दिगपालजी आणि अमोलजी यांची चित्रपटातील आग्रा स्वारी
या चित्रपटानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन्ही महाराजांच्या कारकीर्दीत सोबत असलेल्या सरसेनापती हंबीरराव यांच्यावर आधारित प्रवीण तरडे यांनी चित्रपट बनवला आणि तो छान होता. पण त्याचे शिवराज अष्टक चित्रपट मालिकेच्या सीरिज किंवा श्रृंखलेशी ओव्हरलॅपींग होत नव्हते.
पण काही दिवसांपासून मी ऐकतोय की डॉ. अमोल कोल्हे "शिवप्रताप: गरुडझेप - आग्रा भेटीचा थरार" हा चित्रपट 5 ऑक्टोबर 2022 ला घेऊन येत आहेत. म्हणजे मध्येच दिगपाल लांजेकर यांची चित्रपट साखळी ब्रेक झाली. वास्तविक बघता असे त्यांनी करायला नको होते.
मागे पण जेव्हा दिगपाल हे कोंडाजी फर्जंद यांच्यावर चित्रपट बनवणार होते तेव्हा अजय देवगण पण तान्हाजी बनवत होता तेव्हा दोघांनी ठरवले की शक्यतो एकाच काळात आणि तेही एकाच विषयावर चित्रपट रिपीट व्हायला नको. नाहीतर दिगपाल पण सुभेदार तानाजी मालुसरेवर चित्रपट बनवणार होते. म्हणून फर्जंद मध्ये सुरुवातीची काही मिनिटे फक्त तानाजी मालुसरेची कथा कव्हर होते आणि त्यानंतर कोंडाजी फर्जंदची कथा घडते.
असे म्युच्युअल अंडरस्टॅण्डिंग (परस्पर समजूत) अमोल कोल्हे आणि दिगपाल यांच्यात असायला हवी होती असे मला वाटते.
बॉलिवूडमध्ये पण काही वर्षांपूर्वी अजय देवगण आणि बॉबी देओल या दोघांचे शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर दोन चित्रपट एकच दिवशी रिलीज झाले होते. तसे व्ह्यायला नको. प्रेक्षक विभागले जातात. मी दोन्ही पाहिलेत पण मला बॉबी देओल चां चित्रपट जास्त आवडला होता.
इथे मात्र नंतर रिलीज होणाऱ्या चित्रपटाला (स्वारी आग्रा) फटका बसू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवन गाथेत चित्रपट बनवण्यासाठी इतके विषय आहेत की वेगवेगळे दिग्दर्शक वेगवेगळे विषय घेऊन खूप चित्रपट बनवू शकतात पण एकच विषयावर थोड्या महिन्यांच्या अंतराने दोन चित्रपट बनवण्याने काय साधेल? त्यामुळे एका दिग्दर्शकाची अष्टक शृंखला पण ब्रेक होते आहे किंवा त्यातील एक कडी कुणीतरी आधीच वेगळ्या पद्धतीने सर्वांपुढे सादर करते आहे.
असो! पण इतिहासप्रेमी प्रेक्षकांना कितीही चित्रपट रिपीट झाले तरी हरकत नाही ते प्रत्येक चित्रपट बघतीलच.
(वरील माहिती आणि मांडलेले मत मी इतिहासाचा जाणकार म्हणून नव्हे तर एक सामान्य ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षक म्हणून दिलेले आहे याची नोंद घ्यावी!)
.jpg)
आणखी एक बातमी आली आहे की हर हर महादेव नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित मराठी चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे ज्यात सुबोध भावे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट इतर चार भारतीय भाषांत पण प्रदर्शित होईल, जसे इतर साऊथचे चित्रपट होतात.
ReplyDelete