरा– जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते, तेव्हा तुम्हाला खूप ओरडावेसे वाटते, तेव्हा तुम्ही ही इमोजी वापरता.
🤢 🤮 मळमळ किंवा उलटी होणे
🤔 विचार करणारा चेहरा – तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करत असाल तर तुम्ही हे इमोजी वापरू शकता.
🤭 तोंडावर हात ठेवून हसणारा चेहरा – जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर हसाल पण समोर दिसावे असे वाटत नाही, तेव्हा तुम्ही येथे इमोजी वापरू शकता. तसेच एखादी गोष्ट तुमच्याकडून बोलली गेली पण आता तुम्हाला परिणाम काय होतील किंवा काय प्रतिक्रिया येईल याबद्दल थोडी भीती आहे.
🥱 जांभई येणारा चेहरा
🥴 दारू पिऊन झिंगलेला चेहरा
😪 झोपलेला चेहरा – जेव्हा तुम्हाला खूप झोप येत असेल आणि तुम्ही झोपायला जात असाल तेव्हा तुम्ही हे इमोजी वापरू शकता.
😷 मेडिकल मास्क घातलेला चेहरा- आजच्या काळात मास्कचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. वेगवेगळ्या व्हायरलमुळे मास्कचा वापर वाढला आहे.
📍(पुश पिन) एखाद्या लोकेशन किंवा इव्हेंट कडे लक्ष दे असे सांगण्यासाठी किंवा आठवण करून देण्यासाठी
🙃 फ्लर्ट करतांना लाडाने उलटे होणे
🤓 पुस्तकी ज्ञान असलेला माणूस किंवा बुद्धिमान माणूस
😡 लाल चेहऱ्याचा रागावलेला चेहरा, खूप राग आल्यावर हा इमोजी वापरला जातो.
🤯 स्फोटक चेहरा – काही आश्चर्यकारक घडल्यानंतर या इमोजीचा वापर केला जातो.

Really nice information! 👍🏻
ReplyDeleteThank you
Delete