गीतेतील काही महत्वाचे श्लोक
भगवदगीतेतील मोक्ष, देव देवता आणि परमेश्वर या संदर्भातील विविध अध्यायातील काही (एकमेकांशी परस्पर संबंध असणाऱ्या) श्लोकांचा एकत्रित सलग भावार्थ
|| यावानर्थ उदपाने सर्वत: संप्लुतोदके ||
|| तावान्सर्वेषु वेदेषु ब्राम्हणस्य विजानात: ||
|| दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ||
|| वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ||
|| यो यो यां यां तनु भक्त: श्रद्धायार्चीतुमीछति ||
|| तस्य तस्याचालाम श्रद्धां तामेव विदधम्यहम ||
|| येSप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ||
|| तेSपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्
|| यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रताः ||
|| भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोSपि माम् ||
|| न में विदू सुरगण: प्रभावं न महार्ष्य: ||
|| अहमार्दीर्ही देवानां महर्षी ना च सर्वश: ||
अर्जुन उवाच:
|| पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ||
|| ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् ||
4.12
काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा
काङ्क्षन्त:- इच्छा करणारे; कर्मणाम् -सकाम कर्माचं; सिद्धिम् - सिद्धी किंवा परिपूर्णत:; यजन्ते- ते यज्ञाद्वारे पूजा करतात; इह-या भौतिक जगतात; देवता:- देवतांची; क्षिप्रम्-त्वरित; हि-निश्चितच; मानुषे - मानव समाजात; लोके-या जगात; सिद्धि:- यश; भवति- प्राप्त होते; कर्म-जा- सकाम कर्मापासून.
मनुष्य या जगात सकाम कार्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात, मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते.
या भौतिक जगातील देवदेवतांविषयी अत्यंत चुकीची कल्पना आहे आणि विद्वान म्हणून प्रख्यात असणारे अल्पज्ञ लोक या देवदेवतांना भगवंतांचीच विविध रुपे समजतात. वास्तविकपणे देवता या भगवंतांची विविध रूपे नाहीत तर त्या भगवंतांचे विविध अंश आहेत. भगवंत एकच आहेत आणि अंश अनेक आहेत, वेद सांगतात की नित्यो नित्यानाम्- भगवंत एकच आहेत. ईश्वर: परम: कृष्ण:- श्रीकृष्णच परमेश्वर आहेत आणि देवतांना भौतिक जगताचे व्यवस्थापन करण्याकरिता शक्ती प्रदान करण्यात आली आहे. या देवता म्हणजे विविध मर्यादेपर्यंत प्राप्त भौतिक शक्तींनी युक्त असे जीव (नित्यानाम्) आहेत. देवता कधीही नारायण, श्रीविष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या बरोबरीच्या असूच शकत नाहीत. भगवंत आणि देवता एकाच पातळीवर आहेत असे जो मानतो त्याला नास्तिक किंवा पाखंडी म्हटले जाते. ब्रह्मा आणि शिव यांच्यासारख्या महान देवतांचीही तुलना भगवंतांशी करता येत नाही. वस्तुत: ब्रह्मा आणि शिवासारख्या देवता भगवंतांची आराधना करतात. (<i>शिवविरिञ्चिनुतम</i>). तरीही आश्चर्याची गोष्ट आहे की, परमेश्वर म्हणजे सामान्य मनुष्यच आहे. (anthropomorphism) किंवा परमेश्वर पशुरुपधारी (zoomorphism) आहे अशा गैरसमजुतीमुळे मूर्ख लोक पुष्कळ मानव नेत्यांची पूजा करतात. इह देवता: हा शब्द भौतिक जगातील शक्तिशाली मनुष्य किंवा देवता यांना दर्शवितो. पण भगवान नारायण, भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान श्रीविष्णू हे या भौतिक जगातील नाहीत. भगवंत हे भौतिक सृष्टीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. निर्विशेषवादी लोकांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्यही सांगतात की, नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या अतीत आहेत. तरीही मूर्ख लोक देवतांची आराधना करतात, कारण त्यांना त्वरित फलप्राप्ती करावयाची असते. त्यांना फलप्राप्ती होते, पण ते जाणत नाहीत की, अशी फलप्राप्ती ही क्षणिक असते आणि ती अल्पबुद्धी लोकांसाठी असते. बुद्धिमान मनुष्य कृष्णभावनेमध्ये असतो आणि त्वरित पण क्षणभंगुर फलासाठी त्याला निम्न देवदेवतांची आराधना करण्याची मुळीच आवश्यकता नसते. या भौतिक जगतातील देवदेवता तसेच त्यांचे आराधक यांचा भौतिक जगाच्या विनाशाबरोबरच विनाश होईल. देवदेवतांनी दिलेले वर हे भौतिक आणि तात्पुरते असतात. भौतिक जगत आणि देवदेवता व त्यांचे आराधक असणारे निवासी हे ब्रह्मांडरूपी महासागरातील बुडबडे आहेत. तरी या जगामध्ये मानवसमाज हा भूमीची मालकी, कुटुंब आणि उपभोग्य पदार्थ यासारख्या क्षणभंगुर भौतिक ऐश्वर्यप्राप्तीसाठी वेडा झालेला आहे. अशा तात्पुरत्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी, लोक हे देवदेवता किंवा मानवी समाजातील शक्तिशाली मनुष्याची पूजा करतात. जर एखाद्या मनुष्याला एका राजकीय नेत्याची पूजा करून शासनामध्ये मंत्रीपद मिळाले तर त्याला वाटते की, आपण मोठे वरदान प्राप्त केले आहे. म्हणून ते सर्व लोक तथाकथित नेते किंवा प्रतिष्ठित लोक यांच्यापुढे तात्पुरत्या वरप्राप्तीसाठी मस्तक झुकवितात आणि खरोखर या लोकांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. भौतिक अस्तित्वाच्या कष्टमय स्थितीतून कायमची सुटका होण्यासाठी कृष्णभावनाभावित होण्यामध्ये अशा लोकांना मुळीच स्वारस्य नसते. ते सर्व इंद्रियोपभोगाच्या मागे लागलेले असतात आणि इंद्रियोपभोगासाठी अल्पशी सुविधा मिळविण्यासाठी ते देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवांचे पूजन करण्याकडे आकर्षित होतात. हा श्लोक दर्शवितो की, लोकांना क्वचितच कृष्णभावनेमध्ये आस्था असते. बहुतेकांना इंद्रियोपभोगामध्ये रूची असते आणि म्हणून ते कोणत्या तरी शक्तिशाली जीवाची उपासना करतात.
----
4.25
दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥२५॥
दैवम्-देवतांची पूजा करण्यामध्ये; एव-याप्रमाणे; अपरे-इतर; यज्ञम्-यज्ञ; योगिन:- योगिजन; पर्युपासते-चांगल्या रीतीने उपासना करतात; ब्रह्म-परम सत्याची; अग्नौ-अग्नीमध्ये; अपरे-इतर; यज्ञम्-यज्ञ; यज्ञेन-यज्ञाद्वारे; एव-याप्रमाणे; उपजुह्वति-अर्पण करतात.
काही योगिजन, देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काहीजण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात.
पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे, कृष्णभावनाभावित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात. पण इतर असे लोक आहेत, जे या प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात आणि इतरही असे लोक आहेत, जे परब्रह्म किंवा भगवंतांच्या निर्विशेष तत्वाप्रीत्यर्थ यज्ञ करतात. म्हणून विविध श्रेणींना अनुसरुन विविध प्रकारचे यज्ञ आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या याज्ञिकांनी केलेले निरनिराळ्या श्रेणींतील यज्ञ हे केवळ यज्ञांचे बाह्यात्कारी वर्गीकरण दर्शवितात. वस्तुत: यज्ञ म्हणजे भगवान श्रीविष्णूंना संतुष्ट करणे होय. श्रीविष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात. सर्व निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांचे साधारणपणे दोन प्राथमिक विभाग करता येतात, भौतिक वस्तूंचा यज्ञ आणि दिव्य ज्ञान-प्राप्तीसाठी केलेला यज्ञ. कृष्णभावनाभावित व्यक्ती भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले इंद्र, सूर्यदेव इत्यादी देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि निर्विशेषवादी हे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन आपल्या व्यक्तिमत्वाचा यज्ञ करतात. देवदेवता म्हणजे भगवंतांनी विश्वाला उष्णता, वर्षा, प्रकाश इत्यादी गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी नेमलेले शक्तिशाली जीव आहेत. जे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात ते वैदिक कर्मकाडंनुसार विविध प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात. अशा लोकांना<i> बह्वीश्वरवादी</i> किंवा अनेक देवतांवर विश्वास ठेवणारे असे म्हणतात. पण जे इतर लोक परम सत्याच्या निर्विशेष ब्रह्मरुपाची उपासना करतात आणि देवदेवतांचे रूपे तात्पुरती समजतात, ते स्वत:चे अस्तित्व ब्रह्माग्नीमध्ये अर्पण करून परब्रह्मामध्ये विलीन होतात, वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करतात. असे निर्विशेषवादी परम सत्याच्या दिव्य स्वरुपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काल व्यतीत करतात. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, सकाम कर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात तर निर्विशेषवादी हे परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधींचा यज्ञ करतात. निर्विशेषवाद्यांसाठी यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे आणि आहुती म्हणजे आत्मस्वरुप आहे, जे ब्रह्माग्नीमध्ये अर्पिले जाते. परंतु अर्जुनासारखा कृष्णभावनाभावित भक्त हा श्रीकृष्णांच्या संतुष्टीप्रीत्यर्थ सर्वस्व यज्ञार्पित करतो याप्रमाणे भक्तांकडील भौतिक वस्तू तसेच त्यांचे स्वत:चे अस्तित्व म्हणजेच सर्वस्व श्रीकृष्णप्रीत्यर्थ यज्ञार्पित होते. म्हणूनच तो सर्वोत्तम योगी होय; पंरतु असे केल्याने तो आपले स्वत:चे वैयक्तिक अस्तित्व गमावत नाही.
----
7.21
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥२१॥
यः यः-जो जो; याम् याम्-ज्या ज्या; तनुम्-देवतेची; भक्तः-भक्तः; श्रद्धया-श्रद्धेने; अर्चितुम्-उपासना करणे; इच्छति-इच्छा करतो; तस्य तस्य-त्याची त्याची; अचलाम्-स्थिर; श्रद्धाम्—श्रद्धा; ताम्—त्या; एव-निश्चितपणे; विदधामि—देतो; अहम्—मी.
मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो, तेव्हा त्या विशिष्टदेवतेवर मी त्याची श्रद्धा दूढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो.
तात्पर्यः परमेश्वराने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे, म्हणून जर मनुष्याला भौतिक सुखोपभोग प्राप्त करण्याची इच्छा असेल आणि खरोखरच अशा सुविधा जर त्याला भौतिक देवतांकडून प्राप्त करून घ्यावयाची इच्छा असेल तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित असलेले भगवंत त्या मनुष्याची इच्छा जाणतात आणि त्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात. सर्व जीवांचे परमपिता या नात्याने भगवंत जीवाच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करीत नाहीत, उलट ते प्रत्येकाला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात, जेणेकरून ते आपल्या भौतिक इच्छांची पूर्ती करू शकतील. यावर कोणी विचारील की, सर्वशक्तिमान भगवंत भौतिक सुखोपभोग घेण्यासाठी जीवांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना मायेच्या जंजाळात का पडू देतात? तर या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर जीवांच्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ राहात नाही. म्हणून भगवंत प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य देतात, ज्याला जे आवडेल ते प्रदान करतात; परंतु अंतिम उपदेश आपल्याला भगवद्गीतेत आढळतो की, मनुष्याने इतर सर्व कार्यांचा त्याग करून त्यांना पूर्णपणे शरण गेले पाहिजे. केवळ यामुळेच मनुष्य सुखी होऊ शकतो.
जीव आणि देवदेवता दोघेही भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत. म्हणून जीव स्वत:च्या इच्छेने देवतांची आराधना करू शकत नाहीत तसेच भगवंतांच्या इच्छेवाचून देवता कोणता वरही प्रदान करु शकत नाहीत. असे सांगितले जाते की, भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हलत नाही. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे सामान्यत: भौतिक जगात पीडित झालेले लोक देवतांकडे जातात. मनुष्याला जर विशिष्ट गोष्टींची आवश्यकता असेल तर तो त्यानुसार विशिष्ट देवतेची उपासना करू शकतो. उदाहरणार्थ, रोगी मनुष्य सूर्यदेवाची उपासना करू शकतो, विद्यार्जन करण्याची इच्छा असणारा मनुष्य सरस्वतीदेवीची उपासना करू शकतो आणि सुंदर पत्नी प्राप्त करण्याची इच्छा असणारा मनुष्य भगवान शंकराची अर्धांगिनी, उमादेवीची उपासना करू शकतो. याप्रमाणे वैदिक शास्त्रांमध्ये विविध देवदेवतांनुसार विविध प्रकारचे उपासना विधी सांगण्यात आले आहेत. जीवाला विशिष्ट सुखाचा उपभोग घ्यायचा असल्याकारणाने, भगवंत त्या जीवाला विशिष्ट देवतेकडून तो वर प्राप्त करून घेण्यासाठी प्रबळ इच्छेने प्रेरित करतात. याप्रमाणे अभिष्ट वर प्राप्त करून घेण्यात जीव यशस्वी होतो. विशिष्ट देवतांप्रीत्यर्थ असणारा जीवाचा विशिष्ट पूजाभावही भगवंतच नियोजित करतात. अशा प्रकारचा भाव देवतासुद्धा जीवांमध्ये निर्माण करू शकत नाहीत; परंतु पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या अंतर्यामी उपस्थित असणारे परमात्मा असल्यामुळे, ते मनुष्याला विशिष्ट देवतेची उपासना करण्याची प्रेरणा देतात. वस्तुत: देवदेवता या भगवंतांच्या विराटरूपी शरीराचे निरनिराळे भाग आहेत आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्१य नसते. वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की, भज़गवंत परमात्मा रूपाने देवदेवतांच्याही हृदयामध्ये स्थित आहेत. म्हणून ते देवदेवतांद्वारे जीवाच्या इच्छा पूर्ण करण्याची व्यवस्था करतात. परंतु जीव आणि देवता दोघेही भगवंतांच्या इच्छेवर विसंबून आहेत. जीव आणि देवता स्वतंत्र नाहीत.
----
7.22
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥२२॥
स:-तो; तया-त्या; श्रद्धया-श्रद्धा किंवा प्रेरणा; युक्त:-युक्त झालेला; तस्य-त्या देवतेची; आराधनम्-आराधना; ईहते-आकांक्षा करतो; लभते-प्राप्त करतो; च-आणि; ततः-त्यापासून; कामान्-त्याच्या इच्छा;मया-माझ्याद्वारे; एव-केवळ; विहितान्-व्यवस्था; हि-निश्चितच; तान्-त्या.
अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो.
भगवंतांच्या अनुमतीवाचून, देवता आपल्या भक्तांना वरदान देऊ शकत नाहीत. सर्व काही भगवंतांच्या मालकीचे आहे याचे विस्मरण जीवाला होऊ शकते; परंतु देवतांना होत नाही. म्हणून देवतांची उपासना आणि लाभेच्छांची प्राप्ती ही देवतांमुळे होत नाही, तर भगवंतांच्या अनुमतीने होत असते. अल्पज्ञानी जीवाला याचे ज्ञान नसते, म्हणून तो लाभप्राप्तीकरिता मूर्खपणाने देवतांकडे जातो. परंतु शुद्ध भगवद्भक्ताला जेव्हा कशाची गरज असते तेव्हा तो भगवंतांचीच प्रार्थना करतो. तरीही लाभप्राप्तीची इच्छा करणे हे शुद्ध भक्ताचे लक्षण नव्हे. सामान्यतः जीव हा देवतांना शरण जातो, कारण तो आपल्या कामवासनांची तृप्ती करण्यामध्ये अत्यंत आसत झालेला असतो. असे घडण्याचे कारण म्हणजे, जीव अयोग्य गोष्टीची इच्छा करतो आणि भगवंत स्वत: अशा प्रकारची इच्छा तृप्त करीत नाहीत. चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की, जो भगवंतांची आराधना करतो व त्याच वेळी विषयोपभोगाची इच्छा करतो. त्यांच्या इच्छा परस्परविरोधी किंवा विसंगत आहेत. भगवंतांची भक्तीपूर्ण सेवा आणि देवतांची उपासना ही एकाच स्तरावर असू शकत नाही, कारण देवतांची उपासना ही भौतिक आहे आणि भगवंतांची भक्तीपूर्ण सेवा करणे ही पूर्णपणे आध्यात्मिक बाब आहे.
ज्या जीवाला भगवद्धामात परत जाण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी भौतिक इच्छा विघ्नकारी असतात. म्हणून अल्पबुद्धी जीवांना इच्छित असलेले भौतिक लाभ विशुद्ध भगवद्भक्ताला प्रदान करण्यात येत नाहीत, कारण असे इच्छित लाभ प्राप्त झाल्यामुळे अल्पबुद्धी जीव हे भगवंतांच्या भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त होण्यापेक्षा प्राकृत जगतातील देवदेवतांची उपासना करणे पसंत करतात.
----
7.23
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥२३॥
अन्त-वत्-नश्वर किंवा अनित्य; तु-परंतु; फलम्-फळ; तेषाम्-त्यांचे; तत्-ते; भवति- होते; अल्प-मेधसाम्-अल्पबुद्धीचे; देवान्-देवतांना; देव-यजः-देवतांचे उपासक; यान्ति -जातातः मत्-माझे; भक्ताः-भक्त; यान्ति-जातात; माम्-मला; अपि-सुद्धा.
अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात.
भगवद्गीतेवरील काही भाष्यकार म्हणतात की, देवतांची उपासना करणा-या मनुष्याला भगवत्प्राप्ती होऊ शकते. परंतु या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, देवतांचे उपासक हे, निरनिराळ्या देवता स्थित असलेल्या निरनिराळ्या देवलोकांची प्राप्ती करतात. उदाहरणार्थ, सूर्याचा उपासक सूर्यलोकाची प्राप्ती करतो किंवा चंद्रोपासक चंद्रलोकाची प्राप्त करतो. त्याचप्रमाणे जर कोणाला इंद्रासारख्या देवतेची उपासना करण्याची इच्छा असेल तर त्याला त्या विशिष्ट देवलोकांचवी प्राप्त होते. कोणत्याही देवतेची उपासना केल्याने मनुष्याला भगवंतांची प्राप्ती होते असे नाही. ही गोष्ट या ठिकाणी नाकारण्यात आली आहे, कारण या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, देवोपासक हे भौतिक जगतातील निरनिराळ्या देवलोकांत जातात, परंतु भगवद्भक्त हा प्रत्यक्ष भगवद्धामाची प्राप्ती करतो.
या ठिकाणी असा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो की, जर देवता या भगवंतांच्या शरीराचे विविध भाग आहेत, तर देवतांची उपासना केल्याने भगवंतांची प्राप्ती झाली पाहिजे. परंतु देवोपासक हे अल्पबुद्धी आहेत, कारण शरीराच्या कोणत्या भागाला अन्नाचा पुरवठा केला पाहिजे हे त्यांना माहीत नसते. त्यांच्यापैकी काही लोक इतके मूख असतात, की ते म्हणतात, शरीराला अनेक भाग असतात, आणि त्यांना अन्नपुरवठा करण्यासाठी अनेक मार्ग असतात पण हे उत्तर समर्पक नाही. कान आणि डोळ्याद्वारे कोणी शरीराला अन्नपुरवठा करू शकतो का? त्यांना माहीत नसते की, या देवता म्हणजे भगवंतांच्या विराट शरीराचे निरनिराळे अवयव आहेत आणि अज्ञानामुळे त्यांना वाटते की प्रत्येक देवता म्हणजे एक निराळा ईश्वरच आहे आणि तो परमेश्वराचा प्रतिस्पर्धा आहे.
केवळ देवताच भगवंतांचे अंश आहेत असे नाही तर सामान्य जीवसुद्धा भगवंतांचे अशं आहेत. श्रीमद्भागवतात सांगण्यात आले आहे की, ब्राह्मण हे भगवंतांचे मस्तक आहे, क्षत्रिय हे बाहू आहेत, वैश्य हे कटी तथा शूद्र हे पाय आहेत आणि हे सर्वजण विविध कार्ये करतात. आपल्या स्थितीचा विचार न करता जर मनुष्याने जाणले की, जीव आणि देवता दोघेही भगवंतांचेच अंश आहेत तर त्याचे ज्ञान हे परिपूर्ण ज्ञान आहे. परंतु जर त्याने हे जाणले नाही तर त्याला देवदेवता निवास करणा-या विविध लोकांची प्राप्ती होते. भगवद्भक्त प्राप्त करीत असलेल्या गतीप्रमाणे ही गती समान नसते.
देवतांकडून प्राप्त झालेले वर हे अनित्य असतात, कारण या भौतिक जगतातील लोक, देवदेवता आणि त्यांचे उपासक हे सर्वच नश्वर असतात. म्हणून या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, देवतांची उपासना करून प्राप्त झालेले सर्व लाभ हे क्षणिक असतात आणि यास्तव अशी उपासना केवळ अल्पबुद्धी जीवच करतात. कृष्णभावनेद्वारे भगवद्भक्तीमध्ये युक्त झालेल्या विशुद्ध भक्ताला सच्चिदानंद जीवन प्राप्त होते. म्हणून त्याने प्राप्त केलेला लाभ हा देवतेच्या साधारण उपासकाने प्राप्त केलेल्या लाभाहून अत्यंत भिन्न असतो, भगवंत हे अनंत आहेत, त्यांची कृष्णा, कृपा अपार आहे आणि म्हणून भगवंतांची आपल्या शुद्ध भक्तावर निःसीम कृपा असते.
----
7.24
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥२४॥
अव्यक्तम्—अव्यक्त; व्यक्तिम्—व्यक्तित्व किंवा स्वरूप; आपन्नम्—प्राप्त झाले; मन्यन्ते—मानतात; माम्-मला; अबुद्धयः-अल्पबुद्धी लोक किंवा अल्पज्ञ, परम्-परम, भावम्-अस्तित्व किंवा सक्ता; अजानन्तः--न जाणून; मम-माझ्या; अव्ययम्-अविनाशी; अनुत्तमम्-सर्वोक्तम.
मला पूर्णपणे न जाणणा-या अल्पबुद्धी लोकांना वाटते की, मी (पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण) पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत.
देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ म्हणण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी निर्विशेषवादी लोकांचेही अल्पज्ञ म्हणून वर्णन करण्यात आले आहे. येथे भगवान श्रीकृष्ण आपल्या साकार रूपामध्ये अर्जुनाशी बोलत आहेत, पण तरीही अज्ञानवश निर्विशेषवादी वाद घालतात की, परमेश्वर हा अंतिमतः निराकार आहे. श्रील रामानुजाचार्यांच्या परंपरेतील महान भगवद्भक्त यमुनाचार्यांनी या संदर्भात दोन सुंदर श्लोक रचिले आहेत, ते म्हणतात की, (स्तोत्र रत्न १२)
त्वां शीलारूपचरितै: परमप्रकृष्टैः
सत्वेन सत्विकतया प्रबलैश्च शास्त्रै:।
प्रख्यातर्देवपरमार्थविदां मतैश्र्च
नैवासुरप्रकृतय: प्रभवन्ति बोद्धुम् ।।
‘हे प्रभो! व्यासदेव आणि नारदांसारखे भक्त तुम्हाला पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात. वेदाध्यनाद्वारे मनुष्य तुमचे रूप, गुण आणि लीला जाणू शकतो व अशा रीतीने त्याला तुमच्या पुरुषोत्तम भगवान रूपाची अनुभूती होते. परंतु रज आणि तमोगुणामध्ये असणारे असुर आणि अभक्त यांना तुमचे ज्ञान होऊ शकत नाही. तुम्हाला जाणणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. वेदान्त आणि उपनिषदांवर वादविवाद करण्यामध्ये असे अभक्त कितीही निपुण असले तरी ते तुम्हाला जाणू शकत नाहीत."
ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की, केवळ वेदाध्ययनांद्वारे भगवद्ज्ञान होणे शक्य नाही, केवळ भगवंतांच्या कृपेनेच आपण त्यांना जाणू शकतो. म्हणून या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, केवळ देवतांचे उपासकच नव्हे तर कृष्णभावनेचा लेशमात्रही गंध नसलेले आणि वेदान्तावर भाष्य करणारे अभक्तही अल्पबुद्धीच आहेत आणि अशा अल्पबुद्धींना परमेश्वराच्या साकार रूपाचे ज्ञान होणे शक्य नाही. परम सत्य निराकार असल्याचे ज्यांना वाटते त्यांचे वर्णन अबुद्धय: म्हणून करण्यात आले आहे, अर्थात ज्यांना परम सत्याच्या अंतिम स्वरुपाचे ज्ञान नाही. श्रीमद्भागवतात सांगण्यात आले आहे की, परम सत्याच्या साक्षात्काराच्या प्रारंभी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती होते. त्यानंतर अंतर्यामी परमात्म्याची आणि सर्वांत शेवटी पुरुषोत्तम भगवत्-स्वरूपाची अनुभूती होते, आजकालचे निर्विशेषवादी तर अधिकच अज्ञानी आहेत, कारण ते निर्विशेषवादाचे आद्य प्रवर्तक शंकराचार्यांचेही अनुसरण करीत नाहीत. शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्रीभगवान आहेत. म्हणून निर्विशेषवाद्यांना परम सत्याचे ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण, देवकी किंवा वसुदेव पुत्र अथवा राजकुमार अथवा महापुरुष असे मानतात. भगवद्गीतेमध्ये या गोष्टीची निंदा करण्यात आली आहे, अवजानति मां मूढा मानुषी तनुमश्रितम्-केवळ मूर्खच मला साधारण मनुष्य समजतात. (श्रीमद्भगवद्गीता ९.११).
वस्तुतः भक्तीपूर्ण सेवा आणि कृष्णभावनेचा विकास केल्याशिवाय कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. श्रीमद्भागवतातही (१०.१४.२९) याला पुष्टी देण्यात आली आहे:
अथापि ते देव पदाम्बुजद्वय प्रसादलेशानुगृहीत एव हि |
जानाति तत्वं भगवन् महिम्नो न चान्य एकोऽपिं चिरं विचिन्वन् ।।
‘'हे भगवन्! जर मनुष्यावर तुमच्या चरणकमलांची लेशमात्रही कृपा झाली तरी तो तुमचे महान स्वरूप जाणू शकतो. परंतु अनेकानेक वर्षे वेदाध्ययन करणारे आणि तुम्हाला किंवा मानसिक तर्कवादाच्या आधारे भगवान श्रीकृष्ण त्यांचे रूप, गुण किंवा नाम इत्यादी जाणणे शक्य नाही. केवळ भक्तियोगाद्वारेच मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकतो. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे/हरे राम हरे राम राम राम हरे हरे |या महामंत्राचा जप करून जेव्हा मनुष्य पूर्णपणे कृष्णभावनेमध्ये युक्त होतो तेव्हाच तो भगवंतांना जाणू शकतो. निर्विशेषवादी अभक्ताला वाटते की, श्रीकृष्णांचा विग्रह हा भौतिक आहे आणि त्यांच्या लीला, त्यांचे रूप इत्यादी सर्व काही मायाच आहे. अशा निर्विशेषवाद्यांना मायावादी म्हटले जाते. त्यांना परम सत्याचे ज्ञान नसते.
विसाव्य श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना: प्रपद्यन्तेऽन्यदेवत:-'कामवासनेने अंध झालेले लोक निरनिराळ्या देवतांना शरण जातात.' भगवंतांच्या भगवद्धामाव्यतिरिक्त इतर देवदेवतांचे स्वत:चे ग्रहलोक आहेत. तेविसाव्या
श्लोकात सांगितल्याप्रमाणे देवान् देवयजा यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि-देवतांचे उपासक निरनिराळ्या देवलोकांमध्ये जातात आणि भगवान श्रीकृष्णांचे भक्त, कृष्णलोकामध्ये जातात. असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले असतानाही मूर्ख निर्विशेषवादी म्हणतात की, भगवंत हे निराकार आहेत आणि ही सर्व रूपे काल्पनिक आहेत. गीतेच्या अध्ययनावरून असे वाटते का की, देवता व त्यांचे लोक हे निर्विशेष आहेत? स्पष्टच आहे की, देवता किंवा भगवान श्रीकृष्ण कोणीच निर्विशेष नाही. त्या सर्वांना स्वतंत्र व्यक्तित्व आहे. श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत; त्यांचे स्वत:चे धाम आहे. देवतांनाही स्वत:चे ग्रहलोक आहेत.
त्यामुळे परम सत्य निराकार आहे आणि परम सत्याची रूपे ही काल्पनिक असल्याचे अद्वैतवाद्यांचे मत हे वस्तुस्थितीला अनुसरून नाही. या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे आणि भगवंतांची रूपेही एकाच वेळी अस्तित्वात असतात आणि भगवान श्रीकृष्ण हे सच्चिदानंद आहेत. वेदही स्पष्टपणे सांगतात की परम सत्य हे <i>आनन्दमयोऽभ्यासात-सर्वगुणसंपन्न</i> आहे आणि गीतेमध्ये भगवंत सांगतात की, ते जरी अजन्मा असले तरी ते अवतार धारण करतात. हे तथ्य आपण भगवद्गीतेपासून जाणून घेतले पाहिजे. भगवंत हे निराकार कसे असू शकतात हे आपण जाणू शकत नाही, गीतेप्रमाणे तरी, निर्विशेष अद्वैतवाद्यांचा सिद्धांत मिथ्या असल्याचे सिद्ध होते. या श्लोकावरून स्पष्ट होते की, परम सत्य भगवान श्रीकृष्णांना रूप तसेच व्यक्तित्व दोन्ही आहे.
----
9.22
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥२२॥
अनन्या:-अनन्य भावाने, इतर कोणताही हेतू नसणारे; चिन्तयन्तः-चिंतन करून; माम्-माझ्यावर; ये-जे; जनाः-लोक; पर्युपासते-योग्य प्रकारे उपासना करतात; तेषाम्-त्या; नित्य-नेहमी; अभियुक्तानाम्-भक्तीमध्ये दृढ झालेले; योग-आवश्यकता किंवा गरजा; क्षेमम्-रक्षण; वहामि—करतो; अहम्—मी.
परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो.
कृष्णभावनेवाचून ज्याला क्षणभरही राहवत नाही तो दिवसातून चौविस तास श्रीकृष्णांचेच चिंतन करतो. तो श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, सख्य केवळ आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीमध्ये रममाण झालेला असतो. अशा भक्तांना आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्णता प्रदान करणा-या, अशा सर्व क्रिया, मंगलमयी आणि दिव्य शक्तींनी परिपूर्ण असतात, यामुळे भगवद्भक्त भगवंतांचे केवळ सान्निध्य प्राप्त करण्याची इच्छा करतो. असा हा भक्त नि:संदेह विनाप्रयास भगवत्प्राप्ती करतो. यालाच योग असे म्हणतात. भगवत्कृपेमुळे अशा भक्ताला भौतिक बद्धावस्थेत पुन्हा कधीच परतावे लागत नाही. क्षेम म्हणजे भगवंतांचे अहैतुकी संरक्षण होय. योगाद्वारे कृष्णभावनेची प्राप्ती होण्याकरिता भगवंत भक्ताला साहाय्य करतात आणि जेव्हा भक्त पूर्णपणे कृष्णभावनाभावित होतो तेव्हा त्याचे दुःखपूर्ण बद्धावस्थेत पतन होण्यापासून रक्षण करतात.
----
9.23
येऽप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥२३॥
ये-जे; अपि-सुद्धा; अन्य-दुस-या; देवता-देवतांचे; भक्ता:-भक्त; यजन्ते-पूजन करतात; श्रद्धया अन्विता:-श्रद्धेने; ते-ते; अपि-सुद्धा; माम्-माझेच; एव-केवळ; कौन्तेय-हे कौंतेया; यजन्ति-पूजन करतात, अविधि-पूर्वकम्-अविधिपूर्वक, चुकीच्या मार्गाने.
हे कोंतेया! जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते.
भगवान श्रीकृष्ण सांगतात की, ‘‘देवतांची उपासना म्हणजे जरी अप्रत्यक्षपणे माझीच उपासना करीत असले तरी ते फार बुद्धिमान नसतात. 'उदाहरणार्थ, जेव्हा मनुष्य, वृक्षाच्या मुळाशी पाणी न घालता, वृक्षाच्या पानांना आणि फांद्यांना पाणी घालतो तेव्हा तो पुरेशा ज्ञानाच्या अभावी किंवा नियामक तत्त्वांचे पालन न करता असे करतो. त्याचप्रमाणे शरीराच्या विविध अवयवांची सेवा करणे म्हणजे पोटाला अन्नपुरवठा करणे होय. देवता या भगवंतांच्या प्रशासनातील निरनिराळ्या अधिकारी आणि निर्देशक आहेत. मनुष्याला शासनाचे नियम पाळावयाचे असतात, पदाधिकार्यांनी किंवा निर्देशकांनी केलेले नव्हे. त्याचप्रमाणे मनुष्याने केवळ भगवंतांचीच आराधना केली पाहिजे. यामुळे आपोआपच भगवंतांचे पदाधिकारी आणि निर्देशकही संतुष्ट होतील. अधिकारी किंवा निर्देशक हे प्रशासनाचे प्रतिनिधी असतात आणि म्हणून त्यांना लाच देणे बेकायदेशीर आहे. याचेच वर्णन या ठिकाणी अविधिपूर्वकम् या शब्दामध्ये करण्यात आले आहे. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, देवतांची अनावश्यक उपासना श्रीकृष्णांना मान्य नाही.
-----
9.25
यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रताः ।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥२५॥
यान्ति-जातात; देव-व्रता:-देवतांचे उपासक; देवान्-देवतांकडे; पितृन्-पितरांना; यान्ति-प्राप्त होतात किंवा जातात; पितृ-व्रताः-पितरांचे पूजन करणारे; भूतानि-भूत-प्रेतांकडे; यान्ति-जातात; भूत-इज्या:-भूतांचे उपासक; यान्ति-प्राप्त होतात किंवा जातात; मत्-माझे; याजिनः-भक्त; अपि-परंतुः माम्—मला.
जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो, जे पितरांची उपासना करतात, ते पितरांकडे जातात, जे भूतांची उपासना करतात, त्यांना भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात.
जर कोणाला चंद्र, सूर्य अथवा इतर कोणत्याही ग्रहलोकावर जाण्याची इच्छा असेल तर त्याला, वेदोक्त विधिविधानांचे पालन केल्याने त्या इच्छित ग्रहलोकांची प्राप्ती होऊ शकते, जसे, <i>दशपौर्णिमासी</i> विधी याचे विस्तृत वर्णन वेदांच्या कर्मकांड विभागामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये निरनिराळ्या ग्रहलोकांच्या अधिष्ठात्री देवतेची प्राप्ती करण्यासाठी विशिष्ट प्रकारची उपासना सांगण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारचा यज्ञ केल्याने मनुष्याला पितृलोकांची प्राप्ती होऊ शकते. तसेच मनुष्य, भूतांच्या ग्रहांवर जाऊ शकतो आणि यक्ष, राक्षस किंवा पिशाच्च बनू शकतो. पिशाच्चोपासनेला <i>अभिचार</i> किंवा <i>इंद्रजाल</i> असे म्हणतात. इंद्रजाल किंवा जादूटोणा करणारे अनेक लोक आहेत आणि जादूटोणा करणे म्हणजेच आध्यात्मिकता होय, असे त्यांना वाटते; परंतु वस्तुतः अशी सर्व कार्ये पूर्णपणे भौतिक आहेत. त्याचप्रमाणे केवळ भगवंतांचीच उपासना करणारा विशुद्ध भक्त निःसंदेह वैकुंठलोकाची आणि कृष्णलोकाची प्राप्ती करतो. या महत्वपूर्ण श्लोकावरून आपण जाणले पाहिजे की, जर केवळ देवतांची उपासना केल्याने मनुष्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होऊ शकते किंवा पितरांची उपासना केल्याने पितृलोकाची प्राप्ती होऊ शकते किंवा जादूटोणा केल्याने भूतलोकांची प्राप्ती होऊ शकते. तर शुद्ध भक्ताला श्रीकृष्ण अथवा श्रीविष्णुलोकांची प्राप्ती का होऊ शकणार नाही? दुर्दैवाने श्रीकृष्ण आणि श्रीविष्णूंचे निवास असणा-या अशा दिव्य लोकांचे ब-याच लोकांना ज्ञान नाही आणि हे ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते. निर्विशेषवाद्यांचेही ब्रह्मज्योतीमधून पतन होती. यास्तव कृष्णभावनामृत आंदोलन उदात्त आणि दिव्य ज्ञानाचा संपूर्ण मानव-समाजामध्ये प्रचार करीत आहे, जेणेकरून केवळ हरेकृष्ण मंत्राचे कीर्तन केल्याने मनुष्य याच जीवनात पूर्णत्व प्राप्त करून भगवद्धामात परत जाऊ शकतो.
-----
9.30
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥३०॥
अपि-सुद्धा; चेत्-जरी; सु-दुराचार:-अत्यंत निंद्य कर्म करणारा; भजते-भक्तीमध्ये युक्त झाला असेल तर; माम्-माझी; अनन्य-भाक्-अनन्य भावाने; साधुः-साधूः एव-निश्चितच; सः--तो; मन्तव्यः—समञ्जला पाहिजे; सम्यक्-पूर्णपणे; व्यवसितः-निश्चयी; हि-निश्चितच; सः-- तो.
जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो.
या श्लोकामधील सु-दुराचार: हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि आपण तो योग्य प्रकारे समजून घेतला पाहिजे. जेव्हा जीव बद्धावस्थेत असतो तेव्हा त्याची दोन प्रकारची कमें असतात, एक उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म आणि दुसरे स्वरूपभूत कर्म शरीर संरक्षण करणे किंवा समाज आणि राष्ट्राच्या नियमांनुसार राहणे, या संदर्भात निश्चितच निरनिराळी कमें असतात आणि भक्तांनासुद्धा बद्धावस्थेत ही कर्मे करावी लागतात व याच कर्माना उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म असे म्हटले जाते. याव्यतिरिक्त ज्या जीवाला आपल्या आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव झाली आहे आणि जो कृष्णभावनेमध्ये अथवा भगवद्भक्तीमध्ये युक्त झाला आहे, त्याच्या कर्माना दिव्य कर्म म्हटले जाते. अशी कमें स्वरूपावस्थेत केली जातात आणि त्यांनाच भक्ती असे म्हटले जाते. कधी कधी भक्तियुक्त कर्म आणि शरीराशी संबंधित कमें एकमेकांशी समांतर चाललेली असतात; परंतु पुन्हा कधी कधी या क्रियांचा एकमेकांशी विरोध होतो. शक्यतो भक्त अत्यंत सावध असतो. तो आपल्या अनुकूल अवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करीत नाही. तो जाणतो की, आपल्या कर्मातील पूर्णत्व हे आपल्या कृष्णभावनेतील उत्तरोत्तर अनुभूतीवर अवलंबून असते. तथापि, कधी कधी असे दिसते की, कृष्णभावनाभावित मनुष्य असे काही कर्म करतो, जे सामाजिक अथवा राजकीयदृष्ट्या अत्यंत धृणास्पद मानले जाते, परंतु अशा क्षणिक अधोगतीमुळे तो अपात्र ठरत नाही. श्रीमद्भागवतात सांगितले आहे की, मनुष्याचे पतन झाले असले तरी तो जर अंतःकरणपूर्वक भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त असेल तर भगवंत त्याच्या हृदयामध्ये स्थित असल्यामुळे त्याचे शुद्धीकरण करतात आणि सर्व पांपापासून त्याला मुक्त करतात. भौतिक विकास इतके प्रबळ आहेत की, भगव्तसेवेमध्ये पूर्णपणे युक्त झालेले योगीही कधी कधी विकारांद्वारे पाशबद्ध होतात. परंतु कृष्णभावना ही त्याहूनही प्रबळ असल्याकारणाने अशा प्रासंगिक पतनापासून त्यांचा तात्काळ उद्धार होतो. म्हणून कृष्णभावना ही सदैव यशदायीच असते. एखाद्या भक्ताचे आदर्श मार्गापासून आकस्मिकरीत्या जरी पतन झाले तरी त्या भक्ताला कोणीही तुच्छ लेखू नये. कारण पुढील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या क्षणी भक्त पूर्णपणे कृष्णभावनेमध्ये स्थित होतो तेव्हा अशी प्रासंगिक अध:पतने यथासमय थांबविली जातात.
<br> म्हणून जो कृष्णभावनेमध्ये स्थित आहे आणि दृढ निश्चयाने हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे। या महामंत्राचा जप करण्यात मग्न झालेला असेल; जरी त्याचे आकस्मिकपणे अथवा योगायोगाने पतन झाले तरी तो दिव्यावस्थेमध्ये स्थित असल्याचे जाणले पाहिजे. <i>साधुरेव-</i>हा शब्द महत्वपूर्ण आहे. हा शब्द अभक्तांना बजावतो की, आकस्मिकपणे झालेल्या पतनामुळे भक्ताचा उपहास करू नये. जरी त्याचे आकस्मिकपणे पतन झाले तरीही त्याला साधच समजले पाहिजे. <i>मन्तव्यः- </i>हा शब्द तर अधिकच महत्वपूर्ण आहे. जर एखाद्याने या र्नियमांचे पालन केले नाही आणि पतन झालेल्या भक्ताचा उपहास केला तर, त्याने भगवंतांच्या नियमांचेच उल्लंघन केल्याप्रमाणे आहे. अढळ दृढ निश्चयाने केवळ भक्तीमध्ये युक्त होणे हीच एखाद्या भक्ताची योग्यता आहे.
नृसिंह पुराणात पुढील श्लोक सांगण्यात आला आहे.
भगवति च हरावनन्यचेता
भृशमलिनोऽपि विराजते मनुष्य:।।
न हि शशकलुषच्छबि: कदाचित्
तिमिरपराभवतामुपैति चन्द्र:।।
अर्थात, भगवद्भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला मनुष्य जरी निंद्य कृत्ये करताना आढळला तरी त्याची कृत्ये म्हणजे चंद्रावर असलेल्या सशाच्या डागाप्रमाणे असल्याचे जाणले पाहिजे. अशा कलंकामुळे चंद्रप्रकाशाच्या प्रसारणामध्ये मुळीच बाधा येत नाही. त्याचप्रमाणे सदाचाराच्या मार्गावरून भक्ताच्या झालेल्या आकस्मिक पतनामुळे त्याला दुराचारी म्हणता येत नाही.
त्याचबरोबर मनुष्याने असा गैरसमज करून घेऊ नये की, दिव्य भगवद्भक्तीमध्ये युक्त असलेला भक्त हा सर्व प्रकारची निंद्य कृत्ये करू शकतो. या श्लोकामध्ये, भौतिक विकाराच्या प्रबलतेमुळे होणा-या अध:पतनांचाच केवळ उल्लेख करण्यात आला आहे. भक्ती करणे म्हणजे मायाशक्तीविरुद्ध युद्ध पुकारणे होय. जोपर्यंत मायेच्या विरुद्ध युद्ध करण्याइतपत मनुष्यामध्ये बळ नसते तोपर्यंत प्रासंगिक पतन होण्याची शक्यता असते; परंतु मनुष्याला जेव्हा पुरेसे बळ प्राप्त होते तेव्हा त्याचे पूर्वी सांगितल्याप्रमाणे असे पतन होत नाही. कोणीही या श्लोकाचा गैरफायदा घेऊन अशोभनीय कृत्ये करीत, अजूनही आपण भक्तच असल्याचे समजू नये. जर त्याने भक्तीद्वारे आपले चारित्र्य सुधारले नाही तर तो उच्च भक्त नाही हे जाणले पाहिजे.
-----
10.8
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजा
महा-ऋषयः-महर्षी; सप्त-सात; पूर्वे-पूर्वी; चत्वारः--चारः मनवः-मनूः तथा-सुद्धा; मत्-भावाः—माझ्यापासून उत्पन्न झालेले, मानसाः—मनापासून; जाताः—जन्म झालेले, येषाम्— ज्यांच्या; लोके-लोकामध्ये, जगामध्ये; इमाः-या सर्व; प्रजाः-प्रजा.
सप्तर्षिगण आणि त्यांच्या पूर्वीचे चार महर्षी तसेच मनू (मानवजातीचे प्रजापती) माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात.
भगवंत या श्लोकात विश्वातील प्रजेची मूळ वंशावळ सांगत आहेत. ब्रह्मदेव हा भगवंतांच्या हिरण्यगर्भ नामक शक्तीपासून जन्मलेला सर्वप्रथम जीव होय. ब्रह्मदेवापासून सात महर्षी, त्यांच्यापूर्वी सनक, सनन्द, सनातन आणि सनतकुमार हे चार महर्षी आणि मनू प्रकट झाले. या पंचवीस महर्षीना संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचे प्रजापती असे म्हटले जाते. ब्रह्मांडे असंख्य आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असंख्य ग्रहलोक आहेत आणि प्रत्येक ग्रहलोक वैविध्यपूर्ण योनींनी परिपूर्ण आहे. या सर्वांचा जन्म या पंचवीस प्रजापतींपासून झाला आहे. ब्रह्मदेवांनी प्रथम देवतांच्या गणनेनुसार एक हजार वर्षे इतकी तपश्चर्या केली आणि नंतर श्रीकृष्णांच्या कृपेमुळे त्यांना सृष्टीची निर्मिती कशी करावी हे ज्ञान प्राप्त झाले. ब्रह्मदेवांपासून सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार, नंतर रुद्र आणि नंतर सप्तर्षी प्रकट झाले. या प्रकारे भगवंतांच्या शक्तीपासून सर्व ब्राह्मण आणि क्षत्रियांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवांना पितामह म्हणतात तर श्रीकृष्णांना प्रपितामह असे म्हणतात. हे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात (११.३९) सांगितले आहे.
----
11.16
अर्जुन उवाच
पश्यामि देवांस्तव देव देहे
सर्वांस्तथा भूतविशेषसंघान् ।
ब्रह्माणमीशं कमलासनस्थ-
मृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् ॥१५॥
अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; पश्यामि-मी पाहतो; देवान्-सर्व देवता; तव-तुमच्या; देव-हे भगवन्; देहे—देहामध्ये; सर्वान्—सर्व, तथा—सुद्धा; भूत-जीव; विशेष-सङ्घान्-विशेषरूपाने; ब्रह्माणम्-ब्रह्मदेवांना; ईशम्—भगवान शंकरांना; कमल-आसन-स्थम्-कमलासनावर; ऋषीन्-महान ऋषी; च-सुद्धा; सर्वान्-सर्व; उरगान -सर्प, च-सुद्धा; दिव्यान्-दिव्य.
अर्जुन म्हणाला, हे भगवन्! हे कृष्ण! मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सपांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो.
ब्रह्मांडातील सर्व काही अर्जुन पाहात आहे म्हणून तो ब्रह्मांडामधील आदिजीव ब्रह्मदेवांना पाहतो आणि ब्रह्मांडाच्या अधोप्रदेशात, ज्यावर गर्भादकशायी विष्णू पहुडतात त्या दिव्य सर्पालाही तो पाहतो. या सर्पशय्येला वासुकी म्हटले जाते. वासुकी नावाचे इतरही सर्प आहेत. गर्भोदकशायी विष्णूंपासून ते ब्रह्मांडातील अत्युच्च लोकापर्यंत, ज्या ठिकाणी कमलासनस्थ ब्रह्मदेव वास करतात, सर्व काही अर्जुन पाहू शकत होता. याचा अर्थ असा आहे की, एकाच जागी रथावर बसलेला अर्जुन प्रारंभापासून ते अंतापर्यंत सर्व काही पाहू शकत होता. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तो हे सर्व पाहू शकला.
----
.jpeg)
Comments
Post a Comment