चिकन सूप फॉर द सोल (थिंक पोझिटीव्ह)
चिकन सूप फॉर द सोल (थिंक पोझिटीव्ह) या पुस्तकातील काही विचार:
सत्य असं काही नसतंच;
असतं ते फक्त ज्याचं त्याचं आकलन.
- गुस्तव फ्लाबर्ट
कणखर पणा हा आत्म्यमध्ये मनामध्ये असतो;
स्नायूंमध्ये नाही.
- अलेक्स करस
कुठल्याही आजारावर उपचार करण्याआधी;
मनावर करा.
- चेन जेन
कुलुपे फक्त प्रामाणिक माणसांनाच दूर ठेवतात.
- ज्यू म्हण
कोणतेही काम हलके किंवा कमी दर्जाचे नसते;
पण वृत्ती मात्र हलक्या दर्जाची असू शकते.
- विल्यम बेनेट
ज्या माणसाला स्वतःचे असे अंतस्थ आयुष्य नसते;
तो आजूबाजूच्या परिस्थितीचा गुलाम असतो.
- हेनरी अमील
माझ्या मालकीच्या किती गोष्टी आहेत यावरून माझी समृध्दी आणि श्रीमंती ठरत नाही;
तर माझ्या गरजा किती कमी आहेत यावरून ते ठरते.
- जे. ब्रदर्टन
काही वेळेला आजूबाजूची परिस्थिती बदलण्यापेक्षा;
स्वतः लाच बदलण्याची गरज असते.
- ऑर्थर बेन्सन
आपल्या परिस्थितीमुळे नाही;
तर आपल्या मनोवृत्ती मुळे आपल्याला आनंद मिळत असतो.
- अज्ञात
असे वागा की तुम्ही जे काही करणार त्याने काही ना काही फरक नक्की पडणार आहे;
आणि तो पडतोच!
- विल्यम जेम्स
ज्याचेकडे जगण्याचे सबळ कारण आहे असा माणूस;
कसेही करून आयुष्यातील कशाही आणि कोणत्याही गोष्टीतून हमखास तरून जातो आणि सहन करतो.
- फ्रेडरिक नित्से
दररोज संध्याकाळी मी माझ्या काळज्या देवावर सोपवून देते;
तसाही तो रात्रभर जागाच असतो.
- मेरी क्राऊले
("चिकन सूप फॉर द सोल - थिंक पोझिटीव्ह"
या पुस्तकातून)

Comments
Post a Comment