आवंडी
आवंडी हे श्री उत्तम चारोस्कर लिखित पुस्तक नुकतेच वाचून संपवले. पुस्तक छान आहे. आवंडी हे गावाचे नाव आहे. पुस्तक वाचून तिथेच गेल्यासारखे वाटते, इतके छान वर्णन आहे. आवंडीचा पाऊस, तिथला निसर्ग तसेच तिथल्या लोकांची जीवनशैली यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे.
पुस्तक वाचताना एकदा हातात घेतले की वाचल्याशिवाय सोडावेसे वाटत नाही. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील नाते सुद्धा चारोस्कर सरांनी खूप छान वर्णन केले आहे.
शाळेत जाताना निसर्गामुळे शिक्षकांना येणाऱ्या अडचणी आणि जंगलातून रस्ता काढत तेथे जाण्यासाठी असणारी तळमळ, विद्यार्थ्यांनी शिकून मोठे व्हावे म्हणून शिक्षकाची होणारी धडपड पाहून मन थक्क होऊन जाते. तसेच शिक्षकांप्रती लोकांच्या मनात असणारा आदर, तेथील आजीची शिक्षकांवर असणारी माया, प्रेम आणि आपुलकी यांचे छान वर्णन आहे.
तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी वर्ग यांचा शिक्षकांना असणारा सपोर्ट, गुरव साहेबांसारख्या कडक दिसणारा, पण आतून काळजी करणारा साहेब, बाहेरून फणसासारखा असला तरी आतून माणुसकीचे दर्शन होते.
शिक्षकांची बदली झाल्यावर विद्यार्थी व शिक्षक यांना एकमेकांविषयी वाटणारी मनाला हेलावून टाकते. यामुळे पुस्तकात विविधता आली आहे.
पुणे येथील वैशाली प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक एका वेगळ्या अनुभवासाठी जरूर वाचावे असेच आहे.
- सौ. मंजुषा सोनार

छान परिक्षण आहे
ReplyDelete