नाईट वॉक




सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार अभिषेक ठमके यांच्या "नाईट वॉक" या लेखसंग्रहाची प्रस्तावना लिहिण्याची संधी मला त्यांनी दिली हा मी माझा सन्मान समजतो. कुणीतरी म्हटलंय की "नावात काय आहे?" पण मी अभिषेक यांच्या बाबतीत मी म्हणेन अभिषेक या "नावातच सगळं काही आहे!" यांचे पुस्तक डोळे झाकून विकत घायचे, डोळे झाकून वाचायला घ्यायचे आणि डोळे (अर्थातच!) आणि माईंड उघडे ठेऊन वाचायला घ्यायचे. कारण की "सिर्फ नाम ही काफी है!' त्यांचं पुस्तक हमखास वाचनीय आणि माहितीपूर्ण असणारच! मग ती कादंबरी असो की लेखसंग्रह की कथासंग्रह! आजवर त्यांच्या अनेक कादंबऱ्यांना उदंड वाचकप्रियता लाभली आहे. उदा. पुन्हा नव्याने सुरुवात, अग्निपुत्र, मैत्र जीवांचे वगैरे. तिन्ही वेगवेगळ्या विषयांवरील कादंबऱ्या पण कमालीच्या यशस्वी!

तेच लेखक आता घेऊन येत आहेत त्यांचा कथा आणि लेखसंग्रह: "नाईट वॉक!" ज्यात आहेत सुमारे तेरा लेख आणि कथा यांचे मिश्रण! त्यांच्या "टेरर अटॅक ऍट डोंबिवली स्टेशन" या सर्व वाचक आतुरतेने वाट पहात असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन ठरल्याप्रमाणे 1 मे ला जरी होऊ शकणार नसले तरी त्याऐवजी आपल्याला हा नाईट वॉक हा कथासंग्रह वाचकांना वाचायला मिळणार! 

या संग्रहात "नाईट वॉक" ही एक "बोल्ड" विषयावर आधारित कथा आहे, तसेच "सुपरमॅनची लाथ" ही एक वेगळ्याच विषयावरची कथा आहे. उडी, श्रेयस आणि एक वाटी दही हे समाजातील लोकांच्या वेगवेगळ्या आणि बदलत्या मानसिकतेचे दर्शन घडवतात. तसेच, यात अथांग, स्मशान, गरीब घरातला कलाम अशा कथा वाचायला मिळतील तर "मूकमित्र" हा नवीन फंडा आणि "पिके" या चित्रपटाबद्दल अभिषेक यांच्या खास शैलीत वाचायला मिळेल.

अभिषेक यांच्या पूर्वीच्या पुस्तकांसारखे हे पुस्तकसुद्धा लोकप्रिय होईल यात शंकाच नाही!

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली