दुर्योधन आणि वरणावत
पांडव आणि कुंती वारणावत येथे दुर्योधन, धृतराष्ट्र आणि शकुनी यांच्या आग्रहामुळे जातात.
तिथे पोहोचल्यावर अतिशय सुंदर महाल दिसल्यावर नकुल म्हणतो, "मला तर विश्वास होत नाही की इतका सुंदर महाल आणि तो सुद्धा दुर्योधन ने आपल्यासाठी बनवून घेतला?"
भीमाला तसा सुरुवतीपासूनच दुर्योधनाच्या या महाल भेट देण्याबद्दल मनात संशय असतोच पण माणसातील चांगुलपणावर विश्वास असलेला युधिष्ठिर नकुल च्या प्रश्नावर उत्तर देतो, "आपण दुर्योधनाला बदलण्याची एक संधी दिली पाहिजे नकुल. काळ सगळ्यांना बदलवतो. आंबट कैरी सुध्दा कालांतराने गोड आंबा बनतेच ना!"
पण माणसातल्या चांगुलपणावर जरा जास्तच विश्वास असलेल्या याच युधिष्ठिराला कौरवांनी एकदा नाही तर अनेकदा फसवले. वरणावत प्रसंगातून धडा न घेता युधिष्ठिराने पुन्हा द्युताचे आमंत्रण स्वीकारून दुर्योधनावर विश्वास ठेवला आणि पुढे न टाळता येणारे अक्रीत घडले.
दुर्योधनरुपी कैरी हा कालांतराने आंबा तर झाला नाहीच पण कारल्या पेक्षाही कडवट बनला. काळ माणसांना बदलवतो हे खरं पण वाईटाला चांगलं बनवतो की वाईटाला आणखी जास्त वाईट बनवतो की चांगल्याला वाईट ते काळच ठरवतो. महाभारत आपल्याला एकूणच जीवनातील सगळ्या बाजू दाखवत म्हणूनच त्याचे महत्त्व गेल्या पाच हजार वर्षात सुध्दा कमी झालेले नाही.
(वरील संवाद सुर्यपुत्र कर्ण सिरीयल भाग 104 मधले आहेत पण त्यावर आधारित इतर लेख मी लिहिला आहे)
#nimishtics
.jpeg)
Comments
Post a Comment