झी सिने अवार्ड्स 2023 बद्दल
कार्तिक आर्यन हा एक चांगला, चार्मिंग आणि उत्साही अभिनेता तर आहेच पण तो एक अतिशय कुशल नर्तक पण आहे. झी सिने अवॉर्डस् 2023 मध्ये त्याने स्टेजवर मोजकेच पण चांगले आणि धमाकेदार डान्स परफॉर्मन्स केले. आलिया भटने पण बऱ्यापैकी स्टेज गाजवले. सुरुवात रश्मिका मंदानाने केली. तिचाही परफॉर्मन्स धमाकेदार होता. स्टेजवर परफॉर्मन्स करताना प्रत्येकाची एन्ट्री धमाकेदार आणि वेगळी होती.
एकूणच अवॉर्ड्समध्ये कोरोनानंतर पहिल्यांदाच बॉलीवूड इतक्या जोरात आणि जोशात दिसत होते. गेल्या तीन-चार वर्षाची मरगळ झटकून तिथे आलेल्या कलाकारांना लाईव्ह बघतांना मजा येत होती.
तिथे दोन्ही सनी (लियोन, देओल), दोन्ही देओल (सनी, बॉबी) आलेले होते. दीपिका दिसली नाही. लियोनचा नवरा मख्ख चेहऱ्याने अवॉर्ड शो बघत होता कारण त्याला हिंदी समजत नसेल. ती बिचारी (!) हसत त्याच्याकडे अनेकदा बघायची की हा एकदा तरी हसेल पण तो आपला नेहेमी मख्ख!
नुकत्याच लग्न झालेल्या जोड्यांपैकी एकेक जण तिथे उपस्थित होते. म्हणजे किराया अडवाणी मल्होत्रा आणि आलिया भट कपूर दोघी होत्या. सिद्धार्थ आणि रणबीर नव्हते.
अजय, अक्षय, अमिताभ, आमिर, शाहरुख, हृतिक, रणवीर सिंग यापैकी कुणीही आलेले दिसत नव्हते.
दोन्ही खुराणा भाऊंनी (आयुष्मान, अपार शक्ती) चांगले सूत्र संचालन केले. या वेळेस त्यांना साथ द्यायला मनीष पौल पण आला होता. यावेळेस त्याला जुग जुग् जियो मधील "एक्टिंग साठी" पण बक्षीस भेटले. नाहीतर मनीष अनेक वर्षापासून सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध आहे.
तिथे आलेले सुनील शेट्टी, जितेंद्र, बॉबी देओल, अनुपम खेर, अनिल कपूर, दोन्ही देओल, गुलशन ग्रोवर यांचे खूपच वय झाल्याचे जाणवत होते. काश्मीर फाईल्सची पूर्ण टीम पण उपस्थित होती. सिद्धार्थ जाधव दिसला. मध्येच गदर 2 चे प्रमोशन करायला सनी देओल आणि अमिषा पटेल स्टेजवर आले होते.
बेस्ट निगेटिव्ह रोल अवार्ड चिन्मय मांडलेकर आणि बॉबी देओल यांना विभागून मिळाला. बेस्ट एक्टर अवार्ड अनुपम खेरला मिळाला. काश्मीर फाईल्स साठी. गंगुबाई साठी आलिया भटला अवार्ड मिळाला. अयान मुखर्जीला बेस्ट डायरेक्टर अवार्ड आणि बेस्ट फिल्म ब्रह्मास्त्र. सर्व अवार्ड अगदी योग्य व्यक्तींना मिळाले, हे माझे पर्सनल मत आहे.
.jpeg)
Comments
Post a Comment