हवामान अंदाज "खाते"

 शॉर्टफिल्म: अंदाज

कलाकार: हवामान "खाते", साधीभोळी जनता


हवामान खाते: "थंडीचा जोर आणखी तीन दिवस कायम राहणार!'


चौथ्या दिवशी: 


साधीभोळी जनता: "थंडी तर अजून आहे, उलट जास्त वाढली तीन दिवसांपेक्षा!"


हवामान खाते: "आपण असे करू, आणखी चार दिवस थंडी कायम राहील असे सांगू!" 😎


पाचव्या दिवशी: थंडी कायम 😋


हवामान खाते: "आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. जाहीर करून टाका की थंडी बिनधास्त दहा दिवस कायम राहील लोकांनो. भरपूर स्वेटर, माकड टोप्या खरेदी करा!"


दुसऱ्याच दिवशी: थंडी गायब. उन्हाळा सुरू.😂


साधीभोळी जनता हवामान खात्याच्या कार्यालयावर निषेध मोर्चा नेते. प्रत्येक जण माणशी तीन स्वेटर घालून घामेघुम होऊन कार्यालयात माकड टोप्या फेकून मारते. 🙄😅


"माकड टोप्यांचे पैसे परत करा, परत करा! हवामानाच्या अंदाजांचे माकड चाळे बंद करा, बंद करा! थंडी चालेल पण अंदाज आवर!" 🐒🐵


कार्यालयात शुकशुकाट. हवामान खाते बर्फाच्या गुहेत भूमिगत. 


(या फिल्मचा भाग दोन उन्हाळ्यात येणार!)

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली