खतरनाक रोडवरचा प्रवास!

 

हिमाचल प्रदेशातील मनाली ते लेह हे अंतर तीन सेलिब्रिटीज् (संग्राम, वरुण आणि मंदिरा) एकेका अनुभवी ड्रायव्हरला सोबत घेऊन ट्रक चालवत नेतात, आणि त्यांना दिलेला सामान ठरलेल्या ठिकाणी डिलिव्हरी करतात, हे बघायला खूपच थरारक वाटते.

समुद्रसपाटीपासून अंदाजे 6000 किमी पासून ते अंदाजे 14000 फूट उंचीवर पोहोचतात.

इंडियाज डेडलीएस्ट रोड्स (भारतातील खतरनाक/प्राणघातक रस्ते) सिझन एक मधील एपिसोड एक, दोन आणि तीन मध्ये आपण "डिस्कव्हरी प्लस" वर बघू शकता. बरीच भौगोलिक माहिती मिळते. ज्ञान वाढते.

पर्वतावरील कडेकपारीतील खाचखळगे, चिखल, दगड, पाणी यांनी भरलेले (बहुतेक सगळे अरुंद) रस्ते, दरड कोसळण्याची भिती आणि हिमनद्यांमुळे कधीही आक्रमक होऊ शकणारे आणि मोठमोठ्या ट्रक्सला सुद्धा पाण्याच्या प्रवाहाने दरीत ढकलून देण्याची क्षमता असणारे धबधबे यांची सतत डोक्यावर टांगती तलवार, धुक्यामुळे 50 मीटरच्या पुढचे न दिसणे, उंचीमुळे ऑक्सिजनची कमतरता असे सगळे अडथळे पार करत या तिघांना आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचताना बघणे म्हणजे खूप वेगळा अनुभव ठरतो.

आणि हे सगळे कॅमेरात शूट करून ते आपल्यापर्यंत क्रिस्प एडिटिंग करून पोचवणे हे खरंच रिस्की काम आहे. संपूर्ण टीमचे कौतुक वाटते. तुम्हाला रियल लाईफ मधील थरारक असे काही बघायचे असेल तर हा कार्यक्रम नक्की बघू शकता!!

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली