कणिक खोबऱ्याच्या वड्या

कणिक खोबऱ्याच्या वड्या

रेसिपी: सौ. मंजुषा निमिष सोनार

शब्दांकन/ लेखन: निमिष सोनार 



साहित्य: 

जाड कणिक (एक वाटी)

तूप (अर्धा वाटी)

खोबरे (अर्धा वाटी)

किसलेला गूळ (3/4 वाटी)

थोडेसे दूध

काजू, बदाम, किसमिस यांचे तुकडे (ऐच्छिक) 


कृती:


* सर्वप्रथम गॅसवर जाड बुडाच्या पातेल्यात अर्धा वाटी तूप टाकावे व ते वितळू द्यावे.

* त्यात जाड कणिक टाकून तांबूस रंग येईपर्यंत भजावे

* मग त्यात किसलेले खोबरे टाकावे आणि मिश्रण खूप वेळ हलवावे.

* नंतर त्यात किसलेला गूळ टाकावा आणि मंद गैसवर हलवत राहावे

* नंतर त्यावर थोडा दुधाचा शिडकावा द्यावा आणि गैस बंद करावा

* मग एका ताटलीला तूप लावून ते मिश्रण त्यावर थापा

* मग त्यावर काजू, बदाम, किसमिस यांचे बारीक तुकडे पेरा किंवा टाका

* मिश्रण गरम असतांना त्याच्या सराट्याने वड्या पाडा 

* थंड झाल्यावर आपल्या प्रियजनांना डीशमध्ये खायला द्या.


Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली