जोक्स




1. 

नवऱ्याने, बायकोला विचारले: 

“तुला हँडसम नवरा आवडतो की हुशार?”

बायको: “दोन्हीही नाही. मला तुम्हीच आवडता!”


2. 

पुणेकर v/s पुणेकर

पहिला पुणेकर - तुम्हाला आमरस देऊ की बासुंदी ? 

दुसरा पुणेकर - घरात एकच वाटी आहे का ?

3. 

नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.

बायको: एकटीच आली असेल?

नवरा: हो तुला कसं माहीत?

बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता.


4. 

लग्नाच्या पहिल्या रात्री- 

मुलगी: कृपया माझ्या जवळ नका येऊ तुम्ही!

नवरा: का काय झाले?

मुलगी: मी आईला वचन दिले आहे की, लग्नानंतर हे सर्व सोडून देणार आहे.


5. 

(अर्ध्या रात्री बेडरूम मधला टेलिफोन वाजतो.)

पती: कुणी माझ्याविषयी विचारले की मी घरी नाही असे सांग.

पत्नी फोन उचलते आणि म्हणते: माझे पती घरीच आहेत.

पती: मी सांगितलं होतं ना की, मी घरी नाही म्हणून सांग.

पत्नी: झोपा चुपचाप. प्रत्येक वेळेस का फक्त तुमचाच फोन असतो का?

(पतीची कायमची झोप उडाली!)

6. 

गुरुजी : काही समजले नसेल तर विचारा.

बंड्या : गुरुजी फळा पुसल्यावर, फळ्यावरील अक्षरे कोठे जातात?

(त्या दिवसापासून गुरुजी बाराखडी विसरले)

7. 

शिक्षक: "पृथ्वीवरचा सर्वात जुना प्राणी कोणता?

बदाम: "झेब्रा!"

शिक्षक: "का?"

बदाम: "कारण, तो अजूनही ब्लॅक अँड व्हाईट आहे!"


8. 

बंडू: बाबा बाबा, मला काल रात्री लय भारी स्वप्न पडलं. माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता.

बाबा: अशी स्वप्नं बघत जाऊ नकोस रे, पँट फाटेल.



9. 

बँकेतून मुलीला फोन येतो: "तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे का?"

मुलगी: "नको, माझ्याकडे बॉयफ्रेंड आहे!"


10. 

गुरुजी – गण्या 52 गावांची नावे सांग 

गण्या – चाळीसगाव आणि बारामती 

(गुरुजी राजीनामा देऊन वनवासाला गेले.)



11. 

नवरा बायकोचं भांडण चालू असतं.

नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर,

माझ्या मधला जनावर बाहेर येईल.

बायको: हा हा येऊ दे! ऊंदराला कोण घाबरतंय.



12. 

तो तिला म्हणाला, जीना सिर्फ मेरे लिए !

ती म्हणाली,“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते, तू ये जिन्याने !”

ती लिफ्टने गेली आणि लिफ्ट बंद पडली.



13. 

चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?

झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.

चिंगी: किती जण होते धावायला?

झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !



14. 

एका मैत्रिणीने Hi पाठवलं.

मी पण रीप्लाय दिला, Hi म्हणून..

तिने विचारलं, "काय चालू आहे?"

मी तिला सांगितलं, "2 ट्यूबलाईट, 1 फॅन, 1 टीव्ही, 1 मोबाइल आणि.... तू!"

डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव तिने मला!



15. 

चपटा चंगू: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे!

दिवटी दीपिका: आणि दुपारी?

चपटा चंगू: 1 ते 4 आराम. मी पुण्याचा आहे ना!



16. 

रामायण मालिका बघतांना राक्षसिणीला पाहून 

मुलाने विचारले : ही कोण ?

मम्मी म्हणाली : आत्या.

पप्पा म्हणाले : मावशी.

मग काय रामायण संपले 

आणि महाभारत चालू झाले!

17. 

नीता: माझे पती अगदी विसराळू झालेत.

मीता: का? काय झाले?

नीता: अगं, दर वेळेस तरुण मुलगी दिसली की लग्न झाल्याचे विसरतात.



18. 

डॉली: हॅलो पिझ्झा शॉप?

मॅनेजर: बोला मॅडम, काय ऑर्डर करायची आहे?

डॉली: मी सगळी तयारी घरीच केली आहे, फक्त आता पिझ्झा बनवायची रेसिपी सांगा.

(पिझ्झावाले गाशा गुंडाळून इटलीला परत गेले)



19. 


मित्राची बायको: आहो भावजी, मी गेले महिनाभर बघते आहे, माझे हे अगदी वेळेवर तयार होऊन ऑफिसला जातात. एकही दांडी मारत माहीत. बरेचदा लेट पण होतात.

मित्र: अहो वहिनी, कामावर श्रद्धा असली की असेच होणार!

मित्राची बायको: मग आधी नव्हती का यांची कामावर श्रद्धा?

मित्र: नाही ना, मागच्याच महिन्यात श्रद्धा जॉईन झाली आहे, रिसेप्शनिस्ट म्हणून. श्रद्धा कपूर नाही, दुसरी एक श्रद्धा नावाची मुलगी आहे.

मित्राची बायको: आऊ! बघते घरी आल्यावर आणि त्यांचं पक चिक पक राजा बाबू करून टाकते. 



20. 

राजू: अरे, पूर्वी दुकानात लिहिले असायचे: "ग्राहक देवता आहे", तेव्हा देव असल्याची फिलिंग यायची.

काजू: आणि आता लिहिलेले असते: "तुमच्यावर कॅमेऱ्यांची नजर आहे", तेव्हा चोर असल्याची फिलिंग येते.



21.


जोशी काकूंच्या दारावर चिंटू टक टक करतो.

जोशी काकू: कोण आहे?

चिंटू: मी.

जोशी काकू: मी कोण?

चिंटू: जोशी काकू.


22. 

पुण्यात एक नवीन माणूस आला आणि एक हॉस्पिटल शोधत होता.

तो एका पुणेकराला विचारतो, "काहो, हॉस्पिटलला कसे जायचे?"

पुणेकर: "त्या ट्रॅफिक असलेल्या रस्त्याच्या मधोमध उभे रहा!"



23. 

छदाम: पप्पा मला बुलेट घेऊन द्या ना.

बाप: काही वाटते का तुला? ती शेजारची मुलगी बघ, बसने जाते रोज!

छदाम: तेच तर बघवत नाही मला. तिच्याबद्दल काहीतरी वाटते म्हणूनच मागतोय ना मी बुलेट! हौ नं तर!



24. 

डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानंतर मन्या डोळे उघडतो तर त्याच्या डोळ्यावर गॉगल आणि दोन्ही हातांना प्लास्टर असतं.

मन्या: "डॉक्टर हाताना काय झालय? हातांना प्लास्टर का बांधले?"

डॉक्टर: "मोबाईल वापरू नये म्हणून!"



25. 


बायको लाडिकपणे नवऱ्याला म्हणते.

बायको: अहो, चला ना एखादा घाबरवणारा, थ्रिलर सिनेमा पाहू

नवरा : नको तू घाबरशील

बायको : मी लहान आहे का हो

नवरा : खरंच तू घाबरणार नाहीस?

बायको : अजिबात नाही!

नवरा : ठीक आहे, जा कपाटातून आपल्या लग्नाची DVD काढ.

(त्या दिवसापासून कॉमेडी पिक्चर लागला तरी नवरा घाबरत राहतो)



26.

मुलगीः मला एका मुलाने गालावर किस केलं.

आई : मग त्याला कानाखाली मारलीस की नाही ?

मुलगी : नाही आई, मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.



27. 

वडिलांनी बंडूची झडती घेतली तेव्हा सिगरेट, दहा मुलीचे मोबाईल नंबर निघाले. वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले.

आणि म्हणाले, "केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?"

बंडू रडत रडत म्हणाला, "बाबा ही पँट माझी नाही, तुमची आहे!"

हे ऐकून घरातली मोलकरीण हातातील लाटणे घेऊन धावत आली आणि बंड्याच्या वडिलांना म्हणाली, "आसं होय! थांबा. बघतेच तुम्हाला!"



28. 

बायको: अहो ऐकलंत का, बऱ्याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना! आज रात्री मी ती पुरी करणार आहे.

नवरा: ठीक आहे, मी श्रीखंड घेऊन येतो.



29. 


मुलगा : आई मी अभ्यास करता करता TV बघू का ? 

आई : बघ, पण चालू नको करू!
 

30. 

एक माणूस: "डॉक्टर मला काय झाले?"

डॉक्टर: "सोनोग्राफी करावी लागेल तेव्हा समजेल!"

माणूस: "डॉक्टर मी गरीब माणूस आहे. तांबेग्राफी नाहीतर चांदीग्राफी करा ना!"



31.  

मुंबईकर: तुमच्या वडापावमध्ये चटणी का लावत नाहीत ?

पुणेकर: आमच्या जिभेलाच जन्मजात लावलेली असते!



32. 

मुंबईकर काकू : आमचे हे काट्याने जेवतात.

पुणेकर काकू : आमचे हे मुकाट्याने जेवतात.



33. 

एक पुणेकर आरशात बघून स्वतःलाच नमस्कार करत होता

मुंबईकराने विचारले, "हे असं काय करतोय?"

पुणेकर म्हणाला, “आज गुरुपोर्णिमा आहे ना, आम्हीच आमचे गुरु आम्हाला कोण शिकविणार?”



34. 

प्रियकर: मला कळत नाही, तुझ्या घरचे आपल्या लग्नाला एवढ्या लवकर कसे तयार झाले.?

प्रेयसी: त्यांनी मला विचारलं, पोरगं काय करतं?

मी बोलले, पोटात लाथा मारतं.!!



35. 

चुडामण पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.

मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?

चुडामण : ते नंतर, आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या. मग बसू !!



36. 

डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?

नवरा: बरं वाटतंय तिला आता, आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय…!



37. 

बायको: रविवारी फिरायला जाऊया का?  

नवरा: हो.

ती: मला महागड्या जागी घेऊन चला.

तो पुन्हा हो म्हणाला आणि तिला पेट्रोल पंपावर घेऊन गेला.



38. 

मुलगी फेसबुक वर स्टेटस टाकते.

"हॅलो फ्रेन्ड्स,  मी मावशी झाले"

बंड्याने खाली कॉमेंट टाकली.

"कोणत्या हाॅस्पिटलला? किती पगार आहे?"

तिने बंड्याला ब्लॉक केले.

बंड्याचा प्रामाणिक प्रश्न: माझं काय चुकलं??



39. 

गण्या : काय रे तुझे आणि तुझ्या बायकोचे भांडण मिटले का?

मन्या : हो. गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे..

गण्या : हो का.?

मग काय म्हणाल्या रे वहिनी...!

मन्या : कॉटच्या खाली लपू नका, या बाहेर. मारणार नाही मी.



40. 

प्रियकर: मी तुझ्या बरोबर लग्न नाही करू शकणार...

प्रेयसी: का ?

प्रियकर: घरचे विरोध करतात...

प्रेयसी: घरी कोण कोण आहेत ?

प्रियकर: बायको आणि दोन मुले...



41. 

त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या,

ज्या, सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या की,

"सर आज तुम्ही होमवर्क चेक करणार होता ना??"



42. 

सरदार: डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,

झोपून उठल्यावर झोप येत नाही, काय करू?

डॉक्ट:  रात्री उठून सूर्याच्या उन्हात येऊन बसत जा, सगळे ठीक होईल!



43. 

टिचर - कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा !

गण्या - आलिया भट्ट...

टिचर - माकडा ! वर्गाच्या बाहेर हो  !

मक्या - ओ मॅडम, बोबडा आहे तो...

त्याला ' आर्यभट ' म्हणायचंय !



44. 

तीन जण एका पलंगावर झोपलेले असतात.

पहिला - खूप अडचण होत आहे.

दूसरा - हो ना.

तीसरा - मला पण!!

तीसरा खाली जाऊन झोपतो.

दूसरा - ए! येडपट. ये वर आता! जागा झाली बघ!!



45. 

मुलगी : तुझी आठवण येतेय!

मुलगा : अजून पगार झाला नाही.

मुलगी : अच्छा चल बाय!



46. 

नवी नवरी सासूच्या पाया पडते

सासू – सुखी राहा

सून – तुम्ही राहू देणार का ?

(सासू मनात म्हणते, "थांब तुझ्या मागे राहू लावते!)



47. 

सासू – सुनबाई हात मोकळे आहेत. चांगलं नाही वाटत!!

सून – मोबाईल चार्जिंगला लावला आहे आई.

सासू – अगं बैजा भवाने, बांगड्यांबद्दल बोलते आहे मी.



48. 

बायको – दोन किलो वाटाणे घेऊ का?

नवरा – हो घे ना

बायको – तुझा सल्ला नाही मागितला रे, यासाठी विचारतेय की, तू इतके सोलू शकशील की नाही, का कमी घेऊ? 



49. 

काल एका जुन्या मित्राला चार पाच वेळा कॉल केला 

पण त्याने उचललाच नाही!

मग आज मी एक मेसेज पाठवला ...

आपल्या वर्गातील 'मंदाकिनी' आठवते ना!

ती काल भेटली होती. 

तुझा नंबर विचारत होती. देऊ का ?

सकाळपासून किमान 15 वेळा फोन केला पठ्ठ्याने. 

मग काय.. मी पण उचलला नाही!

50.  

टिचर: बंडया तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?

बंडया: बाई मी गरीब घरचा आहे. मला “Whatsapp” सारख्या गोष्टी परवडत नाहीत.

(गुरुजी मार्क झुकेरबर्गकडे बंड्यासाठी इंटरनेट मागायला गेले)



51. 

गुरुजी- दळणवळण म्हणजे काय?

विद्यार्थी- एखादी मुलगी दळण घेऊन जाताना तिच्या शरीराची विविध वळणं दिसतात ना, त्याला दळणवळण म्हणतात.

(गुरुजीनी त्याला चक्की पिसायला पाठवले)



52. 

बायको – माझं नशीबच फुटकं म्हणून तुमच्यासारख्या मूर्ख माणसाशी माझं लग्न झालं!

नवरा – मी नक्कीच मूर्ख आहे, कारण तुझ्याबरोबर लग्न करण्याचा मूर्खपणा माझ्या हातून घडला!



53. 

नवरा आपल्या चिडलेल्या बायकोला रोज फोन करतो

सासू – तुला किती वेळा सांगितलं की ती आता तुझ्या घरी येणार नाही, मग रोज का फोन करतोस?

जावई – ऐकायला खूप बरं वाटतं म्हणून…



54. 

भारतीय पत्नी अतिशय संस्कारी असते. ती कधीच आपल्या नवऱ्याला सगळ्यांसमोर ‘अरे गाढवा’ ‘ओय गाढवा’, ‘ऐक अर्थात सुनो गधे’ असं म्हणत नाही

त्याऐवजी ती संक्षिप्तमध्ये ए. जी./ओ. जी./सुनोजी असं म्हणते



55. 

बायको – कशी दिसते मी

नवरा – एकदम प्रियांका चोप्रासारखी दिसतेस 

बायको – खरंच? डॉनमधली की क्रिशमधील?

नवरा – बर्फीवाली

मग काय मेरी कॉम बनून नवऱ्याला धू धू धुतलाय बायकोने 



56. 

सर्वात छोटा जोक 

नवरा – मला कविता आवडते

बायको – मला पण विनोद आवडतो 



57. 

शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते?

बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.?

(शिक्षकांनी कोरड्या विहिरीत उडी मारली)



58. 


गुरूजीः शाळेत का नाही आलास? पाऊस तर थांबला होता.

गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते.. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा!



59. 

भाऊ : पाणी दे ना

बहीण : स्वतः ऊठ आणि घे

भाऊ : दे ना गं

बहीण : परत मागितलंस ना तर कानाखाली मारेन

भाऊ : जेव्हा कानाखाली मारायला येशील तेव्हा दे पाणी.



60. 

BF: मला तुझे दात खूप आवडतात.

GF: अय्या खरंच का रे?

BF: कारण Yellow माझा फेवरेट कलर आहे.



61. 

एक गरोदर बाई डॉक्टरकडे जाते,

डॉक्टर तिला विचारतात, "कितवा महिना?"

बाई म्हणते, "आठवा!"

डॉक्टर म्हणतात, "मी कसा आठवू? तुम्हीच सांगा."



62. 

एक मित्र दुसऱ्या मित्राला उद्देशून-

पहिला – अरे यार माझ्या तर डोक्याला ताप झालाय.

माझी बायको माझ्याकडून एका किसचा 1 रूपया घेते.

दुसरा – अरे खूपच नशीबवाना आहेस की तू, इतरांकडून तर ती 5 रूपये घेते.



63. 

एक मुलगा पाणी पुरीवाल्याला म्हणतो: “भावा हे इंजिनिअरिंग कॉलेज कसे आहे ?"

पाणी पुरीवाला: “एकदम जबरदस्त आहे. मी पण इंजिनिअरिंग इथेच केलेली आहे !"



64. 

गुरुजी – काय रे वर्गात डुलक्या देतोयस?

विद्यार्थी – नाही गुरुजी, गुरुत्वाकर्षणामुळे माझे डोके आपोआप खाली पडत आहे.

(गुरुजी पृथ्वी सोडून गेले.)



65. 

रजनीकांत – हेलो मी रजनीकांत बोलतोय.

मुलगा – हो मला माहित आहे बोला.

रजनीकांत – तुला कसं कळलं, मी काॅल केला म्हणुन?

मुलगा – माझा मोबाइल स्विच ऑफ होता.



66. 

मुलगा : आई तुझ्या नजरेत माझी काय किंम्मत आहे...?

आई : तु माझ्या साठी लाखात नाही करोडात एक आहे...!

मुलगा : आई त्या करोडो मधले 200 रूपये दे नेटपॅक टाकायचा आहे...!



67. 

नवरा – या व्हॅलनटाइन डे ला काय गिफ्ट देऊ?

बायको – मला एक रिंग द्या.

नवरा – लॅडलाईन वरुन का मोबाईल वरून.



68. 

बंडयाचा बाप त्याला सांगत असतो.

"कितीही झालं तरी मुलापेक्षा नेहमी बापच हुशार असतो!"

बंड्या- "अच्छा मग सांगा बरं, फोनचा शोध कुणी

लावला?"

बाप – "ग्राहम बेल!"

बंड्या- "मग त्याच्या बापाने का नाही लावला?"

15 दिवस झाले बाप अजुन पोराला मारतोय.

 

69. 

पत्नी – "आपण लपाछपी खेळूया! मी लपते आणि तुम्ही मला शोधायचं .जर मी सापडले तर आपण शॉपिंगला जायचं."

आज दोन दिवस झाले बायको स्वतः नवऱ्याला इकडे तिकडे शोधत फिरतेय.



70. 

बंडू: रजनीकांतने एकदा भारतात बसून पाकीस्तानातला आतिरेकी मारला

खंडू: कसा?

बंडू: मोबाईल वरून Bluetooth ने.



71. 

दया – अरे देवा याचा मृत्यू झालाय!

एसीपी – याचा अर्थ याचा मृत्यू झाल्याने हा मेलाय.

साळुंखे – नाही बॉस याचा मृत्यू मरण्याने नाही, तर जीव गेल्याने झाला



72.  

सीआयडी ऑफिसात-

दया – सर बॉडीजवळ हे पेन मिळालं

एसीपी – दया बस झालं आपलं काम, आता फक्त या गोष्टीचा शोध लावायचा आहे की, मुंबईमध्ये कोण कोण पेन वापरतं?



73. 

सीआयडी ऑफिसात-

मुलगी (मेलेल्या डेड बॉडीकडे बघत):  राहुल माझा भाऊ होता!

अभिजित: काय? राहुल तुझा भाऊ होता?

मुलगी: हो हो हो माझा भाऊ होता.

दया: खरंच राहुल तुझा भाऊ होता ?

मुलगी: हा सर तो माझा भाऊ होता 

एसीपी: माय गॉड! याचा अर्थ तू राहुलची बहीण आहेस.

मेलेली डेड बॉडी: आता बास करता की CID ऑफिसला आग लावू?



74.  

पत्नी: अहो चहा कसा झाला आहे?

पती: छान मस्त.

पत्नी: पण आपले चिरंजीव म्हणत आहेत की चहा बेकार झालाय.

पती: लहान आहे तो. लग्न नाही झालंय अजून त्याचं. लग्न झाल्यावर कळेल त्याला.



75. 

सीआयडी ऑफिसात-

अभिजीत: उद्या गुरूवार आहे

एसीपी: याचा अर्थ कळला का दया?

दया : नाही सर?

एसीपी: याचा अर्थ उद्या शुक्रवार नाहीये.



76.  

लीना: तुझा नवरा प्रत्येक शनिवारी रात्री मित्रांबरोबर शिकारीला जातो असं सांगून जातो पण काय भरवसा रात्र कुठे घालवतो?

मीना (निश्चिंतपणे): असं काही नाही. कारण ते नेहमी तोंड पडून रिकाम्या हाती परत येतात.



77. 

शिक्षक : सांग माकडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

गण्या : मंकी.

शिक्षक : खरं सांग पुस्तकात बघून बोललास ना.

गण्या : नाही सर देवा शपथ.

मी तुमच्याकडे बघून बोललो !



78.  

पत्रकार: कल शाम आपने क्या किया?

रामदास आठवले: पोहे

पत्रकार: वा! हमें भी खिलाओ कभी. पोहे तो हमें भी पसंद है.

रामदास आठवले: अरे बाबा, वो वाले पोहे नही. कल हम स्विमिंग पूल मे पोहे. पहले पाणी मे “शिरा”, और बाद मे “पोहा”, इतना आनंद आया की उसको कुछ “उपमा” च नही.



79.  

डाकू राजपाल यादव: आम्ही तुमचे घर लुटायला आलो पण येताना बंदूक विसरलो.

गृहस्थ परेश रावल: काही हरकत नाही. तुम्ही सज्जन लोक दिसता. आज घर लुटून घेऊन जा. पण उद्या परत येऊन बंदूक जरूर दाखवा.

(डाकूने त्या दिवसापासून दरोडेखोरी सोडली आणि बँकेत कॅशियर म्हणून लागला)



80. 

नवरा: आज आपण "बाहेर" जेवू गं.

बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,

नवरा: हो. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.



81. 

सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की,

कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नका.

आत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन

उगाचच 5 किलोमीटर जाऊन आला !



82. 

मुलगी: माझे हृदय म्हणजे माझा मोबाईल आहे आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस..

मुलगा: राणी एक विचारू ?

मुलगी: हो विचार ना..

मुलगा: मोबाईल डबल सिमचा तर नाही ना ?



83. 

लहान मुलगा : आज्जी नमस्कार करतो.

पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय. आशीर्वाद दे. 

आज्जी : आशीर्वाद देते. पण सावकाश पळ रे बाबा ! पडशील बिडशिल नाहीतर!



84. 

एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,

तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,

बायको: काय आहे?

नवरा: या दोन वायरपैकी एक जरा धर,

बायको: हं धरली,

नवरा: काही जाणवलं का?

बायको: नाही,

नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे तर !



85.  

बायको: अहो एक सांगू का,

पण मारणार तर नाही ना?

नवरा: हो सांग ना,

बायको: मी गरोदर आहे,

नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे,

मग तू एवढी घाबरतेस का?

बायको: कॉलेजला असतांना ही बातमी बाबांना सांगितली होती,

तेव्हा त्यांनी मारलं होतं !



86. 

जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का?

नेने : हो, पण पैसे पडतील

जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी.



87. 

पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना

पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत

पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण

आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय?



88. 

भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना

पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?

भिकारी : हा आहे साहेब

पुणेकर : आधी ते खर्च कर.



89. 

देव आणि पतीदेव यांच्यात फरक काय?

देवाची आरती – सुखकर्ता दुःखकर्ता…

पतिदेवाची आरती – असेकर्ता तसेकर्ता आणि काकर्ता.



90. 

गर्लफ्रेण्ड: प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन.

बॉयफ्रेण्ड: का?

गर्लफ्रेण्ड: बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन, आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन.



91. 

मुलगी: नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा.

मुलगा: ते ठीक आहे पण आधी सांग मी तुझा कितवा?



92.  

मुलगीः माझा मोबाईल आता आईकडे असतो

मुलगाः मग तुझ्या आईने पकडलं तर?

मुलगीः तुझा नंबर मी लो बँटरी नावाने सेव केला आहे

तुझा फोन आला की आई बोलावते लो बँटरी झाली मोबाईल चार्ज कर.



93. 

पेपर सुटल्यानंरच्या प्रतिक्रिया:

दहावी अ : सगळं सोप्प होतं.

दहावी ब : काही प्रश्न सोपे होते.

दहावी क : बरा होता पेपर.

दहावी ड :  मॅडम काय दिसत होती.



94. 

गण्या नुकतच लग्न झालेल्या मित्राला मन्याला सांगतो: सुखी राहायचं असेल, तर नेहमी आतला आवाज ऐक.

मन्या: अरे काय बोलतोस? आजूबाजूला लोकं आहेत, अशा गोष्टी खासगीत बोल.

गण्या: अरे वेड्या, आतला आवाज म्हणजे स्वयंपाकघराच्या आतला आवाज, “अहो ऐकल का?”



95. 

भाऊ कदम धावत ऑफिसात जातो: साहेब, माझी बायको हरवलीय.

ऑफिसातील माणूस: हे बघा, हे पोस्ट ऑफिस आहे! पोलीस

स्टेशन नाही. तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा.

भाऊ कदम: च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाहीये.



96. 

भारतात बिस्कीट उत्पादन करणाऱ्या, दोन प्रसिद्ध कंपन्या:

१) मारी गोल्ड २) पारले जी,

एक कपात जात नाही, दुसरा कपात गेला की परत येत नाही.



97. 

गर्लफ्रेंडचे वडील: पगार किती तुला?

पप्पु: सोळा हजार

गर्लफ्रेंडचे वडील: माझ्या मुलीला मी पंधरा हजार पॉकेट मनी देतो..

पप्पु: तेच धरुन तर सोळा हजार आहे माझा पगार!



98. 

यमराज : बोल मानवा, तुला कुठे जायचं आहे, स्वर्गात कि नरकात?

मानव : देवा, पृथ्वीवरून माझा मोबाईल आणि चार्जर मागवून घ्या. मग मी कुठेपण राहायला तयार आहे!



99. 

इंग्लिश माणूस आजीबाईला: व्हॉट इज युवर नेम?

आजीबाई: महा काही नेम नाही भाऊ! आज हाय तर उद्या नाय!



100. 

चिंटुः आई परी आकाशात उडते का गं?

आईः हो.

चिंटु: मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात?

आईः अरे वेडया ती कशी उडेल? ती परी आहे का?

चिंटुः पण बाबा तिला तर परी म्हणतात.

आईः हो का! मग उद्या कशी उडवते तिला, बघच तू!! झाडूवर बसून चेटकीण बनून मी कशी उडते बघ तिच्या मागे.



101. 

लंडनमध्ये सिद्धार्थ जाधवच्या मिल्क सेंटर दुकानात एक ब्रिटिश माणूस जातो आणि दह्याकडं बोट करून विचारतो.

ब्रिटिश : व्हाट इज धीस?

सिद्धार्थ : धीस इज दही

ब्रिटिश : व्हाट इज दही?

सिद्धार्थ : मिल्क स्लीप अ‍ॅट नाइट आणि मॉर्निंग बिकम टाइट!

(हे ऐकून ब्रिटिश माणूस दारू पिऊन टाईट व्हायला निघून जातो)



102. 

गुरुजी: सांग ढेप्या, शून्यापेक्षा लहान संख्या कोणती?

ढेप्या: टिंब

(गुरूजींनी ढेप्याच्या टिंब टिंब वर गुलछडी मारली)



103. 

प्रेयसी: तू पूर्ण विश्वासाने सांगू शकतोस का, की माझ्याशिवाय तुझ्या आयुष्यात दुसरी कुणी नाही?

प्रियकर: आजच्या काळात हे शक्य तरी आहे का?

प्रेयसी: जर असे असेल तर हे नाते मी येथेच संपवते.

प्रियकर: ठीक आहे, माझी सगळी प्रेमपत्र मला परत कर.

प्रेयसी एक मोठा गठ्ठा त्याच्या समोर ठेवते आणि म्हणते, 

"यातील तुझी सगळी प्रेमपत्र निवडून घे!"



104. 

पत्नी: हा शर्ट खूप शोभून दिसतो तुम्हाला.

पती: तू कितीही मस्का मार, तुला ती नवीन महाग साडी मिळणार नाही.

पत्नी: तेच म्हणते मी. शर्ट चांगला आहे पण त्याच्या वर जे तुमचं तोंड आहे ते लय बेक्कार आहे.



105. 

हिंदी क्लास. 

लेडीज टीचर: "साली आधी घरवाली" या म्हणीचा अर्थ सांगा.

ढेप्या: ही एक फसवी स्कीम असते मॅडम. जी नवऱ्या मुलाला लग्नाआधी सांगितली जाते पण नंतर त्याचे फायदे दिले जात नाहीत.



106. 

प्रेयसी लाडात येऊन: खरं सांग, तुझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळ कोण आहे?

प्रियकर: फुफ्फुस!!



107. 

बायको: माझी सगळे स्किन ऑइली ऑईली झाली आहे काय करू?

नवरा: अगं विम बार लाव. तो सगळा चिकटपणा घालवतो.



108. 

इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलाने मोबाईलवर गेम खेळता खेळता आईला विचारलं,"अगं आई तडफड म्हणजे नेमकं काय? एका ठिकाणी हा शब्द मी वाचला होता.

आईने घरातील वाय-फाय चे बटन बंद करून टाकले आणि म्हणाली, आता तुझी जी स्थिती झाली आहे ना तीच तडफड.



109. 

गण्या: दिप्या तुला माहित आहे का रे अशी कोणती गोष्ट आहे जी मुलगी लग्न झाल्यावरच बनू शकते पण मुलगा लग्नाआधी सुधा बनू शकतो?

दिप्या: नाही रे बाबा मला नाही माहिती तूच सांग.

गण्या: मुलगी लग्न झाल्यावरच मामी बनू शकते परंतु मुलगा लग्न व्हायच्या आधी सुद्धा मामा बनवू शकतो.



110. 

गण्या आणि ढेप्या सुंदर मुलींवर लाईन मारत असतात तेवढ्यात टीचर त्यांना बघून त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात, "अरे बाबांनो लाईन मारताय का? बरं ! पण जरा तोंड बघून लाईन मारत जा!"

दोघांना खूपच आनंद झाला पण गुरुजी पुढे म्हणाले, "तोंड बघून म्हणजे तुमचं स्वतःचं तोंड बघून!!

(गण्या आणि ढेप्या आरसा विकत घ्यायला गेले)

111. 

गुरुजी: सांगा बरं मुलांनो, मासा का बोलू शकत नाही? 
बंडू: जर मी तुमचे तोंड पाण्यात बुडवून ठेवले तर तुम्हाला तरी बोलता येईल का? आले मोठे माश्याच्या बोलण्याची चिंता वाहणारे!
(गुरुजी शार्क मासा शोधायला समुद्रात निघून गेले) 

112. 

गबरू: नाशिक हे पुण्यापेक्षा मोठे शहर आहे!
गुरूजी: कसे काय?
गबरू: कारण नाशिक मध्ये सिन्नर आहे आणि पुण्यात जुन्नर आहे. (Senior Junior)

113. 

मराठी शिक्षक: तुम्हाला इंग्रजी येत नाही म्हणून नाराज होऊ नका. 
मुले: पण का सर?
शिक्षक: कारण इंग्रजांना तरी कुठे मराठी येतं? 

114. 

सासरा: हॅलो, तुमच्याकडे वादळ आहे का?
जावई: हो. कुलर समोर झोपलंय, उठवू का?

115. 

राजेशचा HR round सुरू होता.
HR: "We have flexible working hours. आमच्याकडे कामाचे तास लवचिक आहेत"
राजेश: "म्हणजे आम्ही केव्हा पण घरी जाऊ शकतो का?"
HR गोड हसून म्हणाली: "नाही! आम्ही तुम्हाला केव्हा पण ऑफिसला बोलवू शकतो, कितीही उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबवू शकतो आणि केव्हापण घरून काम करायला सांगू शकतो."

116. 

रेल्वे स्टेशनवर अनाउन्समेंट होते, "भारी वर्षा के कारण ट्रेन दर से चलेगी."
लहान मुलगा हे ऐकून आपल्या पप्पांना विचारतो, "पप्पा मग हे लोक त्या वर्षाला गाडीतून उतरवून का नाही टाकत? तिच्या वजनामुळे गाडी लेट होते आहे ना!"

117. 

मित्राच्या घरी गेलो असता त्यांच्या मुलाला सहज विचारले:  काय मग, पुढे काय करायचं ठरवलंय ?
तो मुलगा: काही नाही, तुम्ही गेलात की आम्ही आइस्क्रीम खाणार आहोत.

118. 

नवरीकडच्या लोकांनी लग्नपत्रिकेमधे स्पष्टपणे नमूद केले होते: कृपया दारू पिणाऱ्यांनी येवू नये!
नवरदेवच आला नाही.

119. 

बिट्टू: पप्पा, उद्या आपण मालामाल होऊ!
पप्पा: ते कसे काय?
बिट्टू: उद्या ना आमच्या गणिताच्या मॅडम आम्हाला पैशांचे रूपांतर रुपयात कसे करायचे ते शिकवणार आहेत.

120. 

शिक्षकाने मुलांना विचारलं: दिवाळीत नवीन काय शिकलात जे पुढे आयुष्यात कामाला येईल?
गण्या: सर, काडी लावायची आणि कसं पळून जायचं.

121. 

गण्या: पाच कवटी द्या!
मेडिकल वाला: काय? चिठ्ठी बघू!
अरे मेल्या, "पाचक वटी" आहे ते!

122. 

एक माणूस हॉस्पिटल मध्ये तीन आठवडे ॲडमिट होता.
त्यामुळे त्याचे नर्स वर प्रेम बसले.
ती तिला म्हणाला, "तू माझे हृदय चोरले. दिल चुरा लीया हैं तुमने!"
नर्स म्हणाली, "तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही तुम्हाला न सांगता तुमची किडनी चोरली, हृदय नाही!

123. 

तिचा मेसेज: 'तु ग्रेट आहेस'…
त्याने उत्तर दिलं: 'नाही, "तू" ग्रेट आहेस'
ती इतकी आनंदात आहे की त्या पुणेकराने फक्त व्याकरण दुरुस्त केलंय हे तिला सांगणार कोण?

124. 

डॉक्टर: माझ्या "शिफारशी" ने घेतलेल्या औषधाने पोट साफ झाले का?
गण्या: घेऊन बघितलं मी औषध, पण "शीफारशी" झाली नाही!

125. 

भोंदू: थॉमस एडिसनचा सतरावा नियम पण आहे गुरूजी!
गुरूजी: तो कोणता रे?
भोंदू: थंडीच्या दिवसांत एखाद्या माणसावर थंड पाणी फेकलं तर तो लगेच गरम होतो. 

126. 

पु.ल. - ' व्हता ' बरोबर की 'होता '?
श्रोता - अर्थात 'होता', 'व्हता' चूक!
पु.ल. - 'व्हता' चूक तर 'नव्हता' कुठून आलं? '' पाहिजे होतं ना. असो, एवढं सोपं नाही ते.

127.  

काही बायकांना  बोलताना अगदी भान राहत नाही. असेच एकदा काही महिला प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी गेल्या. पाहता पाहता उषाताई म्हणाल्या, "अहो ताराबाई, त्या गेंड्याकडे पाहून आठवण झाली. तुमच्या  मिस्टरांची तब्येत कशी आहे आता?"

128. 

बँक मॅनेजर: मॅडम, तुमचं अकाउंट हॅक झालं आहे. 
मॅडम: व्हॉट्स ॲप अकाउंट?
बँक मॅनेजर: नाही मॅडम, बँक अकाऊंट!
मॅडम: थँक गॉड, तुम्ही तर मला घाबरवून सोडलं होतं.

129. 

मित्र: गण्या, तू आमच्यासोबत दारू पिऊन घरी जातोस तेव्हा बायको काही बोलत नाही का तुला?
गण्या: बोलते ना. ती म्हणते की शेवटी किडे पडून मरणार आहेत तुमचे सगळे मित्र जे तुम्हाला दारू प्यायला बोलावतात.

130. 

महिला: भैय्या रेट कम करो ना. हम आपके है दुकान से तो हमेशा साडी लेते है.
दुकानदार: खोटं बोलताना देवाला तरी घाबर ताई! आमचे दुकान अजून कालच तर सुरू झाले आहे.

131. 

