ChatGPT बद्दल माहिती



काहीही सर्च करायचे असले किंवा एखाद्या विषयवार माहिती मिळवायची असली तर, सगळे जण Google चीच मदत घेतात. पण, Google पुढे काही असू शकते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कारण गुगलशी स्पर्धा करण्यासाठी कधीच कोणतेही सर्च इंजिन आले नाही किंवा येणाऱ्या काळात असे कोणतेही सर्च इंजिन येईल असे वाटत नसताना एक नवीन tool ने एंट्री केली आहे असे म्हणता येईल. ज्याचे नाव ChatGPT (Generative Pre-trained transformer) आहे. हे साधन तुमच्या शोधावर फक्त लिंक देऊन तुम्हाला कन्फ्युज करत नाही, तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे असे उत्तर देते, त्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी कुठेही जाण्याची गरज भासत नाही. आता सध्या ChatGPT गुगल प्ले स्टोअर अथवा ॲपल स्टोअरवर उपलब्ध आहे.

कामाची पद्धत गुगल सर्चपेक्षा खूप वेगळी:

ChatGPT वर तुमच्या प्रश्नांची उत्तरे इंटरनेटद्वारे उपलब्ध नाहीत. म्हणजेच, ChatGPT तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी इंटरनेटवर शोधत नाही. ChatGPT मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता आहे, ते बरोबर आहे. पण, हे tool तुमच्या प्रश्नाचे उत्तर इंटरनेटवर शोधत नाही, तर तुम्हाला फक्त त्यात दिलेल्या डेटावरूनच उत्तर मिळते. याचे कारण म्हणजे ChatGPT ला ट्रेन करण्‍यासाठी, software developers नी सार्वजनिकपणे उपलब्‍ध डेटा गोळा केला आहे आणि तो फीड केला आहे. त्यात दिलेला डेटा पुस्तके, वेब मजकूर, विकिपीडिया आणि इतर लेखांमधून घेतलेला आहे.

ChatGPT ची सुरुवात:

ChatGPT सॅम अल्टमॅन नावाच्या व्यक्तीने एलन मस्कसोबत २०१५ मध्ये केली होती. तेंव्हा ही एक एनजीओ कंपनी होती. काही कालावधीनंतर मस्क यांनीही हा प्रोजेक्ट सोडून दिला. ChatGPT चे सीईओ सॅम अल्टमॅनच्या म्हणण्यानुसार, या software ने एका आठवड्याच्या आत किमान १० लाख यूजर्सपर्यंत मजल मारली आहे. वर्ल्ड स्टॅटिस्टिक या ट्विटर हॅडलनुराार, Netflix ला या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी ३.५ वर्षे लागली होती. तर twitter आणि facebookला १० महिन्यांचा कालावधी लागला होता.तर instagram ला ३ महिने लागले होते.

ChatGPT मध्ये गूगलला संपवण्याची क्षमता:

Chat GPT हे आर्टिफिशियल इंटेंलिजन्सवर आधारीत सर्च इंजिन (Search Engine) आहे. चॅट GPT हे चॅटबॉट म्हणजेच सर्च इंजिन 30 नोव्हेंबर 2022 रोजी लाँच करण्यात आलं होतं. लाँच झाल्यापासून चेट GPT चर्चेत आहे. चॅट GPT वर प्रत्येक व्यक्ती आणि तज्ज्ञ आपापले मत मांडताना दिसत आहेत. चॅट जीपीटीमुळे माणसांना नोकर्‍या मिळणार नाहीत, असं काहींचे म्हणणे आहे. चॅट जीपीटीमध्ये गूगलला संपवण्याची क्षमता आहे असं जाणकार म्हणतात.

Chat GPT कशाप्रकारे काम करतं?

ओपनएआयने (OpenAI) चॅट जीपीटी (Chat GPT) तयार केला आहे. हे गुगल सर्च इंजिनप्रमाणे काम करते. पण त्याला उत्तर देण्याची पद्धत गुगलपेक्षा खूप वेगळी आहे. गुगल (Google) तुम्हाला कोणत्याही प्रश्नाला उत्तर म्हणून अनेक वेबसाइट्सच्या लिंक देते, पण चॅट जीपीटी (Chat GPT) तुमच्या प्रश्नाचे थेट उत्तर देते. त्यामुळे येत्या काळात चॅट GPT गुगलला चांगली टक्कर देणार आहे.

GPT3 काय आहे?

हे एक ओपन एआयने तयार केलेले लँग्वेज माँडेल आहे.हे लँग्वेज माँडेल डीप लर्निगचा वापर करून माणसासारखे मजकुर लेखन करू शकते. GPT4 लवकरच release होणार आहे.

ChatGPT कसे वापरायचे ?

Go to below link and sign in with your google account:
https://chat.openai.com/chat

ChatGPT साठी आता शुल्क आकारण्यात येणार:

विकीपीडियाच्या (Wikipedia) स्वास्थ (Swastha) या उपक्रमाचे दिग्दर्शक कम्युनिकेश एक्सपर्ट (Communication Expert) आणि डेटा सायंटिस्ट (Data Scientist) अभिषेक सूर्यवंशी (Abhishek Suryawanshi) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'चॅट GPT साठी आता शुल्क आकारण्यात येणार आहे. OpenAI चे कंपनीने सॅम अल्टमन यांनी विविध देशाच्या नागरिकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर आधारित किंमत ठरवून सर्वसमावेशकता दाखवणे आवश्यक आहे.'  हे शुल्क professional version साठी एका महिन्याला 42 डॉलर इतके असेल.

अभिषेक सूर्यवंशी यांचे ट्विट येथे बघा:
https://twitter.com/AbhiSuryawanshi/status/1616863867698544641?t=iB76qYlplnWKjOKMKTjLVg&s=19

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली