"हम बने तुम बने" विषयी
माझे मत: संदेश छानच आहे.नात्यांबद्दल कोणताच आदर्शवादाचा बुरखा न घालता एकमेकांविषयी काय वाटते ते बोलले तर पाहिजेच पण ते एकतर्फी नसायला पाहिजे. बने कुटुंबात "लहान मोठे कुणी नाही, समान येथे सारे", या गाण्यातील वाक्यानुसार ते सगळेजण तंतोतंत वागतात. मोठ्यांनी लहानांवर किंवा लहानांनी मोठ्यांवर केलेली टीका किंवा मत ते लोकं सहज आणि खेळीमेळीने स्वीकारतात. म्हणजेच Healthy and constructive criticism! त्याचा घरातलं कुणीही ego issue करत नाही.
थोडे विषयांतर: स्पर्शाचे महत्व आणि बने कुटुंब-
27 ऑक्टोबरला मटा मैफल मध्ये श्रीपाद ब्रम्हे यांचा एक लेख आला होता. त्यात त्यांनी स्पर्शाने महत्व सांगितले होते. तसेच 1996 साली लोकप्रभामध्ये ही अशाच धाटणीचा एक लेख आला होता. दोन्ही लेखांचा मतितार्थ असा होता की मराठी कुटुंबांच्या तुलनेने उत्तर भारतातली कुटुंबे एकमेकांशी स्पर्शाने मनमोकळी असतात. हे सरसकटखरे नसले तरी काही अंशी खरे आहे. हे नक्की खरे आहे की शब्दांपेक्षा स्पर्शाची भाषा अधिक एकमेकांना जवळ आणते, पण कधीकधी काही खोट्या किंवा अस्तित्वात नसलेल्या पारंपरिक समजुतीच्या आधारखाली आपण असा स्पर्श म्हणजे बलिशपणा मानतो.
पण बने कुटुंबाचे प्रत्येक सिरीयल मध्ये नीट निरीक्षण केल्यास लक्षात येईल की ते कुटुंब स्पर्शाची भाषेने सुद्धा बोलत असते. पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन हा प्रकार तर भारतात अजून रुजला नाहीच, पण कुटुंबातल्या कुटुंबात सुद्धा अजूनही बरेचदा हे निषिद्ध मानले जाते.
बने कुटुंब प्रत्यक्षपणे यावर भाष्य करत नसले तरी अप्रत्यक्षपणे त्याचे योग्य ते महत्व अधोरेखित करत आहे.
Comments
Post a Comment