तव्यावरचा शेंगदाणे मिरचीचा झटपट ठेचा
जिन्नस:
सात-आठ मिरच्या
मूठभर शेंगदाणे
लसणाच्या चार-पाच पाकळ्या
जीरे
दोन चमचे तेल
कोथिंबीर, मीठ
मार्गदर्शन:
* प्रथम मिरच्या स्व्च्छ धुवून बारिक चिराव्यात.
* लसूण पाकळ्या चिराव्यात.
* तव्यावर तेल टाकून, प्रथम शेंगदाणे टाकावेत. नंतर, मिरच्या, लसूण टाकावेत.
* ते भाजले गेल्यावर, ते मिश्रण बाजूला सारून, तव्याच्या मध्यभागी तेल टाकावे. त्यात जीरे व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
* मग ते सगळे मिश्रण एकत्र करावे. जीरे शेवटी टकल्याने ते जळत नाही.
* मग मीठ टाकून त्याला जाडेभरडे ठेचावे.
* हवं असल्यास त्यावर लिंबू पिळू शकतो.
* तोंडी लावायला अगदी चवदार !!
Notes: मिक्सर वापरू नये. ठेचलेलाच छान लागतो.
.jpeg)
Comments
Post a Comment