महिला मंडळ चर्चा:
शांताबाई: आमचा जावई भलताच देव माणूस हो!
गोपिकाबाई: कसे काय हो?
शांताबाई: आमच्या मुलीला तो भांडे घासायला मदत करतो.
गोपिकाबाई: आणि तुमचा मुलगा?
शांताबाई: तो लई वाया गेला आहे.
गोपिकाबाई: ते आणि कसे काय?
शांताबाई: अहो, खुशाल आमच्या सुनेला भांडे घासायला मदत करतो. बैल आहे नुसता बैल!

132. 

पत्नी: लाडू बनवण्यासाठी मी किती कष्ट घेतले माहित आहे का तुम्हाला?
पती: पण ते लाडू खाण्यासाठी मला त्यापेक्षा जास्त कष्ट पडत आहेत, त्याचं काय?

133. 

कॉलेज मध्ये:
बाबू: मन्या लेका, आपल्याला कोण लेडीज भाव देत नाही. 
मन्या: हा ना यार, त्यापेक्षा तो कुकर बरा.
बाबू: काय? कुकर? कसं काय रे?
मन्या: एक शिट्टी वाजवली की तो लेडीजचं लक्ष वेधून घेतो आणि दुसऱ्या शिट्टीत लेडीज त्याच्या जवळ जाते, काय समजलं का?

134. 

बायको: अहो तुमचा मित्र एका मूर्ख मुलीशी लग्न करतो आहे त्याला थांबवा ना.
नवरा: मी का थांबवू? मी तुझ्याशी लग्न केलं तेव्हा त्याने मला थांबवलं होतं का?

135. 

एक जावई सासुरवाडीला गेला आणि खाली जमिनीवर बसला.
सासुबाई म्हणाल्या, "अहो जावई बापू सोफ्यावर बसा ना."
जावई म्हणाला, "सोफ्यावर गरीब लोक बसतात आणि जमिनीवर श्रीमंत लोक!
सासुबाईंनी विचारले, "ते कसं काय?"
जावई म्हणाला, "सोफ्याची किंमत पंचवीस हजार आणि जमिनीची किंमत 25 लाख असते, काय समजलात?"

136. 

पाटील काकू: काय मग सागर, लग्न वगैरे कधी करणार आहेस?
सागर: लग्नाचं अजून माहित नाही, पण वगैरे करून झालं आहे.
पाटील काकू: (मनात) बरं झालं मी माझ्या मुलीबद्दल याला विचारणार होते, वाचले!
तात्पर्य: नको तिथे व्यक्त होऊ नका.

137. 

सोनू: माझ्या घरचे लई खतरनाक आहेत राव?
मोनू: का काय झालं?
सोनू: अरे सिरीयलमधली लव्ह स्टोरी पूर्ण नाही झाली तर रडतात आणि मी माझी लव्ह स्टोरी सांगितली की मला तुडवतात.

138. 

नवरा: आज ऑफिसला जाताना सेम टू सेम तुझ्यासारखीच बाई दिसली.
बायको: अरे वा. मग आवडली का ती तुम्हाला?
(आता हो म्हटलं तरी प्रॉब्लेम आणि नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम!)

139. 

गुड्डू: अलेक्सा, मला एखादी सुंदर पोरगी पटवून दे ना.
अलेक्सा: अरे रताळ्या, मलाच तू हफ्त्याने विकत आणले आहेस आणि तिचा खर्च कसा करणार?

140. 

टीचर : धैर्यवान कोणाला म्हणावे.?
दादा: एवढ्या कड़क उन्हाळ्यात सूट बूट नेसुन लग्न करायला जायचे व अग्निच्या साक्षीने 45 डिग्री तापमानात भावी वादळा सोबत सप्तपदी फिरायची त्याला धैर्यवान म्हणतात.

141. 

नवीन मोलकरीण: ताई, मला सगळ्या कामाची रूपरेषा सांगा ना.
मालकीण: मला ताई नाही म्हणायचं, (नवऱ्याकडे बोट दाखवून) ह्यांना दादा म्हणायचं!

142. गण्या: काय विचार करतोय रे मन्या?
मन्या: एक गोष्ट आहे ती बायकोला सांगू की नको हा विचार करतोय.
गण्या: माझ्या भविष्यात लिहिलंय की आज लग्नाचे योग आहेत.

143. 

पांडू: बायको खुश, तर नवरा खुश!
धोंडू: अरे पण जर आधीच नवरा खुश दिसला तर?
पांडू: मग बायको संशय घेते की, नवरा का बरं एवढा खुश?

144. 

बायको: तुम्ही मला अंधारात ठेवलं?
नवरा: अगं, घरात चांगले 4 बल्ब आणि 6 ट्युब लाईट आहेत तरीही मी कसं काय तुला अंधारात ठेवलं?

145.
 
बाई: "‌‌डॉक्टर माझ्या नवऱ्याने चुकून पॅन कार्ड गिळले आहे, काही तरी करा हो पटकन!"
डॉक्टर: "शांत व्हा! त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा. दोन्ही लिंक झाल्याशिवाय काही करता येणार नाही!"

146. 

भोळा भानू मला म्हणाला, "आरं मित्रा, मला एक कळत नाय त्या विंग्रजी गाण्यामंधलं!"
मी म्हणालो, "काय रं, काय कळत नाही?"
तो कमालीच्या निरागसतेने म्हणाला, "आता ह्यो बघ, एक विंग्रजी गाणं हाय, आ याम अ शिंगल लेडी, ओ ओ ओ ओ..."
"हो हो हो ... हो हो ... आहे ना गाणे, त्याचं काय?"
"आरं, म्हणायला तर शिंगल लेडी, शिंगल लेडी बोंब मारत्यात, आन् गाण्यात एक नाय तर तीन तीन लेडीज नाचतात, आन म्हणे शिंगल लेडी!"

147. 

संध्याकाळी पाच वाजेपासूनच अरुण कदम आकाशाकडे बघत बसला होता.
रस्त्याने भाऊ कदम जात होता. त्याने विचारले, "अरे दादानु ! कशाला आकाशाकडे बघतोय? ते बी एवढ्या उजेडात?"
अरुण कदम म्हणाला, "आरं गप बास ना येड्या! आज सुपरवूमन दिसणार हाये म्हणे आकाशात! तिला उजेडातच बघायचीय मला! सगल्यात आंधी!"
भाऊ कदम म्हणाला, "आरं! ते सुपरवूमन नाही, सुपरमून आहे, सुपरमून!!"

148. 

बायको- काय करतोयस?
नवरा - मी डास मारतो
बायको - आत्तापर्यंत किती मारले?
पती- पाच - 2 महिला 3 पुरुष
बायको - तुला कसं कळणार तो पुरुष आहे की मादी?
नवरा- दोन आरशावर बसले होती आणि तीन बियरच्या बाटलीवर!

149. 

गोमू: (व्हॉट्सॲप स्टेटस्) माझे फेसबुक अकाउंट हॅक झालेले आहे. कुणी त्यावरून पैसे मागितले तर देऊ नका.
खेमू: (त्याला चॅटवर रिप्लाय करतो) काळजी नको. तू समोर येऊन मागितले तरीही तुला देणार नाही.

150. 

तिकडम: काय रे, तुझे अजूनही लग्न कसे नाही झाले?
अकडम: भाग्य, दुसरे काय?

151. 

पाहुणे: मुला, कोणते शिक्षण घेतो आहेस तू?

मुलगा: MBA

पाहुणे: अरे वाह. काय अर्थ होतो त्याचा?

मुलगा: Master of Bachlors and Arts



152. 

शिक्षक: मुलांनो, हॉस्पिटल म्हणजे काय असतं?

अन्नू: गुरुजी, हॉस्पिटल म्हणजे पृथ्वीवरून स्वर्गात जाणाऱ्या रस्त्यावरचा टोल नाका असतो.

(शिक्षक हॉस्पिटलला ऍडमिट झाले)



153. 

नवरा: अगं मी बाहेर जातो आहे येताना काही घेऊन येऊ का?

बायको: येताना "घेऊन" येऊ नका. एवढेच करा फक्त!



154. 

डॉक्टर म्हणतात, "मी खात्री देतो की ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही चालत घरी जाऊ शकाल!"

रुग्ण पुणेकर असतो. तो म्हणतो, "अरे बापरे! मी चालत घरी जाईल म्हणजे रिक्षाने जाण्याएवढे पण पैसे माझ्याकडे उरणार नाहीत का? एवढा ऑपरेशनचा खर्च येईल का?"



155. 

नवरा: डॉक्टर मला बायकोचं बोलणं ऐकू येत नाही.काहीतरी करा! हा कोणता आजार आहे?

डॉक्टर: अरे वेड्या भाग्यवान आहेस तू. हा आजार नाही भगवंताची कृपा झालेली दिसते तुझ्यावर!



156. 

कोविड पूर्वी:

CID चा चित्रकार: "सांग कसा दिसत होता तो?"

प्रत्यक्षदर्शी: "थोडे मोठे डोळे, लांबट चेहरा, सरळ नाक, मोठी जाड मिशी!"

"हा चेहरा आहे का बघ तो? याला मी मिशी काढतो!"

"होय हाच!"

कोविड नंतर:

CID चा चित्रकार: "सांग कसा दिसत होता तो?"

प्रत्यक्षदर्शी: "थोडे मोठे डोळे आणि मास्क घातलेला!"

"हा चेहरा आहे का बघ? याला मास्क काढतो!"

"होय हाच तो!"



157.  

मी सीआयडी ऑफिसचा दरवाजा जोरजोराने ठोठावला आणि म्हणालो, "दरवाजा खोलो दया, नही तो तोड दूंगा! मुझे अभिजित और प्रद्युमन से मिलना है!"

आतमधून सिक्युरिटी गार्ड आला आणि म्हणाला, "अरे बाबा, हे सोनी टीव्हीचं ऑफिस नाही. खऱ्या सीआयडीचं ऑफिस आहे!" 

मी गोंधळात पडलो आणि म्हणालो, "म्हणजे इथे प्रद्युमन, अभिजित आणि दया रहात नाहीत?"

"नाही. आता निघ इथून लवकर!", त्याने धमकी दिली.

"कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है!", मी हातवारे करत म्हणालो आणि परत जायला निघालो.



158. 

डॉ साळुंखे: "फॉरेन्सिक रिपोर्ट के मुताबिक, ये आदमी मर गया है!"

अभिजित: "क्या?? इसका मतलब ये आदमी लाश बन चुका है!"

दया: "सर, तो फिर अब इस आदमी की जान निकल ग है!"

ACP प्रद्युम्न: "इसका मतलब साफ साफ है दया, की ये आदमी अब मर चुका है!"


159. 

ती: "सर, आज चक्क मी तुम्हाला बटाटेवडे खातांना बघतेय?"

तो: "चालतंय की!"

ती: "काहीही हं श्री!"

सीआयडी: "कुछ तो गडबड है, दया!'



160. 

मुंबईतील बेस्ट बस मध्ये प्रवाश्यांना किडनॅप करून चार बँक चोर ती बस निर्जन ठिकाणी घेऊन जातात आणि त्यांचा पाठलाग करत तिथपर्यंत आलेल्या CID ऑफिसर लोकांना तिथून पळून जाण्यासाठी वीस मिनिटांत हेलिकॉप्टर मागावतात नाहीतर बस मधल्या प्रवाश्यांना एकेक करून मारू अशी धमकी देतात तेव्हा, CID इंस्पेक्टर अभिजित काय म्हणतो माहिती आहे? 😁

तो म्हणतो, "अबे चूप! हेलिकॉप्टर क्या ट्रॅक्टर है जो बिस मिनिट में आ जायेगा?" 🤣

सूचना: ही सीआयडी च्या एका एपिसोड मध्ये घडलेली खरी घटना आहे! 🤔



161. 

सकाळी सकाळी बायकोचा हसरा चेहरा बघा. दिवस मस्त जातो.

-पु ल देशपांडे. 

मग बायको...... कुणाची पण असो!


162. 


डॉक्टर : हा बोला, कुठं दुखतंय..?

पेशंट : फी कमी करणार असाल तर सांगतो, नाहीतर शोधा!

163. 

पुण्यात हल्ली खूप चहाची दुकाने निघालीत..

येवले चहा

सायबा चहा

कडक चहा

हरमन चहा

मायेचा चहा

प्रेमाचा चहा.....

मी एका पुणेकराला सहज प्रश्न विचारला.

या सगळ्यात कोणता चहा चांगला?

तर तो म्हणाला... फुकटचा चहा!

164.

नवरा : मला आजपर्यंत समजलेले नाही की 

टीव्हीवर दररोज नवनवीन रेसिपीचा कार्यक्रम 

बघून सुद्धा घरी खिचडीच का होते ?

बायको: हेल्दी आहे ते...

सगळे जसे किंगफिशरचे कँलेडर बघून घरात 

कालनिर्णयच लावतात ना, तस्सेच असते हे सुद्धा!

165.

मुंबईकर: तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो?

पुणेकर: दिड दिवस !

मुंबईकर: किती हा चिकटपणा ?

पुणेकर: तुमच्याकडे किती दिवस बसतो ?

मुंबईकर : दहा दिवस 

पुणेकर : गणपती कशाची देवता आहे ? 

मुंबईकर : बुद्धीची !

पुणेकर : मग बरोबर आहे,

आम्हाला दिड दिवस पुरतो!

166.

दुकानदार - साहेब, काय देऊ?

ग्राहक - होणाऱ्या बायकोच्या कुत्र्यासाठी केक द्या!

दुकानदार - बांधून देऊ की इथेच खाणार? 


167.

हवामान विभागाची सूचना: 

मुंबईत समुद्राजवळ रहाणाऱ्यांनी 

कृपया धोतर व टोपी घालू नये! 

वादळ घुसलं तर पॅराशुट होईल!


168. 


पुण्यातील सोसायटीच्या बाहेर लागलेली पाटी: 

"अतिथि देवो भव" 

ही खरे असले तरीही 

"सर्व देवांना नम्र विनंती आहे की 

त्यांनी आपापली पुष्पक विमाने 

सोसायटीच्या बाहेरच पार्क करावीत!"


169. 

मुलगा- मी तुमच्या मुलीवर 10 वर्षांपासून 

प्रेम करतोय!

पुणेरी वडील - मग आता काय 

पेन्शन मागायला आलायस ?


170. 

स्थळ :- सदाशिव पेठ

गिऱ्हाईक : कर्ण यंत्र (कानाचे मशीन) केवढ्याला?” 

दुकानदार :- वीस रुपयापासून 

पाच हजार रुपयांपर्यंत आहेत!

गिऱ्हाईक :- वीस रुपयांचे बघू. 

दुकानदार:-  हे घ्या...

कानात एक बटण,

आणि कानातून  शर्टाच्या खिशात 

एक वायरचा तुकडा सोडायचा!" 

गिऱ्हाईक :- “हे कसं काम करतं?” 

