विक्रम वेताळ आणि टीव्ही





माझ्या गुढी पाडव्याच्या लेखात "विक्रम संवत" बद्दल मी लिहिले होते यातील जो विक्रमादित्य राजा होता तो म्हणजे आपल्याला लहानपणापासून सुपरिचित असलेला "विक्रम वेताळ" कथेतील विक्रम. 

सर्वप्रथम आपण हा समज काढून टाकायला हवा की विक्रम वेताळ ही लहान मुलांसाठी सिरीयल आहे. वेताळाच्या कथेत अनेक प्रौढ विषय हाताळले गेले आहेत. पण त्यात जादू, राक्षस, दिव्य शक्ती अशा गोष्टींची जोड असल्याने तसा समज झालेला असावा. 

पूर्वी दूरदर्शनवर 1985 साली जे विक्रम वेताळ लागायचे (ज्यात अरुण गोविल विक्रम होता) त्यात मर्यादित एपिसोड्समुळे गोष्टी थोडक्यात आटोपत होत्या, तसेच त्या काळात स्पेशल इफेक्टस पण इतके दर्जेदार दाखवता येत नव्हते. 

पण तुम्हाला जर का राजा विक्रमादित्यला वेताळाने सांगितलेल्या गोष्टींसोबतच विक्रमादित्यच्या जीवनातील घडलेल्या घटना जाणून घ्यायच्या असतील तर zee 5 वर "विक्रम और वेताल की रहस्यगाथा" उपलब्ध आहे. ते बघा. त्यात डिटेल्स आहेत. 

वेताळ विक्रमला ज्या कथा सांगतो त्यानंतर जो प्रश्न विचारतो आणि विक्रम त्या प्रश्नांची किंवा कोड्याची जी उकल करतो  ते बुद्धीला चालना देतं, एक वेगळा विचार करायला भाग पाडते. जवळपास वेताळाच्या सगळ्या कथा या पुराणातल्या आहेत (अर्थात काही वेगळ्या पण आहेत) त्यामुळे आपल्याला रामायण महाभारत आणि इतर पुरणातील आधीच माहीत असलेल्या कथा ऐकायला मिळतात पण त्या प्रत्येक कथेतील एक वेगळाच आणि नवीन (आपल्याला या आधी माहीत नसलेला) पैलू त्यात कळतो. 

तसेच zee 5 वरील विक्रम वेताळ मध्ये वेताळ ने सांगितलेल्या कथा व्यतिरिक्त त्याच्या जीवनात घडलेल्या अनेक घटनांचा सुद्धा समावेश आहे. हा विक्रम राजा उजैनी  चां राजा होता. विशेष म्हणजे स्टार प्लस वरील महाभारतात कर्णाची भूमिका करणारा कलाकार "अहम शर्मा" हा विक्रम च्या भूमिकेत आहे. त्याची पर्सनॅलिटी एखाद्या राजाला शोभेशी आहेच पण संवादफेक (dialogue delivery) अतिशय स्पष्ट आणि उत्तम आहे. मात्र यातील वेताळची भूमिका करणारा कलाकार मात्र तीन वेळा बदलला आहे. अजून माझे सर्व एपिसोड्स बघून झाले नाहीत, पण आतापर्यंत तीन वेळा वेताळ बदलला. ही सिरीयल 2019 आली "& TV" वर लागून गेली आहे ज्याला आता झी ने विकत घेतले म्हणून सर्व एपिसोड्स zee 5 वर उपलब्ध आहेत.

विक्रमच्या दरबारी जे नवरत्न होते त्यापैकी एक वराह मिहिर हा ज्योतिषी होता, महाकवी कालिदास होता. सूरज थापर ने साकारलेला भद्रकाल पण चांगला आहे.  

भद्रकाल (जो विक्रमला वेताळघाटीतून वेताळाला आणायला पाठवतो) आणि वेताळ यांच्या मध्ये काय वैर आहे ती कथा सुद्धा अधून मधून थोडी थोडी येत रहाते. अगदी शेवटी आपल्याला कळेल की खरा व्हीलन वेताळ असतो की भद्रकाल? 

या सिरीयलबद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे. आपण प्रत्यक्ष सिरीयल बघायला सुरुवात करा म्हणजे आपल्याला कळेल.

- निमिष सोनार, पुणे


Comments

Popular posts from this blog

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली

आरोग्यदायी सांबार