मराठीत संक्षिप्त बातम्या ॲप आहे पण...
आधन नावाचे एक ॲप आहे ज्यांनी मराठीतसुद्धा ही सेवा सुरू केली होती पण नेमकी या वर्षी मराठी राजभाषा दिवसापासून ती सेवा मराठीतून बंद झाली. आता त्यात फक्त इंग्रजी आणि हिंदी उपलब्ध आहे.
न्यूज बल्ब नावाचे पण एक ॲप आहे पण त्यात फक्त हिंदी आणि इंग्रजीच आहे. अशा अनेक ॲप्समध्ये हिंदीसोबत इतर भारतीय भाषा पण आहेत, पण मराठी नाही.
पण तुमच्याकडे जिओ नंबर असेल तर जिओ न्यूज नावाचे ॲप तुम्ही टाकल्यास तुम्हाला डावीकडे खाली सारांश म्हणून एक ऑप्शन दिसेल. तिथे मराठीत संक्षिप्त बातम्या वाचायला मिळतात. जिओचे त्याबद्दल आभार मानायला हवेत कारण त्यांनी एकूण दहा भारतीय भाषांमध्ये ही सोय उपलब्ध करून दिली आहे.
एवढेच नाही तर, त्यांनी या वर्षी आयपीएल क्रिकेटचे थेट प्रक्षेपण करतांना मराठी भाषेत कॉमेंट्रीचा (धावते वर्णन) पर्यायसुध्दा उपलब्ध करून दिलाराठी भाषेचा पर्याय होता.
दोनेक वर्षांपूर्वी स्टार प्लसने पण स्पोर्ट्स चॅनलसाठी मराठी कॉमेंट्री सुरू केली होती परंतु मराठी पर्याय कुणी निवडतच नाही असे कारण देऊन त्यांनी मबंद करून टाकला.
आता जियो मराठी संक्षिप्त बातम्या आणि कॉमेंट्री हे जर जास्तीत जास्त मराठी वाचकांनी आणि प्रेक्षकांनी वापरले नाही तर त्यांच्यावर पण मराठी भाषेचे ऑप्शन बंद करण्याची पाळी येईल. म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी मराठी माणूसच जबाबदार आहे असे वाटते.
आपणच आपल्या भाषेचा आग्रह धरत नाही!

Comments
Post a Comment