दुकानदार  :- “काहीच काम करत नाही. पण ते बघून 

सगळे जण तुमच्याशी मोठ्याने बोलायला लागतील!

पुण्यात सर्वात जास्त खप असलेलं हेच एकमेव यंत्र आहे!"


171. 

कधी विचार केला का?

आपण

M सरळ 

आणि

W उलटे का लिहितो?

कारण

Men

सरळ विचार करतात

आणि

Women

उलटे!

172. 


काल मी लिफ्टने वर जात होतो, त्यावेळी एका बाईने 

लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला.

मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले: 

"दुसरा की तिसरा"?

बाईंनी रागानेच सांगितले,

आत्याचा मुलगा आहे.

माझे अजून लग्न नाही झाले!

173.

लॉकडाऊन पर्यटन!

पुण्यात पाटी लागली

स्विगी आणि झोमॅटोचा  ड्रेस भाड्याने मिळेल!   

मनसोक्त  फिरण्याचा आनंद घ्या!


174. 

शेजारच्या वहिनी बायकोला म्हणाल्या... 

तुमचे साहेब खूप हुशार आहेत. 

माझ्या चेहऱ्यावर मास्क असूनही 

मला ओळखलं व हसलेसुद्धा...!

आता घरातलं लॉकडाऊन आणखी कडक झालंय  ...!

175. 

बायको – चहा बनवू का?

नवरा – हा ठीक आहे

बायको – आलं घालून का?

नवरा – ओके

बायको – पुदीना घालू का?

नवरा – हा ठीक आहे

बायको – तुळस आरोग्यासाठी चांगली असते

नवरा – एक काम कर मोहरी आणि जिरे घालून त्याला फोडणी पण दे आता.

बायको – ठिक आहे, मग. तसेच करते. मात्र उद्या सकाळी कढी मध्ये बिस्कीट बुडवून खा.



176. 

CID ऑफिसात -

एसीपी: हा खून कोणी केलाय?

दया: हा खून खुन्याने केला आहे.

एसीपी: बरोबर! मला पहिल्यांपासूनच संशय होता की, खून खुन्याने केलाय. तू खूप हुशार आहेस दया.

हे ऐकून खून झालेला माणूस जिवंत झाला आणि एसीपीला दयेची याचना करू लागला, "अहो, लागल्यास मी सांगतो तुम्हाला माझा खून कोणी केला पण प्लीज असे डायलॉग नका बोलू!"

एसीपी: सांग बर मग तुझा खून कोणी केला?

जिवंत झालेला माणूस: खुन्याने!!

दयाने त्या माणसाला दरवाजा समजून मरेपर्यंत तुडवला.

177. 

तत्वज्ञानाची आवड असणाऱ्या कावळ्याने माठाला विचारले, 

"तुला आगीमधे भाजून तयार केलं जातं, 

तरीही तू एवढ्या तप्त वातावरणात, 

आपल्या आतलं पाणी इतकं शीतल, 

इतकं थंड कसं काय ठेवू शकतोस?" 

माठानं फारच सुंदर उत्तर दिलं...  

म्हणाला: बाष्पीभवन, उष्णता शोषण प्रक्रिया आहे ही! 

माझ्या पृष्ठभागावर जी सूक्ष्म छिद्रं आहेत, ज्यावर 

थर्मोडायनेमिक्सच्या नियमांनुसार 

कूलिंग इफेक्ट जनरेट होतो!

कावळ्याने मग मनाशी खुणगाठ बांधली की,

"इथून पुढे नको त्या चौकशा करायच्या नाहीत!"

कावळा कुठला होता माहित नाही पण... 

माठ पुण्याचाच होता!

178. 


स्थळ: शाळेचा वर्ग

वेळ: इंग्रजीचा तास

मास्तर: गण्या सांग Shall कधी वापरतात?

गण्या: थंडीत.

मास्तर: अरे वा? आणि may have म्हणजे काय?

गण्या: मांजरीला सर्दी झाली की ती असा आवाज काढते. Mayhave mayhave!! मेहॅव, मेहॅव!

(गुरुजी शाल पांघरून सर्दी झालेल्या मांजरीला शोधायला गेले)



179. 

आई: बेटा तू केस का कापत नाही?

मुलगा: फॅशन आहे आई.

आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय, "लहान मुलगी पसंत आहे म्हणून", आता जा नांदायला!


180. 


सध्या करोना म्हटलं की 

लोकांना लगेच "काळजी घ्या" म्हणण्याची 

इतकी सवय लागलीय की प्रत्येक पोस्टवर 

न वाचता "काळजी घ्या" ठोकून देताहेत!

मी पोस्ट टाकली होती...

कोरोनामुळं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा 

मला बायको सोबत दीर्घकाळ राहता आलंय! 

माझ्या या पोस्टला शंभर-सव्वाशे जणांनी "काळजी घ्या" 

असा सल्ला  दिला!


181. 


अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मी एक गादी 

व दोन उश्या घेतल्या ! 

आखीर वो भी तो  'सोने' की चीज है ना!


182. 

कोरोंना स्पेशल: 

पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट 

च्यामारी…

समजतच नाहीये आपण जमिनीवर राहतो 

की समुद्रात!

183.

मन्या : डॉक्टर! मला खूप जगायचं आहे. 
काही तरी उपाय सुचवा. 
डॉक्टर : लग्न कर! 
मन्या : यामुळे माझं आयुष्य वाढेल? 
डॉक्टर : नाही, तुझ्या मनात जो हा विचार चालू आहे... 
तो कायमचा निघून जाईल.


184.

बायको: मला नवीन साडी पाहिजे!  

नवरा: पण तू कालच घेतली ना?  

बायको: ती Instagram साठी होती… 

आता WhatsApp स्टेटससाठी हवी!


185. 

राजू: मी रोज योगा करतो!  

बंड्या: कोणता?  

राजू: झोपून मोबाईलवर reels बघतो… 

तेच "शवासन"!


186.

आई: अगं, किराण्यातलं खोबरं कुठे ठेवलं?  

मिनी: मी ते Cloud वर अपलोड केलंय… 

आता किचनमध्ये जागा नाही! बरण्या संपल्या!


187.

दिग्दर्शक: तुला अभिनय येतो का?  

गुणीराम: हो, मी daily आईसमोर अभ्यास 

करत असल्याचा अभिनय करतो!


188.

टप्पू: आयुष्य म्हणजे काय रे?  

गोगी: आयुष्य एक लांब Login session आहे… 

आपण शेवटी आपोआप "Logout" होतो!


189. 

डॉक्टर: तुझा रिपोर्ट आलाय…  

जेठालाल: काय झालं?  

डॉक्टर: Netflix सबस्क्रिप्शन 

cancel कर… 

तुझ्याकडे वेळ कमी आहे!


190. 

काकुडा: मी एका "स्त्री" ला कब्रस्तानात 

propose केलं!  

मुंज्या: काय म्हणाली?  

काकुडा: “तूच माझा Last Love आहे!”


191. 

गोलू: आत्मा शरीर सोडतो…  

ढोलू: आणि मग?  

गोलू: मग तो दुसऱ्या router 

मध्ये login करतो!


192.

शिक्षक: सांग, "History" म्हणजे काय?  

भुत्या: जे WhatsApp वरून delete झालं… 

पण Google वर अजून आहे!


193.

बायको: मी रागावलेय!  

नवरा: ठीक आहे, मग मी 

"Safe Mode" मध्ये जातो!


194.

बायको: मला surprise पाहिजे!  

नवरा: ठीक आहे… 

मी आज भांडी घासणार नाही! 

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली