कॅम स्कॅनरला हे आहेत काही पर्याय
काही दिवसांपासून सगळीकडे म्हणजे सोशल मीडियावर आणि विविध वर्तमानपत्रांमध्ये कॅम स्कॅनर ॲप मध्ये मालवेयर असल्याने ते आपल्या मोबाईल मधून काढून टाका अशा बातम्या मी वाचत आलो आहे आणि ते खरे सुद्धा आहे. पण डॉक्युमेंट्स स्कॅनिंग साठी आता इतर पर्याय काय हे मात्र कोणत्याच बातम्यांमध्ये लिहिलेले दिसत नव्हते. मग काही दिवसांपासून मी कॅम स्कॅनर ऍप ला इतर सुरक्षित आणि विश्वासनीय पर्याय काय आहे याचा शोध घेत होतो आणि माझ्या संशोधनानुसार मला खालील दोन ॲप चांगली वाटली ती नामांकित कंपनीची असल्यामुळे त्यात ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. इतरही अनेक ॲप आहेत पण प्रातिनिधिक म्हणून मी खालील दोन तुम्हाला देत आहे.
मायक्रसॉफ्ट ऑफिस लेन्स:
यात पीडीएफ मध्ये पण रूपांतर करता येतं. मात्र आधी तुम्हाला मायक्रोसॉफ्टमध्ये अकाउंट बनवावे लागेल. यात स्कॅनिंग साठी अनेक मोडस आहेत त्यापैकी डॉक्युमेंट मोड सिलेक्ट करू शकता.
https://play.google.com/store/apps/details?id=com.microsoft.office.officelens
एचपी स्मार्ट: यातही तुम्हाला पीडीएफ मध्ये रूपांतर करता येते मात्र आधी अकाउंट बनवावे लागेल.
hp कंपनीचे हे hp smart ऍप मुख्यतः hp च्या प्रिंटरमधून वायफाय द्वारे मोबाईलमधून (आणि अर्थातच लॅपटॉपमधून सुद्धा) प्रिंट आणि स्कॅन करण्यासाठी वापरले जाते. त्यात मोबाईल मधून डॉक्युमेंट स्कॅन करण्याची सोय सुद्धा आहे. "कॅमेरा स्कॅन टू ईमेल" हे ऑप्शन त्यात तुम्ही वापरू शकता.
https://play.google.com/store/apps/details?id=com.hp.printercontrol
#technimish
#nimishtics
#नैमिषारण्य

Comments
Post a Comment