पद्मश्री विजेत्या सिंधुताई सपकाळ म्हणतात



पोटाची भूक माझी प्रेरणा होती. एवढी भूक लागायची की रस्त्यावरचे दगड चावून खावी असे वाटायचे.

तेव्हा माझ्याप्रमाणेच अवतीभवती अनेक भुकेले असल्याचे लक्षात यायचे. त्यांना मी घासातला घास दिला आणि माई प्रपंच सुरू झाला. त्यातूनच मी हजारो अनाथांची माय झाले. माझ्या लेकरांमुळे मी जगू शकले. या लेकरांना आणि त्यांना जगवणाऱ्यांना मी हा पुरस्कार अर्पण करते. वीस वर्षांचे वय आणि हातात दहा दिवसांचे बाळ असताना बेघर झाले.

या काळात भिक मागितली, रेल्वेत राहिले. रात्री भीती वाटली की स्मशानात जाऊन राहायचे, ते माझ्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण होते. या काळात सगळ्या जगाचा फार राग आला होता.

माझ्या वडिलांना रडत बसलेले कधीही आवडायचे नाही.

ते नेहमी म्हणायचे,"लढायला शिका, रडत बसू नका!" तीच उर्जा माझ्यामध्ये निर्माण झाली. अंगावर संकटे कोसळली तर त्यावर पाय देउन उभे रहा. एका रात्रीची वाट पहा, उद्याचा दिवस तुमचा आहे.

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली